प्राजक्ताची झाडे भेटताना...
आयुष्याच्या वाटेवर कधी खाचखळग्यांतून जावे लागते. कधी काट्याकुट्यांची वाट तुडवावी लागते. कधी अवघड वळणे पार करावी लागतात. कधी उंच कडे आणि खोल, धडकी भरवणारी दरी यामधल्या अरूंद वाटांमधून प्रवास करावा लागतो. पण माय-पिता-शिक्षक-पती अथवा पत्नी यांनी आपल्या मन-मनगट-मेंदूमध्ये ताकद पेरलेली असते. मानसिक, भावनिक, शारीरिक, आत्मिक बळ वाढवलेले असते. ती ताकद-बळ काटे-कुटे, खाच-खळगे तुडविताना हिंमत देते.
जीवनमार्गावरच्या दुःसहतेचे हे केवळ वाङ्मयीन वर्णन नाही; तर असे अनुभव झोपडपट्टीमध्ये, बंगल्यामध्ये, आलिशान निवासांमध्ये राहणाऱ्यांनाही येतात. प्रवास करताना कोट्यधीशांची विमाने कोसळतात. काश्मीरच्या सहलींमध्ये सहकुटुंब स्वर्गीय सौंदर्यपान करताना हिमकडे कोसळून गतप्राण व्हावे लागते. पण आयुष्याची राख होतानाही जगण्यासाठी उमेद देणारे सगे-सोयरे, परिचित-अपरिचित भेटतात. पाठीवर हात ठेवीत 'लढ' म्हणत कढ आवरण्यास ते ताकद पेरतात. 'अरे नेस्तनाबूत, मातीस मिळालेलेही उभारी धरतात. फिनिक्स पक्ष्यांसारखे राखेतून भरारी घेतात,' सांगत आशेचे किरण दाखवितात. अपयशामुळे मनाचा दाह असह्य झाल्यावर 'फायर ब्रिगेड' बनतात. थंडगार शब्दसरींसारख्या बोलांनी शांतवतात. आपण आपली उंची वाढविण्यास जिवाचे रान करतो, पण काहीजण टिंगल-टवाळी करतात. यश मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करीत नाहीत.

एका सद्गृृहस्थांनी बालसंकुलात हयात खर्च केली. आपल्या एकुलत्या मुलासाठी
अनाथाश्रमामध्ये वाढलेली कन्या वधू म्हणून घरी आणली. त्या संस्थेच्या
पदाधिकाऱ्यांनी निमंत्रणासाठी गेल्यावर शुभेच्छाही दिल्या नाहीत. नवविवाहित
जोडप्याला सकारात्मक निमंत्रण दिले नाही. रोटरी, महापौर,सेवाभावी ट्रस्ट,
आदींनी सत्कार केले. एका स्नेही महिलेने त्यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली.
पण अनाथाश्रमात वाढलेल्या, पदवीपर्यंतचे शिक्षण घेत उपअधीक्षक पदावरून
निवृत्त झालेल्या त्या सद्गृहस्थाला पदाधिकाऱ्यांचे वर्तन विंचवाचा डंख
वाटते. माणसे अशी निवडुंगाची फांदी का बनतात? का फटकारतात? पण काही माणसे
भेटतात तेव्हा म्हणावे वाटते, 'अशी जागा आहात तुम्ही आयुष्यातली, जिथे
हातात माझ्या नेहमी फुलेच आली.'
काही वेळा आयुष्याची वाट मागे टाकत जाताना सद्भाग्यामुळे काही माणसे 'माणूस' म्हणून भेटतात. आपल्यामधला 'माणूस'जागवतात. काही माणसे श्रावणातील प्राजक्त रूप घेऊन समोर येतात. ती सहवासामध्ये येणाऱ्यांसाठी पानोपानी बहरलेली, फुलांनी डवरलेली असतात. त्यांच्याखाली फक्त उभे राहायचे असते. फिकट पिवळ्या रंगाच्या पाकळ्यांची, नारंगी-शेंदरी रंगाच्या देठांची, मृदुल, नाजूक फुलं अंगावर पडतात. मंद मंद सुगंधाच्या हळुवार लाटांची बरसात करतात.
कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आयुष्याची वाट कितीही खडतर असली तरी प्राजक्ताची भेट व्हावी. प्राजक्त फुले देहावर टपटपावित. तन-मन-चेतापेशी-अंतर्याम शीतल-रंगीन, गंध-सुगंधाने भारून, भारावून जावे. आजच्या जगातील प्रदूषित वातावरणाचा संसर्ग टळावा. 'सर्वेः सुखिना संतु' ओठी यावे. तुम्हाला भेटला का प्राजक्त कधी? का तुम्हीच कोणासाठी प्राजक्त बनलात कधी? आठवा ना शांतपणे!
प्रा. अनुराधा गुरव