Monday, February 10, 2014

जग काय म्हणेल?


"जग काय म्हणेल?" ह्या प्रश्नाने आजवर ना जाणे कित्येक इच्छांचा जीव घेतला असेल?
कोण म्हणते नियतीने कधीच काही मिळवून देत नाही?
स्वत:चे स्वत:लाच विचारा की, नियतीने मिळवून दिलेल्या किती गोष्टी तुम्ही स्वीकारायची हिंमत दाखवली?
संपूर्ण दोष नियतीला देण्याचा हक्क जगात कुणालाच नाहीये.
पावसात भिजावे वाटले तर नियतीने अडवलेले का तुम्हाला?
गाणे गुणगुणावे वाटले तर तर नियतीने ओठ धरलेले का कधी तुमचे?
एखाद्या चिमुरड्या मुलाला जीभ काढून वेडावून दाखवायला नियतीने मनाई केली होती.

साजीश है ये जालीम...
तेरी हि...तेरे हि खिलाफ
नही तो खुशियों को तेरे
तेरा कबसे इंतजार था ||

जागेपणी स्वत:च तोडलेली स्वत:ची स्वप्नं डोळे बंद केले की, जाब विचारतात.
अधुरी स्वप्नं जाब विचारतात तेव्हा, ना शब्द साथ देत ना हे जग साथ देत.
म्हणूनच तेव्हा माणूस स्वप्न पहायलाही घाबरत असावा.

जगाने घालून दिलेल्या नियमांच्या कुशीत जगणारा माणूस वय वाढतं तसतसा आदर्शाच्या जवळ आणि स्वत:च्या सुखापासून लांब होत जातो.
"शेवटी मी कुठे दु:खी आहे? जे आहे त्यात खुशच आहे की मी" असं उत्तर देऊन मोकळी होतात ही माणसं.
पण स्वत:ला खोटं उत्तर कसं देणार?

मॅच्यूरिटी म्हणजे काय?
मॅच्यूरिटी म्हणजे परिस्थिती जाणून स्वत:च्या इच्छांना मारणं होय.

(हे विचार माझे नसून ह्या महाजालात वाचताना सापडलेले आहेत, जे मला स्वताहाला पटले म्हणून आपल्यासमोर ठेवत आहे)

No comments:

Post a Comment