Monday, December 30, 2013

हे बंध जीवनाचे... प्रशांत दिक्षीत.

हे बंध जीवनाचे..

हल्लीचा समाज व्यक्तिनिष्ठ आहे असं म्हणतात. पण मानवी गुणसूत्रांचे बंध मात्र पिंडी ते ब्रह्मांडी याचीच खात्री पटवून देत आहेत..

जगणे म्हणजे स्वत:ला सतत कशाशी तरी जोडत राहणे. माणूस एकटा असा कधी नसतोच. तो कुणाबरोबर नसला तरी स्वत:बरोबर असतो. स्वत:शी संवाद करीत असतो. हा संवादही खुंटला तर तो वेडापिसा होता. एकटा राहात असतानाही तो रोज कोणा ना कोणाशी जोडला जात असतो. जगाचा संसार हे परस्परसंबंधांचे अवाढव्य जाळे आहे. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, व्यावहारिक अशा असंख्य संबंधांची नवी जोडणी सतत होत असते वा जुन्या जोडणीमध्ये परिवर्तन होत असते आणि या जोडण्या एकमेकांवर प्रभाव टाकीत असतात. नेटवर्कशिवाय माणूस जगूच शकत नाही. निसर्ग म्हणजे नेटवर्क आणि त्यात माणूस आलाच.

यात नवीन काय सांगितले असा प्रश्न पडेल. माणूस प्रतिक्षणी स्वत:ला कशा ना कशाशी जोडतो, त्याशिवाय तो विचारच करू शकत नाही यात नवीन काहीही नाही. नवीन बाब ही आहे की, माणसांच्या या असंख्य जोडण्या आता प्रत्यक्ष पाहता येतात. त्यांचा अभ्यास करता येतो. त्यांचे विश्लेषण करता येते. त्यावरून निष्कर्ष काढता येतात आणि पुन्हा ते निष्कर्ष तपासून पाहता येतात. माणूस कसा जगतो हे प्रत्यक्ष पाहताना त्याचा अभ्यास करता येणे हे तंत्रज्ञानामुळे साध्य झाले. यातूनच 'नेटवर्क रीसर्च' ही नवी शाखा उदयाला आली. या शाखेने सुरू केलेल्या अभ्यासातून माणूसच माणसाला अधिक समजून घेऊ लागला आहे.

मोबाइल, इंटरनेट, फेसबुक, गुगल अशी अनेक साधने आपण वापरतो. त्यांच्यामार्फत अनेक व्यवहार करतो. संदेश पाठवितो, बोलतो, माहिती विचारतो, माहिती सांगतो, सल्ला मागतो, सल्ला देतो, चौकशा करतो, अफवा पसरवितो, गॉसिप करतो. असंख्य उद्योग याच्यामार्फत होतात. माणूस पूर्वीही हे करीत होता, पण त्याची नोंद किंवा रेकॉर्डिग होत नव्हते. आता नोंद होते. या सर्व व्यवहारातून आपला स्वभाव प्रगट होत असतो. केवळ आपलाच नव्हे, तर आपल्या समाजाचा, आपल्या गटाचा, आपल्या व्यवसायाचा. आपल्या स्वभावाचे असे अनेक पैलू नोंदले जात असतात. माणूस समजून घेण्यासाठी याहून उत्तम सामग्री कुठली? माणूस जसा आहे तसा, त्यामध्ये काहीही फेरबदल न करता, त्याच्या हालचालीतून निरखता येतो, त्याचा अभ्यास करता येतो. अब्जावधी माणसांचा असा अद्ययावत डेटा आज जगात प्रतिक्षणी तयार होत आहे आणि अत्यल्प प्रमाणात त्याचा अभ्यासही सुरू झाला आहे.

या माहितीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ती प्रतिक्षणी तयार होत असते. म्हणजेच ती जिवंत असते. ताजी, टवटवीत असते. माणसाचा अभ्यास करण्यासाठी पूर्वी त्याच्या मुलाखती घेतल्या जात. आजही मानसोपचार करणारे रुग्णाच्या मुलाखती घेतात, परंतु मुलाखतीत माणूस पूर्ण उघडा होत नाही. अनेक गोष्टी तो झाकून ठेवू शकतो. मात्र दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर करताना तो जसा आहे तसाच दिसतो. मानसोपचारतज्ज्ञाला रुग्णाची मुलाखत घेऊन जितकी माहिती मिळेल, त्याच्या कैकपट अधिक माहिती त्याच्या मोबाइल संभाषणाच्या टेप्स ऐकल्या तर मिळेल.
माणसाकडून सतत प्रगट होत जाणारी ही माहिती सच्ची असते आणि म्हणूनच मौल्यवान असते. शास्त्रज्ञांना तिचे मोल कळते. कारण अशा सच्च्या माहितीच्या आधारे गृहीतक मांडता येते. एकदा गृहीतक हाती आले की संशोधनाला दिशा येते. मग हे गृहीतक अधिक माहिती मिळवून किंवा प्रयोग करून तपासता येते. अशा चोख तपासण्या झाल्या की गृहीतकातून निश्चित निष्कर्ष काढता येतो आणि आपल्या हातात वैश्विक नियम येतात. निसर्गातील असे अनेक नियम आपण शोधून काढले, पण ते मुख्यत: स्थूल सृष्टीतील होते. आता निसर्गातही अनेक चमत्कृती समोर आल्या आहेत, स्थूल सृष्टीपेक्षा सूक्ष्म सृष्टीचा पसारा अवाढव्य म्हणावा असा आहे व त्यात अधिकाधिक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत. निसर्गातील या नव्या गोष्टींची माहिती अखंड जमा होते व संगणकात साठत राहते. त्यात भर पडत आहे ती माणसाच्या माहितीची. पण नुसती माहिती असून चालत नाही. केवळ माहितीवर आधारित निष्कर्ष चुकीचे ठरतात. निसर्गातील व माणसांमधील अनेक घटकांबद्दल खूप माहिती मिळू शकते व तशी ती जमा झालीही आहे. आता समस्या आहे ती या असंख्य घटकांमधील परस्परसंबंध शोधून काढण्याची. हे परस्परसंबंध पूर्ण चित्र समोर आणतात, नुसती माहिती तसे चित्र देत नाही. हे परस्परसंबंध म्हणजेच नेटवर्क. हे परस्परसंबंध जितेजागते असतात व ते जिवंतपणीच समजून घ्यायचे असतात. नुसते घटक माहीत झाले तर जंत्री तयार होते. जंत्रीतून बौद्धिक आनंदापलीकडे हाती काही लागत नाही. मात्र परस्परसंबंध जेव्हा कळून येतात तेव्हा ती माहिती आपल्याला कृतिशील करू शकते.

'ह्य़ूमन जेनोम प्रोजेक्ट'वरून ही बाब स्पष्ट होईल. माणसाच्या गुणसूत्रांची माहिती या प्रकल्पातून जगासमोर आली. त्यामुळे रोगांवर हमखास इलाज करणारी औषधे शोधता येतील असे सांगितले गेले. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. उलट औषधांची संख्या बरीच कमी झाली. याचे कारण अनेक औषधे कुचकामी आहेत हे नव्या माहितीतून समजले जरी असले, तरी खरे कारण म्हणजे गुणसूत्रांची माहिती झाली असली तरी त्यांच्या आपापसातील परस्परसंबंधांची तितकीशी माहिती आपल्याला अद्याप झालेली नाही. त्यांचे नेटवर्क कसे काम करते हे अद्याप कळलेले नाही. या प्रकल्पातून पुढे आलेली माहिती महत्त्वाची नक्कीच आहे, पण ती पुरेशी नाही. त्यातून रोगाचे डायनॅमिक्स अद्याप कळत नाही, कारण ते डायनॅमिक्स हे गुणसूत्रांच्या परस्परसंबंधांवर अवलंबून आहे. मोबाइल, गुगल वापरणाऱ्या माणसाकडून जशी जिवंत माहिती मिळते, तशी या गुणसूत्रांतून अद्याप मिळायची आहे. त्यासाठी गरज आहे ती नेटवर्किंगच्या विशेष अभ्यासाची.

अल्बर्ट लाझारो बाराबसी हे नॉर्थईस्टर्न विश्वविद्यालयातील 'सेंटर फॉर कॉम्प्लेक्स नेटवर्क रीसर्च'चे प्रमुख आहेत. त्याच्या प्रयोगशाळेतील एक शाखा ही वैद्यक व जीवशास्त्रातील नेटवर्किंगचा अभ्यास करते. बाराबसी यांचा प्रश्न साधा आहे. मोटारीमध्ये सुमारे पाच हजार पार्ट असतात. ती नादुरुस्त झाली की मॅकॅनिक ती दुरुस्त करतो, कारण त्याला सर्व पार्टची माहिती असते. मग शरीरातील सर्व पार्ट माहीत असताना गुंतागुंतीचा आजार झाला की डॉक्टरांना ते सहजतेने दुरुस्त का करता येत नाहीत? याचे उत्तर मॅकॅनिककडे असलेल्या मोटारीच्या ब्लूप्रिंटमध्ये आहे, असे बाराबसी यांचे म्हणणे. या ब्लूप्रिंटमध्ये असलेला 'वायरिंग डायग्राम' हा मोटारीची खरी माहिती देतो, पार्टस् नव्हेत. याचप्रमाणे शरीरातील असंख्य घटकांचे परस्परसंबंध तपासून पाहिले तरच रोग का होतो, कधी होतो व कसा होतो हे समजून घेता येईल. बाराबसींच्या प्रयोगशाळेत हेच केले जाते. अस्थमा, हृदयरोग, कर्करोग अशा आजारात पेशींमधील नेटवर्कमध्ये काय समस्या निर्माण होतात, कोणते नेटवर्क कुचकामी ठरते वा नवे तयार होते याचा अभ्यास तेथे सुरू आहे. रोगाचे पेशीतील मूळ व त्या पेशीचा अन्य पेशींचा येणारा संबंध यावर सर्व लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच ब्रेकथ्रू मिळेल अशी खात्री त्यांना वाटते.

हेच मॉडेल आर्थिक क्षेत्राला लावले पाहिजे असा बाराबसी यांचा आग्रह आहे. मात्र तेथे सर्व माहिती उघड केली जात नाही. रुग्णांची खरी माहिती रुग्णालयांतून मिळते. प्रसंगी त्यांना प्रयोगशाळेत बोलावता येते. आर्थिक क्षेत्रातील सर्व घटकांची अशीच माहिती मिळाली व त्यातील परस्परसंबंध तपासून पाहता आले तर या समस्या सोडविण्यासाठी नवीन दृष्टी मिळेल, असे बाराबसी यांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत आर्थिक विषयांचा अभ्यास होत नाही, पण सामाजिक विषयांचा होतो. वर म्हटल्याप्रमाणे माणसाचा स्वभाव प्रगट करणारी जास्तीत जास्त माहिती जमा करून त्यातील परस्परसंबंध प्रयोगशाळेत तपासून पाहिले जातात. मग लक्षात येते की माणसाला समजून घेण्यासाठी एकच शास्त्र उपयोगी पडत नाही. जीवशास्त्राबरोबर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा अन्य शास्त्रांमधील नेटवर्कही तपासून पाहावे लागते. किंबहुना, नेटवर्क कसे काम करते, या मुख्य प्रश्नाचाही वेध घ्यावा लागतो. आज बाराबसी यांच्यासाठी तोच मोठा प्रश्न आहे आणि पुढील काळात विज्ञानालाही याच प्रश्नावर काम करावे लागणार आहे.

या संशोधनातून दोन मुख्य बाबी पुढे आल्या आहेत. नेटवर्क, मग ते कोणतेही असो, ते नेटवर्क स्वत:चे नियम तयार करते व नियमाबरहुकूम काम करते. जगात अस्ताव्यस्त अशी कोणतीही गोष्ट नाही. घटना घडू लागली की पॅटर्न तयार होतातच आणि त्या साच्याबरहुकूम पुढच्या घटना घडत जातात. भरपूर माहिती जमा झाली व त्यांच्यातील परस्परसंबंध नीट समजला की हे साचे लक्षात येतात.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सर्व माणसांसाठी हे साचे किंवा वर्तणुकीचे पॅटर्न अगदी समान आहेत. ते मोजकेच आहेत, पण सारखेच आहेत. हल्लीचा समाज हा व्यक्तिनिष्ठ आहे. व्यक्तीच्या वैशिष्टय़ांना अधिक महत्त्व दिले जाते. या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली असल्याने जगातील माणसांचा अभ्यास करताना असंख्य वेगवेगळे साचे मिळतील असे बाराबसी यांना वाटले होते, पण तसे त्यांना आढळले नाही. उलट वर्तणुकीचे साचे सारखेच दिसले. मग जगातील पाच प्रमुख खंडातील माणसांची माहिती गोळा करण्यात आली. आफ्रिकेतील माणूस व अमेरिकेतील माणूस यांच्यात फरक दिसला पाहिजे होता. पण तेथेही तो दिसेना. तुलनात्मक अभ्यास करण्याचे प्रकल्प त्यामुळे बंद केले गेले, कारण तुलना करण्याजोगा फरकच आढळेना. जगात कुठेही जा, श्रीमंत असो, गरीब असो, झोपडीत असो, बंगल्यात असो, स्त्री असो पुरुष असो, माणसाचे वर्तन ठरविणारे साचे सारखेच आहेत. 'माणसांमधील फरक शोधणे हेच मोठे आव्हान झाले आहे, कारण जमा होत असलेली अवाढव्य माहिती माणसातील साम्यच ठळकपणे दाखविते,' असे बाराबसी यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या भारतीय तत्त्वविचाराची खात्री पटविणारा हा अस्सल पुरावा आहे.
अजून कित्येक डेटा शास्त्रज्ञांसमोर आलेला नाही. कंपन्या तो देत नाहीत. हा डेटा संशोधनासाठी मिळावा म्हणून काही शास्त्रज्ञांनी मोहीम सुरू केली आहे. माणसाला समजून घेण्यासाठी त्यांना ही माहिती हवी आहे, उत्पादन खपविण्यासाठी नव्हे. या संशोधनाचे महत्त्व आणखी एका गोष्टीसाठी आहे. जगातील जिवंत माहिती फक्त साचे निर्माण करीत नाही, तर ती स्वत:च स्वत:चे नियंत्रण करते, स्वत:ची व्यवस्था लावते. याबद्दलचा बाराबसी यांचा संशोधन निबंध जगात गाजतो आहे. एडवर्ड डी बोनो यांनी दोन दशकांपूर्वी 'सेल्फ ऑर्गनायझिंग सिस्टीम' अशी मनाची ओळख करून दिली होती. तो प्रकार प्रत्यक्षात कसा घडतो ते आता पाहता येते. माणूस गोंधळ घालतो आणि व्यवस्थाही निर्माण करतो. हे सर्व कळत-नकळत होत असते. परस्परसंबंधांचे जाळे कळले की माणसाला स्वत:चीच ओळख होईल. तो शहाणा होण्यासाठी याचीच गरज असते आणि भारतीय अध्यात्मही याचाच आग्रह धरते.

- प्रशांत दीक्षित

Friday, December 27, 2013

अंधश्रद्धा नकोच.....शिवराज गोर्ले.

अंधश्रद्धा नकोच ! ! 'परमेश्‍वराला रिटायर करा!' असं डॉ. श्रीराम लागू यांनी जाहीर आवाहन केलं होतं, तेव्हा त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. "लोकांनी देव या कल्पनेचा त्याग करावा' असाच त्यांचा आजही आग्रह असतो. याचं कारण सगळ्या अंधश्रद्धेचं मूळ "देव' या कल्पनेत आहे, असं त्यांना ठामपणे वाटतं. माणसानं तर्कानं, विवेकानं जगावं. भाबड्या, भ्रामक कल्पनांच्या आधारे नव्हे, तर स्वतःच्या बुद्धीच्या आधारानं; वैज्ञानिक दृष्टीनं जगावं, असं त्यांना सुचवायचं आहे आणि त्यात चुकीचं तर काहीच नाही. हे सगळं खरं असलं तरी लोक देवाला रियाटर करायलाच काय, थोडीबहुत रजा द्यायलाही तयार नाहीयेत. त्यातून आपल्याकडे तर तेहतीस कोटी देव. देवांची अगदी रेलचेल आहे. दिवसेंदिवस देवळेही वाढताहेत. देवांचे उत्सवही मोठ्या थाटामाटात केले जाताहेत. त्यांना "धर्माचं' पाठबळ असतं. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी "आयटी'त करिअर करणारे तरुण-तरुणीही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला तास न्‌ तास रांगेत उभे राहतात. त्यातून अमिताभ बच्चनसारखा सुपरस्टार पहाटे उठून घरापासून अनवाणी चालत, सिद्धिविनायकाला येतो तेव्हा लोकांच्या श्रद्धेतही "ग्लॅमर'ची भर पडते. एक तर मान्य करावं लागतं, "देव' ही संकल्पना युगानुयुगे चालत आली आहे. देवानं माणूस निर्माण केला की माणसानं देवाला जन्म दिला, यावर चर्चा होत राहतील; पण देव ही माणसाची एक "गरज' आहे असं दिसतंय. अत्यंत कडक नास्तिक मंडळीही आयुष्याच्या अखेरीस "देव असेल का हो?' असा विचार करीत असल्याचीही उदाहरणं आहेत. तात्पर्य काय, "देव आहे की नाही' याचं ठोस उत्तर देता येणार नाही. कुणी दिलं तर ते मान्य केलं जाणार नाही. "देव मानता का?' या प्रश्‍नातच त्याचं खरं उत्तर आहे. "जो मानावा' लागतो, त्याच्या अस्तित्वाचा पुरावा कसा देणार? आता पुढचा प्रश्‍न. देव संकटातून तारतो का? या प्रश्‍नाचं उत्तर असं देता येईल- संकटं दोन प्रकारची असतात. खरी आणि आभासी. भूकंप, त्सुनामी या खऱ्या संकटांतून देव तारू शकत नाही असंच दिसतं. भूकंपात फक्त अश्रद्ध माणसंच गाडली जातात असं होत नाही. मात्र "भुताची भीती' या आभासी संकटातून एखाद्याला "रामनाम' तारून नेऊ शकतं! त्या प्रसंगी आवश्‍यक ते "बळ' देऊ शकतं, अर्थात "भूत वगैरे काही नसतं!' हा विवेक दृढ असेल तर केव्हाही अधिक श्रेयस्कर. खऱ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात; पण श्रद्धेमुळे अशा प्रसंगीही मानसिक बळ व शांती मिळते, असा अनेकांचा अनुभव असतो. आता "योगशास्त्र' जगभर अभ्यासलं जातंय. "योग' म्हणजे देवाशी जोडलं जाणं असंच म्हटलं जातं.हा विषय गहन आहे. एका छोट्याशा लेखात "जळी स्थळी' असणाऱ्या "देवा'ला कसं बसवणार? "मजेत जगावं कसं?' या माझ्या पुस्तकात मी हा गहन प्रश्‍न माझ्या पद्धतीनं सोडवून टाकला आहे, कसा ते इथं थोडक्‍यात सांगतो. देव म्हणजे काय, याचं एक सर्वमान्य उत्तर असतं, देव म्हणजे अनादि, अनंत शक्ती. बरं, देवाचा अंश प्रत्येकात असतो असंही म्हटलं जातं. आता आपल्या प्रत्येकात हा अंश कुठल्या स्वरूपात असतो? आपल्या "अंतर्मनाची अमर्याद शक्ती' ही मानसशास्त्रानं स्वीकारलेली संकल्पना आहे. ही अमर्याद शक्ती म्हणजे त्या अनादि, अनंत शक्तीचा अंश असू शकेल, नाही का? आपण "स्वयंसूचना' देऊन अंतर्मनाची शक्ती जागी करू शकतो, वापरू शकतो हेही मानसशास्त्रीय सत्य आहे. देवाची आपण प्रार्थना करतो तेव्हा देव ऐकतो की नाही, माहिती नाही; अंतर्मन नक्की ऐकत असतं. थोडक्‍यात काय, प्रार्थना ही एक स्वयंसूचनाच असते. स्वतःसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपण "इच्छाशक्ती' वापरतो. इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा शुभेच्छांची शक्ती वापरतो! बस्‌, माझ्यापुरता हा तिढा मी असा सोडवला आहे. मग माझ्या घरात देवाचा फोटो नाही, मी देवळात जात नाही, याचा मला काही त्रास होत नाही. लोक पूजा, कर्मकांड करतात, ती त्यांचं मन गुंतण्यासाठी करतात असं मी मानतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा - श्रद्धेचे काही लाभ नक्कीच असतात. श्रद्धा ही एक शक्तिशाली भावना आहे. प्रत्येक भावनेत ताकद असतेच. प्रेम, देशभक्ती यात सकारात्मक ताकद असते, तर रागात नकारात्मक श्रद्धेमुळे बळ लाभू शकतं. श्रद्धा तुम्ही कशावरती ठेवता, हा मुद्दा दुय्यम ठरतो. ती दगडाच्या मूर्तीवर असू शकते, जिवंत व्यक्तीवर असू शकते, तत्त्वावर असू शकते. गांधीजी परमेश्‍वर मानी; पण "सत्य हाच परमेश्‍वर' असंही म्हणत. देवावर श्रद्धा ठेवणारे जर असत्य वागतअसतील तर ते देवाचा विश्‍वासघात करतात, असंच म्हणावं लागेल. देव म्हणजे सर्व सद्‌गुणांचं प्रतीक असेल तर तो सत्य, अहिंसा, प्रेम, सदाचार, चांगुलपणा याचंच प्रतीक असायला हवा. देवावर श्रद्धा ठेवणारे, सत्यावर, प्रेमावर, अहिंसेवर, चांगुलपणा व सदाचारावर श्रद्धा ठेवतात का, हा खरा मुद्दा आहे. वर्षभर भ्रष्टाचार करणारी मंडळी वर्षातून एकदा बालाजीला जाऊन मुंडन करतात आणि स्वतःच्या डोक्‍यावरचं पापाचं ओझं त्याच्या चरणी उतरवतात, हा एक गमतीदार विरोधाभासच आहे. देव काय पापं टांगण्याची खुंटी असतो? अमका देव नवसाला पावतो, ही अंधश्रद्धा असेल नसेल; ती देवादेवात भेदभाव करणारी नक्कीच आहे. बाकीचे देव काय कमी दर्जाचे, कमी पॉवरफुल्ल असतात का? मुळात नवस बोलून देव पावतो, हेही पटत नाही. देव काही शासकीय अधिकारी नसतो, त्याला नवसाची "लालूच' कशाला हवी? तो तर भावाचा भुकेला असतो! देवाकडं काही मागण्यासाठी भक्ती करणं, ही निरपेक्ष भक्तीच नव्हे. देवानं शरीर दिलंय, बुद्धी दिलीय, आणखी काही मागायचं कशाला? शेवटी हे तर खरंच ना, की "गॉड हेल्प्स देम हू हेल्प देम सेल्व्हज्‌!' सचिन तेंडुलकर देव मानत असला तरी तो प्रयत्नांत काहीच कसर ठेवत नाही, हे महत्त्वाचं. "यू डू युवर बेस्ट; गॉड विल डू द रेस्ट!' यातलं "डू युअर बेस्ट' हेच खरं. बाकीचं मग देव, नियती, परिस्थितीवर सोडून द्यावं. "श्रद्धावान लभते ज्ञानम्‌! असंही म्हणतात. गुरूवर श्रद्धा ठेवावी लागते कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी तपासून बघता येत नसते. पण मिळालेल्या ज्ञानाची वेळोवेळी चिकित्सा करावीच लागते. तशीच ती "धर्मा'चीही करावी लागते. प्रत्येक श्रद्धा ही खरं तर अंधश्रद्धाच असते असं म्हणतात. कारण श्रद्धेचा अर्थच "पुराव्या'शिवाय ठेवलेला विश्‍वास'. हे खरं असलं तरी कुणावर आणि कशावर श्रद्धा ठेवावी, हे आपण डोळसपणे ठरवू शकतो! श्रद्धेच्या मर्यादाही माहिती हव्यात. श्रद्धेमुळे मनःशांती मिळू शकते; नोकरी नाही मिळू शकत किंवा परीक्षेत सर्वोत्तम गुणही मिळत नाहीत! अलीकडे बाबा, बापूंचं प्रस्थ वाढतं आहे. काही तर विष्णूचे अवतार मानले जातात. मुळात "विष्णू' होता की नाही यावर वाद आहेत, तर त्याचा "अवतार' कसा मानायचा? ही "डोळस श्रद्धा' म्हणता येईल का? आणि हो आताशा टीव्हीवर "शिवशक्ती कवच', "महालक्ष्मी कवच' या जाहिराती झळकत आहेत. सोन्याचं ते कवच विकत घेतलं की घरात पूर्ण समृद्धी. संकटं सगळी म्हणे गायब! किती छान! सरकारनं ही कवच घेऊन घरटी वाटून टाकावीत म्हणजे दे शात समृद्धी नांदेल. संकटं येणारच नाहीत! आपण सश्रद्ध आहोत की मूर्ख? अभिनव कल्पनाच प्रभावी!

Tuesday, December 24, 2013

एक सुंदर लेख....श्री हेंमंत सहस्रबुद्धे.

दिनांक – २४/१२/२०१३ मंगळवार सकाळी ११.२७

ज्योतिषशास्त्र – भाग १

मित्रांनो अवश्य वाचा हा लेख आणि लाभ करून घ्या ....लेख मोठा आहे, वाचायचा कंटाळा करू नका.....नक्की आवडेल .... संग्रही ठेवाच ....माझे फोन नंबर्स आहेत – 9158510598 / 9890369845 .

आज पर्यंत अनेक विद्वान आणि सामान्य माणसांना ज्योतिष हे खरे की खोटे, ते शास्त्र की अशास्त्र या विषयाने भंडावून सोडले आहे. तरीही जगात अनेक लोकांनी याचा सकारात्मक उपयोग करून घेतला आहे. विदेशात यावर प्रचंड काम झाले आहे. मी काही ज्योतिषातील किंवा विज्ञानातील [ या दोन्ही गोष्टी शिकलो असलो तरीही] कोणी अधिकारी व्यक्ती नाही. किंवा माझा शब्द म्हणजे यातील अंतिम शब्द नव्हे. पण एका नव्या दृष्टीने अभ्यास करायला काय हरकत आहे. मी माझा विचार मांडतो आहे.

प्रेम हे सुद्धा शास्त्राच्या कसोटी वर उतरणार नाही कदाचित म्हणून ते त्याज्य कसे ठरू शकेल? ज्योतिष या विषयाचे असेच आहे. अभ्यास कमी पडत असेल.....संबंध मानवी मनाशी आणि आपल्या हातात नसलेल्या घटनांशी आहे ....त्यामुळे ज्योतिष खोटे ठरू शकते????...हवामान खाते रोज खोटे ठरतेय शास्त्र असून, इलेक्ट्रोन अजून कोणी पाहिला नाहीये कारण त्याला पहायला गेले की तो जागाच सोडतो त्यामुळे त्याचा अभ्यासच करता येत नाही ....एका क्वार्कने उजवा स्पिन घेतला की त्याचा समसंबंधी दुसरा क्वार्क प्रचंड दूर असला तरी उलटी फिरकी घेतो हे केवळ गणिता वरून शास्त्रज्ञ म्हणतात....प्रकाश कण आहे की लहर आहे हे अजून कळले नाहीये....अशा अनंत गोष्टी कळल्या नाहीत तरी आख्ख्या विज्ञानाला कोणी खोटे ठरवत नाही ना? मुळात हा अभ्यास खूप कठीण, गहन आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनाचा आहे.....आणि अशा किचकट मानवी घटनांचा आहे ..आणि आपल्या ज्या ऋषींनी आपल्या या महान धर्माची उभारणी केली, सण, उत्सव, परंपरा, अतिशय प्रगत असे आहार शास्त्र, आयुर्वेद ज्या ऋषीमुनींनी दिला त्यांनीच हे शास्त्र सांगितले आहे. आणि हे धर्मशास्त्र आहे हेच मुळी चूक आहे....फक्त धर्माने सांगितले की माणूस ऐकतो म्हणून केवळ धर्माशी ते जोडले आहे.

आकाशात जसे ९ ग्रह आहेत – सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू तशा आपल्या शरीरात थालामास. हायपोथालामास, पिच्युटरी, पिनिअल, थायरॉइड थायमस, Adrenal , सेक्स गोनाड्स, यकृत, स्वादुपिंडे अशा ग्रंथी आहेत.....सूर्य म्हणजे थालामास, चंद्र म्हणजे हायपोथालामास, गुरु म्हणजे पिच्युटरी, बुध म्हणजे पिनिअल ग्रंथी तसेच थायमस या बालपणातच कार्यरत असणाऱ्या ग्रंथीवर आणि मज्जातंतूंवर देखील बुधाचा प्रभाव, मंगळ म्हणजे थायरॉइड, Adrenal वर मंगळ आणि शनी दोन्हीचा प्रभाव, शुक्र ग्रहाचा लैंगिक ग्रंथी अथवा सेक्स गोनाड्स आणि मूत्रपिंडानवर प्रभाव असतो, स्वादुपिंडानवर सूर्याचा प्रभाव तर यकृतावर गुरुचा आणि शनिचा प्रभाव, शनिचा प्लीहेवर [स्प्लीन] प्रभाव असतो आणि एकूणच पचनावर नियंत्रण असते...... राहू आणि केतू हे शरीरातील ग्रंथींच्या कामात विघ्न, वितुष्ट आणणारे असेंडिंग आणि डीसेन्डींग नोड्स आहेत. उत्तर आणि दक्षिण ध्रुव असावे तसेच.

आकाशस्थ ग्रहांकडून येणारया किरणांचा यावर नक्की प्रभाव पडतो. आईच्या पोटातून बाळ जन्माला येण्यापूर्वी ते नाळेने आईशी जोडले गेलेले असते आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असते. ज्या क्षणी ते पृथ्वीवर पहिले पाउल ठेवते त्या क्षणाला त्याच्या शरीरातील या सगळ्या ग्रंथी काम करणे सुरु करतात. आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणारा तक्ता म्हणजे आपली कुंडली किंवा पत्रिका .... आईच्या पोटातून बाळ जन्माला येण्यापूर्वी ते नाळेने आईशी जोडले गेलेले असते आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असते. ज्या क्षणी ते पृथ्वीवर पहिले पाउल ठेवते त्या क्षणाला त्याच्या शरीरातील या सगळ्या ग्रंथी काम करणे सुरु करतात. आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणारा तक्ता म्हणजे आपली कुंडली किंवा पत्रिका ....या ग्रंथींमधून पाझरणारे हार्मोन्स किंवा संप्रेरके एकमेकांशी कसे, कुठे, किती, का, केव्हा व्यक्त होतात किंवा React होतात त्यावर आपले वागणे अवलंबून असते. आपली मानसिक स्थिती बदलेल तसे हे प्रत्येक निमिषार्धात बदलत असते. [ एक निमिष – पापणी लावण्याचा काल]. मग याचे प्रेडिक्शन किंवा भाकीत करणे किती अवघड असेल याचा तुम्हीच विचार करा. तुम्ही पत्रिकेचा तटस्थ राहून [ पत्रिका खरी नाहीच अशी ठाम समजूत काही काळ बाजूला ठेऊन] अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की ....होय बऱ्याच गोष्टी जुळताहेत.....पुढचा त्रास वाचवायला त्याचा नक्की उपयोग होतोय.....पण काय आहे ना .....आपले एकदा मत झाले की झाले....मग त्याच दृष्टीने विचार करायचा....हे ठीक नाही .......आजच्या खगोल विज्ञानाची सगळी मांडणी ऋषींनी जे खगोल शास्त्र मांडले होते ना त्यावरूनच झाली आहे. प्रकाशाच्या वेगाने गेले तर आपले वस्तुमान नष्ट होते. त्यामुळे अनेक प्रकाश वर्षे दूर असलेल्या तारयांचा यंत्राने, याने वापरून कोणीही अभ्यास करू शकत नाही हे ऋषींनी जाणले होते म्हणून त्यांनी हे ध्यान प्रक्रियेतून हे सारे जाऊन घेतले....आजच्या खगोल विज्ञानाची सगळी मांडणी ऋषींनी जे खगोल शास्त्र मांडले होते ना त्यावरूनच झाली आहे. प्रकाशाच्या वेगाने गेले तर आपले वस्तुमान नष्ट होते. त्यामुळे अनेक प्रकाश वर्षे दूर असलेल्या तारयांचा यंत्राने, याने वापरून कोणीही अभ्यास करू शकत नाही हे ऋषींनी जाणले होते म्हणून त्यांनी हे ध्यान प्रक्रियेतून खगोल, अंतराळ जाणून घेतले....पाश्च्यात्यांनी या नक्षत्रे, ग्रहांना ठेवलेली नावेही बरीचशी आपल्या नावांशी साधर्म्य दाखवणारी आहेत. शनैश्चर म्हणजे शनीचा अपभ्रंश Satturn ...सूनु हा सूर्यासाठी असलेला संस्कृत शब्द आहे त्यावरून सन आले आहे. आपल्या ऋषींनी सांगून ठेवलेय की चंद्र हा पृथ्वीचा पुत्र नसून मंगल म्हणजे भौम [भूमीचा पुत्र, भूमी पासून निघालेला ] हा भूमीचा पुत्र आहे. आणि प्रशांत महासागर अर्थात Pacific महासागराचे जेव्हढे क्षेत्रफळ आहे तेव्हढेच मंगळाचे आहे. मंगळावर आता पाणी सापडल्याच्या बातम्या आणि फोटो आलेत.....चंद्र शुष्क आहे....त्याचे वय पृथ्वी पेक्षा जास्त आहे आणि चंद्र बाहेरून पृथ्वीच्या वातावरणात नंतर पकडला गेला आहे..... आपले धर्मशास्त्र हे “ओम ब्रुम फट” आणि भगवे कपडे घालून हरी हरी करा असे काहीतरी नुसते करायला शिकवते हे आधी डोक्यातून काढून टाका.....आणि त्याला ऋषींनी "शास्त्र" म्हंटले आहे इतकेच लक्षात घ्या म्हणजे पुरेल .....
ग्रहांच्या जाती म्हणजे ते कुठल्या वेळेस कसे वागतील हे सोपेपणाने कळावे म्हणून त्यावेळेस, त्या कालानुसार दिलेली उपमा.....आजही झाडांच्या प्रकारांना जाती आहेतच ... ज्योतिषशास्त्र चातुर्वर्ण्याचा पुरस्कार नाही करत ....ती त्या कालानुसार त्या त्या ग्रहांची वागण्याची पद्धत सांगण्याची संकल्पना होती. आणि राहू केतु हे ग्रह नाहीत. सूर्य चंद्र फिरत असताना जे संपात बिंदू तयार होतात ते म्हणजे राहू केतू आहेत हेही तिथे स्पष्ट सांगितले आहे. आपण त्याची उकल करायला कमी पडलो म्हणून ते खोटे ठरवणे हा अहंकार नाही का? एखादी गोष्ट खोटे ठरवायला फार अभ्यास नाही लागत....तुलनेने ते सोपे असते....खरे ठरवणेच अवघड असते.....आणि नेमके होते हे आहे की विज्ञान आणि ज्योतिष हे दोन्ही शिकलेले हे सांगायला पुढे येत नाहीयेत .....कारण खोटे ठरवणारे हे झाले की ते, ते झाले की ते ....असे कुठलेतरी सिद्ध न झालेले संदर्भच देऊन बोलत रहातात.....मग हा संवाद न होता वाद होतो.....त्यामुळे अभ्यासु व्यक्ती अशा ठिकाणी फिरकत नाहीत.....सारया जगात ज्योतिषाचा प्रचार, प्रसार आहे. ते देश त्याचा उपयोग करून घेत आहेत. किरोने सांगितलेली भविष्ये जागतिक स्तरावर खरी ठरली आहेत.....आपण ६० - ७० वर्षे आयुष्य असलेले काही वर्षांचे क्षणिक पथिक हा हजारो वर्षांचा ठेवा ४ बुके शिकलो म्हणून पुसू शकतो काय? आणि त्याही पेक्षा तो पुसावा काय?

आपण थोडक्यात या ग्रंथींचे कार्य कसे चालते हे पाहू. आणि आपले शरीर केवळ या ग्रंथींवर चालत नसून या ग्रंथी पाठीच्या कण्यात किंवा कण्याजवळ असलेल्या मज्जातंतूंच्या जुडग्याला Ganglion असे म्हणतात. [Anatomy - a concentrated mass of interconnected nerve cells. / Pathology - a cystic tumor formed on the sheath of a tendon. In neurological contexts, ganglia are composed mainly of somata and dendritic structures which are bundled or connected. Ganglia often interconnect with other ganglia to form a complex system of ganglia known as a plexus. Ganglia provide relay points and intermediary connections between different neurological structures in the body, such as the peripheral and central nervous systems. ]. चक्रांविषयी अधिक माहिती मी माझ्या चक्रे या लेखात देईन.

आलं लक्षात? हे गांग्लिया म्हणजेच Plexuses होत. भारतीय ऋषींनी यांना चक्रे, दले किंवा कमळे म्हंटले आहे. यांची रचना सुद्धा कमळांच्या दळांसारखीच म्हणजे पाकळ्यांसारखीच असते. या चक्रांमधून म्हणजे Ganglion च्या जुडग्यांच्या मधून त्या त्या अवयवात मज्जातंतू गेलेले असतात. तर या चक्रांच्या द्वारा मेंदू मणक्यातून शरीराशी संपर्क ठेवत असतो. आणि यातून जे संदेश येत जात असतात त्याला प्रतिसाद देत शरीरातील Glands म्हणजे ग्रंथी काम करत असतात. यांना बाहेर घडणारया गोष्टींचे ज्ञान डोळे, कान, स्पर्शेंद्रीये, कान हे देत असतात. जिभेला चव कळते. तर मग बघा हे काम किती गुंतागुंतीचे आहे. एखाद्या मुलीला तिच्या प्रियकराचे नाव घेऊन चिडवले तर तिचे गाल लाल होतात, सभेत भाषण करायची वेळ आली की पाय थरथरायला लागतात, सारखी लघवीला लागते. हे सारे व्यापार ग्रंथी आणि चक्रे यांनी घडवून आणलेले असतात.

Thamamus [ आपल्या भाषेत सूर्य] मेंदूत ही सर्वात वर असणारी ग्रंथी आहे. हा या सर्व ग्रंथींच्या कामावर दृष्टी ठेऊन असतो. सूर्य म्हणजे आत्मा.....आत्मविश्वास....तिचा खालचा भाग म्हणजे Hypo-Thalamus [ आपल्या भाषेत चंद्र]. “चंद्रमा मनसो जात:” चंद्र म्हणजे माणसाचे मन होय. या सारया ग्रंथींचा व्यवस्थापक म्हणजे ही हायपोथालामस ग्रंथी होय. आपले मनच सुख आणि दु:ख भोगत असते आणि जे आहे त्यापेक्षा ते मोठे करून बघत असते. उष्णता आणि थंडी याला दिला जाणारा प्रतिसाद, पाणी, इलेक्ट्रोलाईट्स, साखर, स्निग्ध पदार्थ यांची चयापचय क्रिया, भूक वाढ, पचन, झोप, घाम अशी बरीच कार्ये अवस्थली म्हणजे हायपोथालामस म्हणजे चंद्र या ग्रंथी कडून पोष ग्रंथी म्हणजे पिच्युटरी म्हणजे गुरु ग्रंथीला दिल्या गेलेल्या सुचनेनुसार होत असतात. पिच्युटरी म्हणजे पोष ग्रंथी किंवा गुरु ग्रंथीचे “Antiriar आणि postiriar म्हणजे पुढचा आणि मागचा असे २ भाग असतात. ही ग्रंथी पोषण देण्यास मदत करते. इतर ग्रंथींना स्त्रवण्यास उद्युक्त करते. म्हणून पोष ग्रंथी आणि हिच्या हार्मोन्सना Trophic हार्मोन्स किंवा पौष्टिक संप्रेरके म्हणतात. बुध म्हणजे पिनिअल ही ग्रंथी प्रकाश संवेदी ग्रंथी आहे. म्हणजे प्रकाशात ती कार्यरत होते. तिच्यातून Melatonin नावाचे हार्मोन स्त्रवते. या ग्रंथीतून जे सिराटोनीन नावाचे हार्मोन स्त्रवते त्यामुळे शांत झोप लागते. मनाची अवस्था चांगली रहाते. शरीरातील केसांच्या वाढीवर या ग्रंथीचे नियंत्रण असते. जास्त उन्हात हिंडल्यास ही ग्रंथी जास्त कार्यरत होऊन शरीरावर केस वाढतात. किंवा ते पिकतात. म्हणून स्त्रियांनी डोक्यावर पदर घेण्याची प्रथा आली असावी. म्हण आहे ना की “आत्याबाईला मिशा असत्या तर?” स्त्रियांना दाढी, मिशा चांगल्या दिसणार नाहीत. सध्याच्या मानवात त्याच्या चुकीच्या वागण्याने या ग्रंथीचे कार्य जवळपास लोप पावले आहे. शंकरांचा ३ रा डोळा दुसरा तिसरा कोणताही नसून ही ग्रंथीच होय. कारण ही फोटो-सेन्सेटिव्ह म्हणजे प्रकाशाने उत्तेजित, उद्दीपित होऊन कार्य करणारी आहे. पण अजूनही शास्त्रज्ञांना या ग्रंथीचे कार्य पूर्णपणे समजलेले नाहीये. मन शांत ठेऊन डोळ्यांद्वारा बाहेरचे ज्ञान करून देणे हे या ग्रंथीचे काम म्हणता येईल....ज्याला आपण Jet Lag म्हणतो ते झाले म्हणजे विमानाने प्रवास करून आपण वेगळ्या देशात जिथे दिवस रात्र वेगळ्या वेळेस आहेत तिथे आपला दिवसाचा दिनक्रम बदलून आपल्याला शारीरिक त्रास जाणवतो, आपले रोजचे चक्र ज्याला “Circadian Cycle” असे म्हणतात ते बिघडते. याला कारण हा बुध बिघडतो..... मंगळ जसा शक्ती, उर्जा, धाडस देणारा ग्रह आहे त्याप्रमाणेच Thyroid [ अवटू आणि परा- अवटू हे तिचे दोन भाग- गणपतीच्या भाषेत या त्याच्या २ कार्यकारी शक्ती ऋद्धी- सिद्धी होत. मंगळ ग्रहाच्या भाषेत हे त्याचे २ उपग्रह Dymo आणि Fobos होत.] किंवा ही ग्रंथी शरीराला उर्जा, शक्ती पुरवते. तसेच पराअवटू ही ग्रंथी शरीरातील Calcium चे संतुलन राखते. स्वादुपिंडातील अल्फा आणि बीटा या दोन प्रकारच्या पेशी वेगवेगळी कामे करतात. अल्फा Glucagon, तर बीटा इंश्युलीन निर्माण करून शरीरातील साखरेचे पचन करतात. मूत्रपिंडे म्हणजे किडनीज किंवा किडन्या या रक्त गाळून लघवीवाटे शरीरातील न पचलेली, दुषित द्रव्ये बाहेर काढतात. पण या किडन्यांवर असलेल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणजे Adrenal Glands या आपण घाबरतो तेव्हा आपल्याला मदत करतात. जे म्हंटले जाते की आपण संकटात असताना आपण ३ पैकी १ कृती करतो.... Flee, Fright ओर Fight म्हणजे जर एखाद्या जंगलात आपल्या समोर सिंह आला तर आपण काय करू? पळून जाऊ, घाबरून तिथेच मटकन खाली बसू किंवा सिंहाशी लढू....हे सारे या Adrenal ग्रंथीतून जो हार्मोन स्त्रवेल त्यावर अवलंबून असते.... यकृत हा शरीरातील कामाचा एक कारखाना आहे. तिथे अनंत घडामोडी, अनंत कामे सतत चालू असतात. हृदय हे केवळ रक्त शुद्ध करून शरीराला पुरवणारा एक पंप नसून त्याचे वरचे कप्पे Atria मधून Atrial Natriuretic Factor नावाचे एक संप्रेरक स्त्रवते. हे संप्रेरक इतर स्त्रावांशी हातमिळवणी करून रक्तदाब आणि रक्ताचे आकारमान यांचे मियंत्रण अचूक होण्यास मदत करते. “हृदय” या शब्दाचा अर्थ आपण पाहू. “हर” म्हणजे हरणे, काढून घेणे [जसे रावणाने सीतेचे हरण केले. हरीण नव्हे.]. “द” म्हणजे देणे आणि “य” म्हणजे नियमन करणे. [ बघा यम आणि नियम यात य आहे.]. याचाच अर्थ हृदय हे रक्त आधी शरीरातून काढून घेते, ते परत देणे शरीराला आणि त्याचे शरीरात उत्तम नियमन करते. म्हणजे रक्तदाब योग्य ठेवते.

पुढे ज्या वेळा देतो आहे त्या वारा नुसार त्या त्या वेळा टाळून शुभ कार्य करावे. या काळाला राहू काल म्हणतात. या काळात अपयश येण्याची शक्यता असते. विश्वास असेल त्यांनी करावे, नसल्यास सोडून द्यावे. प्रयोग करून बघण्यास हरकत नाही. घरच्या कॅलेंडरवर या वारांना या वेळा लिहून ठेवा.

सोमवार- सकाळी साडेसात ते नऊ.
मंगळवार – दुपारी तीन ते साडेचार.
बुधवार – सकाळी बारा ते दीड.
गुरुवार – दुपारी दीड ते तीन.
शुक्रवार – सकाळी साडेदहा ते बारा.
शनिवार – सकाळी नऊ ते साडेदहा.
रविवार – संध्याकाळी साडेचार ते सहा.

Thursday, December 12, 2013

छान वाचावंसं वाटणारं....

देव भूकेला श्रद्धेचा कि प्रसिद्धिचा ?
एकदा मच्छिंद्रनाथ एका गावात भीक्षा मागायला आले. एका घरासमोर उभे राहून "अल्लख निरंजन" असे म्हणताच घरातून एक बाई चिमूटभर पीठ घेऊन आली. हे पाहताच नाथ म्हणाले "बाई शेरभर तरी पीठ दे ग". त्यावर बाई रागावली व त्यांना निघून जायला सांगीतले. संपूर्ण गाव फिरले परंतु कुणीच त्यांच्याशी सन्मानाने बोलेना. काही मुले त्यांची टवाळी करु लागले. शेवटी वैतागून ते परतले. नाथ आलेत हे पाहून गोरक्षनाथ उभे राहिले. झोळी रिकामी होती. नाथ गोरक्षांना म्हणाले "गोरख आता जगाला आपली गरज राहीलेली नाही. भीक्षा तर मिळत नाही पण टवाळी मात्र होते." नाथांनी झालेला प्रकार सांगितला. त्यावर गोरक्षनाथ म्हणाले "गुरुदेव, जगाला काय हवे आहे हे मला चांगले ठाऊक आहे. उगाच लोकांना दोष देऊन अर्थ नाही. आपणच बदलायला हवे. मीच त्या गावात जातो. थोडया वेळाने तुम्ही तिथे या आणि मी तुम्हाला दाखवेन लोकांना नेमके काय हवे आहे ते?" ठरल्याप्रमाणे गोरक्षनाथ गावाच्या मोठया चौकापाशी आले. तिथे बरीच गर्दी होती. ते चौकाच्या मध्यभागी आले आणि आपल्या काखेतली काठी हवेत भिरकावली ती तशीच हवेत स्थिर राहीली आणि स्वतः काठीच्याही वर जाऊन हवेत मांडी घालून स्थिर झाले. हे पाहून लोकांनी गर्दी केली. हार, नारळ, फळे घेऊन लोकांनी त्यांना नमस्कार केला. थोडया वेळात मच्छिंद्रनाथ तिथे आले व गोरक्षांनी नाथांना सांगितले की लोकांना हेच हवे आहे. चमत्कार तिथे नमस्कार. सांगायचे तात्पर्य इतकेच की त्या काळी घडलेली ही घटना आजच्या काळातही तितकीच लागू पडते. चमत्कार तिथे नमस्कार. लोकांनी उगाच गैरसमज करुन घेतला आहे की साधू-संतांचा जन्म हा चमत्काराकरीता झाला आहे. साधू-संत चमत्कार करत नाही. त्यांचे असणे हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. लोकांची काय विपरीत श्रद्धा असते ते पहा? ज्याचे मठ मोठे तो खरा संत, ज्याचे भक्तगण जास्त तो खरा संत. महर्षी व्यास, ज्ञानेश्वर यांसारख्या सत्पुरुषांच्या भारत राष्ट्रात असे अधर्म घडणे म्हणजे खेदकारकच आहे. संत हे चारित्र्यवान असले पाहिजे चमत्कारीक नव्हे. जसे संतांच्या बाबतीत घडले तसेच देवाच्या बाबतीतही घडले. "प्रतिमेची पूजा करीता करीता. तो स्वतः पाषाण झाला. मानवाचा छंद सारा. देवाचा बाजार झाला." अहो, गणपती दुध काय पीतो? केरळमध्ये मेरीच्या मूर्तीच्या नेत्रांतून अश्रुपात काय होतात? मुंबईच्या समुद्राचे पाणी गोड झाल्यामुळे माहीमच्या दर्ग्यातील गर्दी वाढते. दर्ग्यातील कबरीवरच्या चादरीचे लोक चुंबन काय घेतात? अरेरे... असल्या विपरीत श्रद्धेच्या माणसांपेक्षा नास्तिक माणूस परवडला. पुराणांत असे वर्णन आहे की कलियुगात भोंदूपणा वाढेल, ज्यांचा अधिकार शून्य त्यांचे महत्व वाढेल. त्यामुळेच प्रसिद्धिच्या नादात अनेक लोक (जे स्वतःला संत म्हणवून घेतात) त्यांनी श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरु केली. लोकांच्या श्रद्धेच्या बळावर पैसा कमवला. यात प्रामुख्याने दोष लोकांचाच आहे. हिंदु धर्मात इतके विशाल ग्रंथ असताना भोंदूंच्या नादी लागण्याचे कारणंच काय? याचा अर्थ गुरु करु नये असे नव्हे. पण गुरु हा परंपरेतला असावा लागतो. तेव्हाच त्याला अनुग्रह देण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता कुणीही कुणाला अनुग्रह देत असतात. जणू गुरुंचा अनुग्रह म्हणजे निवडणूकीचे तिकीट वाटप आहे. कसला हा भोंदू कारभार आणि कुठे फेडणार ही पापं. आता मूर्तिपूजेचेच पहा ना. ईश्वराकडे जाण्यासाठी "मूर्तिपूजा" हा एक रामबाण उपाय आहे. निर्गुण निराकार ईश्वराच्या चरणी मनुष्य सहजासहजी एकरुप होत नाही. माणसाचे मन हे फ़ार चंचल असते. ते क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. मानसपुजेने मन स्थिर होत नाही. मनाची एकाग्रता साधावयाची असेल तर समोर ईश्वराचे प्रतीक हवे म्हणून मूर्तिपूजा. मुर्तिपूजा हे अज्ञान नसून अप्रतिम विज्ञान आहे.
प्रतीके केवळ हिंदु धर्मातच नाही अन्य धर्मातही आहेत. ख्रिस्तांचा क्रूस असो, मुसलमानांचा पीर किंवा मंत्रयुक्त तसबीर असो (काही अल्पबुद्धि लोक उगाच हिंदुंना मूर्तिपूजक म्हणून हीणवतात). तात्पर्य मूर्तिपूजा हे साधन आहे साध्य नव्हे. परंतु या कलियुगात झाले काय? लोक मूर्तिलाच ईश्वर मानू लागले. उपायच अपाय ठरला आणि आपला "आधूनिक देव" प्रसिद्धिचा भूकेला झाला. अहो आज हिंदुंचे कितीतरी अनेक श्रीमंत देवस्थाने आहेत. पण उपयोग शुन्य. ईश्वर नि भक्ताचे पवित्र नाते नाही. केवळ पैशांची बाजार. काही लोक तर देवस्थानाला "पिकनिक पॉइंट" म्हणून भेट देतात. खरोखर ईश्वर पैशांचा, प्रसिद्धिचा भूकेला आहे का? नाही मुळीच नाही. ईश्वर अनंत अनादि आहे. हे सबंध विश्व त्यानेच निर्माण केले आहे. ही सगळी दौलत त्याचीच आहे. हा सगळा पसारा त्याचाच आहे.
ईश्वराचा पसारा फार मोठा आहे. कधी विचार करुन पहा. एवढं विशाल ब्रह्मांड. त्यात अनेक सुर्यमाला नि ग्रह आहेत. त्यापैकी पृथ्वी नावाचा एक ग्रह, ७०% पाण्याने व्यापलेल्या या ग्रहात केवळ ३०% भूभाग आहे. त्यात ५ खंड आहेत. त्यात आशिया नावाच्या खंडात भारत हे राष्ट्र. भारत राष्ट्राच्या कुठल्यातरी राज्याच्या एका जिल्ह्यांत छोट्याश्या शहराच्या एका अगदी लहान विभागात असलेल्या एका इमारतिच्या/चाळीच्या खोलीत आपण राहतो. पाहिलेत ना, ईश्वराच्या या विशाल पसार्‍यात आपले स्थान किती लहान आहे ते. मग हा ईश्वर प्रसिद्धिचा भूकेला कसा असेल? मग हा ईश्वर आपल्या नवसाला क्षणोक्षणी कसा काय पावेल? संतांनाही ज्याचे दर्शन दुर्लभ होते तो आपल्या सारख्या अति साधारण लोकांना कसा काय साक्षात्कार देईल? याचा अर्थ ईश्वर पावत नाही असे नाही. त्याचे ह्र्दय आईसारखे आहे. म्हणून तर आपण जगतोय ना? परंतु ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी योग्यता लागते. त्यासाठी साधना करावी लागते. तो आपल्याकडे येणार नाही. आपल्याला त्याच्याकडे जावे लागेल. जसे एखाद्दाला सावली हवी असेल तर तो झाडाखाली जातो. झाड स्वतःहून त्याच्याकडे येत नाही. विहीरीत प्रचंड पाणी आहे. परंतु तहान लागल्यावर आपल्याला विहीरीकडे जावे लागते. विहीर आपल्याकडे येत नाही. तसेच ईश्वर हा मायाळू आहे. त्याच्या मायेची उब हवी असेल तर आपल्याला त्याच्याकडे जावे लागेल. एकदा का आपली योग्यता वाढली तर तो स्वतःच आपल्या भेटीला येतो. जसा पुंडलीकेच्या भेटीला विठ्ठल आला. देव श्रद्धेचा भूकेला आहे. परंतु श्रद्धा डोळस हवी. नाहीतर वर म्हटल्याप्रमाणे विपरीत श्रद्धा घडली तर ईश्वर प्रसन्न तर होत नाही परंतु त्याचा नकळत अपमान मात्र आपण करीत राहतो. आपल्यावर भगवंताची कृपा होत नसेल तर आपले कुठेतरी काहीतरी चुकते, असे समजावे. आपल्यातले दोष, मत्सर काढून टाकावे. आपण नेहमी म्हणतो की देवावर माझी नितांत श्रद्धा आहे, मी त्याची मनोभावे पूजा करतो. तरीसुद्धा देवाची कृपा होत नाही. असे का? कारण आपल्या मनात कुठेतरी शंका असते. तांदूळ कितीही निवडले तरी खडा कुठेतरी राहतो व जेवताना कचकन चावला जातो. असेच काहीतरी आपल्या बद्धल होते. काही लोक ईश्वराचे अस्तित्व नाकारतात. हे लोक इतके विक्षीप्त असतात की तलवार म्यानात ठेऊन तर्क करतात आणि आपला तर्क खरा ठरविण्यासाठी म्यानातली तलवार बाहेर काढतात. म्हणे विज्ञानयुग आहे. खरा वैज्ञानिक ईश्वरावर कधीच शंका घेत नाही. एखादी गोष्ट नाकारणे सोपे असते कारण त्यात टाळकं खांजवावं लागत नाही. असो, ज्याचे त्याचे कर्म.
ईश्वराच्या साक्षात्कारासाठी संतांचा आधार मिळतो. संत हे ईश्वराचे दूत असतात. देवाचा संदेश ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. मी वर म्हटले आहे की संत चमत्कार करीत नाही. परंतु ज्ञानेश्वरांपासून तुकाराम, साईबाबांपर्यंत संतांची चरीत्रं वाचली तर त्यात चमत्कार वाचावयास मिळतात. मग ते खोटे हे असे समजावे का? नाही मुळीच नाही. योगी अरविंद म्हणतात "परिपुर्ण माणसाच्या दृष्टीने जे तर्कशुद्ध असते, तेच अपूर्ण माणसाच्या दृष्टीने चमत्कारिक असते. ज्याने आयुष्यात कधीच विमान पाहिले नसेल, त्याला विमान दाखवल्यावर तो त्याच्यासाठी चमत्कारच ठरतो. तसेच आहे संत जे करतात ते त्यांनी अनुभवले आहे. पण आपण अनानुभवी आहोत. म्हणून आपल्याला ते चमत्कार वाटतात. चमत्कार चमत्कार म्हणजे काय हो? ईश्वराने निर्माण केलेले हे विश्व किती चत्कारिक आहे ते पहा. एवढूसं बीज परंतु ते पेरल्यावर केवढं अवाढव्य वृक्ष जन्माला येतं. सुर्य उगवतो मावळतो. हा वारा दिसत नाही परंतु जाणवतो. ही माणसं, झाडे, प्राणी, त्यांना जगण्यासाठीची केलेली सोय. प्रत्येक गोष्ट चमत्कारिक आहे. पण आपण त्याचा विचारही करत नाही. ईश्वराच्या व्यापकतेचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की तो किती दयाळू आहे. आपण ईश्वरापुढे नम्र होऊन भक्तिभावाने उभे राहिले पाहिजे. आचारः परमो धर्म. आचार शुद्ध ठेवावे. त्याची भक्ती करावी पण बुद्धीने. बुद्धी गहाण टाकून भक्ती करु नये. देवाला बुद्धिवान आणि चारित्र्यवान भक्त आवडतात. देवाशी वागताना आपले स्थान देवाच्या चरणापाशी आहे असा भाव मनी ठेवावा. त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवावी. तर तो आपल्याला नक्कीच त्याच्या कुशीत घेईल. कारण देव श्रद्धेचा
भूकेला आहे, प्रसिद्धिचा नव्हे.
देव देव म्हणोनी I व्यर्थ का फिरसी I
निज देव नेणसी I मुळी कोण ? II
देवा नाही रुप I देवा नाही नांव I
देवा नाही गाव I कोठे काही II
ज्ञानदेव म्हणे I भजा आत्मदेवा I
अखंडित सेवा I करा त्याची II ( हा लेख श्री नितीन दौतखानी गुरुजी यांच्या फेसबुक पेज वरुन घेतला आहे)

Tuesday, December 10, 2013

Important shortforms

Company with Full Names ;

• ESPN→ Entertainment and Sports Programming
Network.
• HDFC→ Housing Development Finance
Corporation Limited
• HCL→ Hindustan Computer Limited
• HTC→ High Tech Computer Corporation
• HP→ Hewlett-Packard
• HMV→ His Master's Voice
• HSBC→ Hongkong and Shanghai Banking
Corporation
• H&M→ Hennes & Mauritz
• ICICI Bank→ Industrial Credit and Investment
Corporation of India Bank
• IBM→ International Business Machines
• Infosys→ Information Systems • Intel→
INTegrated ELectronics
• IKEA→ Ingvar Kamprad Elmtaryd Agunnaryd
• ING→ International Netherlands Group
• JVC→ Japan Victor Company
• JBL→ James Bullough Lansing
• KFC→ Kentucky Fried Chicken
• L&T→ Larsen & Toubro
• LG→ Lucky and Goldstar
• LEGO→ leg godt
• MRF→ Madras Rubber Factory
• NEC→ Nippon Electric Company
• Nikon→ Nippon Kogaku
• Nissan→ Nippon Sangyo
• P&G→ Procter & Gamble Company
• SAP→ System Analyse und Programmentwicklung
• TCL→ Today China Lion
• UPS→ United Parcel Service of America
• Wipro→ Western India Palm Refined Oil Ltd

Monday, December 2, 2013

बालाजी सुतार अंबाजागाई यांचा मला आवडलेला एक खुसखुशीत लेख.

अघळपघळ संमेलनात लैच प्रतिभावंत बेचाळीस कवी...

December 1, 2013 at 1:41pm
दिव्य मराठीच्या आजच्या 'रसिक' पुरवणीत प्रकाशित झालेल्या माझ्या लेखाची मूळ प्रत.

कलाप्रिय महाराष्ट्राच्या महन्मंगल भूमीत सिनेमा-नाटकांच्याखालोखाल लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे कविसंमेलने. पैकी नाटके आणि सिनेमे हल्ली डायरेक्ट टू होम शैलीत घरपोच होत असल्याने औटडोअर मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी जायचे म्हणजे कविसंमेलनाला जायचे अशीच महाराष्ट्रभर रसिकांची कल्पना झालेली असते. खरंतर औटडोअर मनोरंजनाच्या क्षेत्रात सगळ्यांत पहिला नंबर निवडणुकीतल्या भाषणांचा असतो, मात्र हल्ली एकमेकांची सरकारे ‘पाडणे’ वगैरे दहाबारा वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेले खेळ कॉंग्रेस सरकारच्या - नवी पिढी ज्या चिवटपणाने फेसबुकला अष्टौप्रहर चिकटून बसते तसल्या- सत्तेला घनदाट चिकटपणे चिटकून राहण्याच्या गुणधर्मामुळे फारसे घडताना दिसत नाहीत. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभांच्या गंमतीदार निवडणुका लैच लै तर चार-पाच वर्षांत एखाद-दुस-याच वेळी ‘लागतात’. स्थानिक नगरपालिकांच्या किंवा ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही विनोदी असतातच पण तिथल्या विनोदाला उघडपणे हसायचे म्हणजे हसणा-यावर दणकावून मार खायचीच पाळी असते. सबब सर्वाधिक निरुपद्रवी औटडोअर मनोरंजनासाठी लोकांना कविसंमेलनावरच अवलंबून राहावे लागते.
सांप्रत सर्व प्रकारच्या कलावंतांच्या तुलनेत ‘कवी’ हा इसम संख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रभर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आढळतो, त्यामुळे गावोगावी घाऊक कवींचे संमेलन भरवणे हा खेळ अत्यंत तेजीत चालतो. घरटी किमान एक कवी असे सामान्यपणे महाराष्ट्रात कवींचे होलसेल प्रमाण असल्याचे कुणीतरी प्राध्यापकाने 'पीयेचडी'च्या अतोनात अभ्यासपूर्ण प्रबंधात लिहून सिद्धच केल्याचे आपल्याला माहीतच असेल. त्यामुळे ‘काही घडले की घ्या कविसंमेलन' असाच खाक्या गावोगावी चालत असलेला दिसून येतो. इंग्रजी-मराठी नवं वर्ष लागणं, शिमगा म्हणजे होळी, रंगपंचमी, दिवाळी, पाडवा, कोजागिरी असल्या दिवशी गावोगावी कवींचे जत्थेच्या जत्थे कविसंमेलनासाठी हिंडताना आढळतात. काही पुढा-यांना आपल्या रसिकतेवर मोहर उठवून हवी असते. अशांचे स्वत:चे वाढदिवसही असे पुढारी लोक कविसंमेलने भरवून साजरे करताना दिसतात. कविसंमेलने भरवणे सर्वांनाच सर्व दृष्टीने सोयीचे असते कारण ज्यादा नामचिन कवी सोडले तर बाकी कवी केवळ ‘कविता वाचू दिली जातेय’ एवढ्यावरच खुश होऊन स्वखर्चाने ‘फुकट्यात’ संमेलनाला हजर राहतात.               
काही दिवसांपूर्वी एका आमदारांनी आयोजित केलेल्या साहित्यसंमेलनातल्या कविसंमेलनात मी स्वत:च निमंत्रित होतो. कार्यक्रमपत्रिकेमध्ये एकूण बेचाळीस कवींची नावे छापलेली होती. एवढ्या बेचाळीस कवींचा सहभाग असलेल्या कविसंमेलनासाठी संध्याकाळी साडेचार ते सहा असा ऐसपैस आणि अघळपघळ तब्बल ( ! ) दीड तासांचा वेळ उपलब्ध करून दिलेला होता. सहा ते सात या वेळेत संमेलनाच्या अध्यक्षा आणि एक मंत्रीमहोदय, दोनेक आमदारमहोदय, एक झेडपीअध्यक्षमहोदय आणि इतर अनेक स्थानिक महोदयांच्या महनीय उपस्थितीत समारोपाचे सत्र होणार होते. आणि त्यानंतर गावातल्या शाळेतल्या मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उर्फ सांस्कृतिक कार्यक्रम होता.
तर गंमत अशी झाली की कविसंमेलनापूर्वीचे कथाकथनाचे सत्रच मुळात सहा वाजता संपले. मग घाई करून समस्त कवींचा जथ्था हाक-हाकून स्टेजवर नेण्यात आला. जागा सापडेल तिथे दाटीवाटीने आम्ही लैच प्रतिभावंत बेचाळीस कवी स्टेजवर स्थानापन्न वगैरे झालो. मग आधीच उशीर झाल्यामुळे कावलेल्या सूत्रसंचालकांनी अत्यंत घाई-घाईने "अमुक कवीचे स्वागतआमच्या संस्थेतील प्राध्यापक अमुकसर करतील.." असा दरेक कविसोबत एकेका प्राध्यापकाचे नाव घेऊन स्वागतसमारंभ चालू केला. काही क्षण स्टेजवर एकाचवेळी उठबस करणारे चारचार-पाचपाच कवी आणि त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यासाठी स्टेजवर चढ-उतर करणारे चारचार-पाचपाच प्राध्यापक असे अत्यंत हातघाईवर आलेले दृश्य दिसू लागले. शिवाय दरेक कवी-प्राध्यापकाची जोडी फोटोसाठी पोझ देऊन कॅमे-याला पक्की नजर भिडवून स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यासारखी निश्चल उभी राहून फोटोचा फ्लॅश चमकेपर्यंत अजिबात हलत नव्हती.हा सगळा ‘पानपता’सदृश्य गोंधळपाहून दिवसभर साहित्यिकांसारख्या असंगांशी संग करावा लागल्याने अतोनात कावलेले आयोजक आमदारमहोदय ज्यास्तीच कावून गेले आणि त्यांनी सूत्रसंचालकाला बोलावून 'मार्गदर्शन' केल्यानंतर सूत्रसंचालकमहोदयांनी "झाले तेव्हढ्या कवींचे स्वागत पुरे झाले. उरलेल्या सन्माननीय कवींचे स्वागत कार्यक्रमाच्या मध्यंतरात लैच सन्मानाने करण्यात येईल." असे जाहीर करून "आता कवींनी कविसंमेलन 'च्यालू'करावे." असा संयोजकीय हुकुम देऊन माईक स्टेजवरच्या सूत्रसंचालकाकडे सुपूर्द केला. दुस-या किंवा तिस-याच कवीने "आमचे आमदार"नावाची कविता खड्या आवाजीत सादर करून तिच्यात आमदारसाह्यबांच्या आजवरच्या कार्यकर्तृत्वाचा समग्रपणे आढावा घेतला. सदर कवितेत एक ओळ "अशोकरावाला शिकविला धडा हो.." अशी होती.  एकूण कविसंमेलनाचा रोख त्यानंतर अनेक कवींच्या लक्षात आला असावा कारण नंतरही "आमदार" या विषयावर आणखी दोन कविता सादर केल्या गेल्या. मग काही प्रेमकविता, काही "कापसाला भाव मिळत नसल्याने शेतक-यांनी गांजाची शेती का करू नये?" असा "आजचा सवाल" विचारणा-या कविता, (या कवीचे ऐकून कुणी गांजाची शेती केलीच आणि त्याला पोलिसांनी धरलेच तर त्यात या कवीच्या काकाचे काय जाणार होते?). तासाभरात दहा की बारा कवींच्या कविता
गाऊन किंवा वाचून झाल्यानंतर समारोपाच्या कार्यक्रमासाठी मंत्रीमहोदय स-लवाजमा आल्याची वार्ता आली आणि आयोजक आमदारमहोदयांनी पुन्हा एकदा सूत्रसंचालकांना मार्गदर्शन केल्यानुसार "उर्वरित कविसंमेलन "आफ्टर द ब्रेक" म्हणजे समारोपाचा 'कारेक्रम' झाल्यानंतर पुन्यांदा घेतले जाईल, तस्मात् , समस्त लैच प्रतिभावंत कवींनी स्टेजवरून उतरावे आणि कुठेही लांब न जाता तिथेच डाव्या बाजूस थांबून किंवा बसून राहावे." अशी उद्घोषणा करण्यात आली तेव्हा आम्ही सगळे चाळीस-बेचाळीस कवी जड पावलांनी गडबड करून खाली उतरलो आणि डाव्या बाजूस बसायला काही सापडते काय याचा निष्फळ शोध घेऊन दाटीवाटीने उभे राहिलो. समारोपाच्या कार्यक्रमात खास ‘मंत्री’शैलीत मंत्रीमहोदयांची आणि इतर तीन-चार बिनमंत्रीमहोदयांची सविस्तर भाषणे दीडेक तास चालली तेव्हा नऊ वाजून गेल्यानंतर सदर समारोपाचा कार्यक्रम संपला आणि "उरलेल्या कवींनी अजिब्बात वेळ न लावता तातडीने स्टेजवर दाखल होऊन एकेक बारकीशी कविता म्हणून मोकळे व्हावे आणि रसिक श्रोत्यांनाही मोकळे करावे कारण नंतरच्या शाळेतल्या पोरांच्या सांस्कृतिक कारेक्रमाला आधीच लै उशीर झालेला असून पोरे पेंगुळली आहेत, तर ती झोपी जाण्याआधी तोही कारेक्रम उरकणे आवश्यक आहे." असं सूत्रसंचालकरावांनी जाहीर केले तेव्हा पुनश्च सरसावून पंचवीस-तीस कवी झुंडीने स्टेजवर गेले आणि कविसंमेलन पुन्यापुन्यांदा 'च्यालू' जाहले ! इतका वेळ इथे तिथे थांबून अनेक कवी ओशाळलेले, संतापलेले, शरमिंदे झालेले असले तरी अनेकजण तरीही फॉर्मात होते. या "आफ्टर द ब्रेक"सत्रातल्या पहिल्या कवीच्या कवितेचे बोल होते - "कव्हा व्हईन, यंकटण्णा, आपली सुदारना, न् कव्हा व्हईन, यंकटण्णा, आपली सुदारना ?". कवींच्या किंवा कवितेच्या अधोगतीबद्दल काहीएक वाटून न घेता सदर कविबंधू यंकटण्णाच्या ‘सुदारनेची’ वाट पाहत होते हे एकूणच कवींच्या तळागाळातल्या जनतेप्रती असलेल्या आस्थेचेच निदर्शक मानता आले असते.
कवितेची अब्रू घालवणा-या या सगळ्या प्रकारास एक कविता वाचून आपणही यथाशक्ती हातभार लावला याची लाज वाटून घ्यावी की शरमून जाऊन एखाद्या कोरड्या विहिरीत (यंदा पाऊस बराच बरा झालेला असला तरीही अशा कोरड्या विहिरी आमच्या भागात अतोनात मुबलक संख्येने उपलब्ध आहेत याची इतर भागांतल्या गरजूंनी नोंद घ्यावी.) उडी ठोकून जीव द्यावा या संभ्रमात कानकोंडा होऊन अजूनपर्यंत नवी कविता लिहायला पेन उचलावासे वाटेनासे झालेले आहे. कविसंमेलन हा एकंदरीतच 'च्यामारी गुणिले अतोनात वेळा' असा लैच यंग्राट प्रकार असतो आणि या अस्ल्या चळवळीत आपल्यासारख्या भल्या माणसाने भाग घेऊ नये एवढे आपण शिकलो हे मला कबूल असले तरी, उद्या आणखी कुणी ‘प्रत्यक्षाहुनि होर्डिंगव्यापी प्रतिमा उत्कट’ स्वरूपाच्या दादा, भाई किंवा अण्णांनी त्यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित, कुणाच्या पोराच्या बारशानिमित्त किंवा असल्याच कसल्यातरी एकदम महत्वाच्या प्रसंगी कविसंमेलन आयोजित केले आणि त्यात मला बोलावलेच तर मी जाईनच की काय अशी मलाच स्वत:ला शंका वाटत राहते. कदाचित जाईनसुद्धा. कवींना एवढ्यातरी मानाने दुसरा कोण बोलवतो हो ?

--------------------------------------------------------------------------

-         बालाजी सुतार, अंबाजोगाई.