Wednesday, January 22, 2014

हिंदु धर्म म्हणजेकाय?

हिंदू: जगण्याचा एक संमृद्द मार्ग-----लेखक: जयेश मेस्त्री
आपला भारत देश हा अध्यात्म प्रधान संस्कृती असलेला एकमेव प्राचीन देश आहे. इ.स.पू. १०००० वर्षे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. त्यापूर्वीही इथे एक समृद्द, सुसंस्कृत, सुसंघटीत समाज धर्माचरण करत होता.ज्या वेळी भारत देशात श्रेष्ठ प्रतीचे तत्वज्ञान आणि अध्यात्माचा विकास होत होता, त्यावेळी पाश्चात्य देश अप्रगत अवस्थेत होते.
 हिंदू धर्मात मुर्तिपुजेला फ़ार महत्व आहे. माणसाचे मन हे फ़ार चंचल असते. ते क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. मानसपुजेने मन स्थिर होत नाही. मनाची एकाग्रता साधावयाची असेल तर समोर भगवंताची सुंदर मु्र्ति हवी असते. म्हणून मुर्तिपुजा ही आवश्यक आहे. मुर्तिपूजा हे अज्ञान नसून अप्रतिम विज्ञान आहे. मुळात हिंदूंचे अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. पण इतर धर्म हे मानत नाही आणि मर्तिभंजनासाठी प्रवृत्त होतात. ह्यासारखे दुसरे अज्ञान नाही. ह्यासारखे दुसरे पाप नाही.
हिंदू धर्म ही पायवाट आहे तर इतर धर्म हे रस्ते आहेत. पायवाट कुणी निर्माण केली हे सांगता येत नाही. तसेच हिंदु धर्माचे आहे तो कुणी निर्माण केली हे सांगता येत नाही. तो फ़ार पुरातन आहे, सनातन आहे आणि म्हणूनच ईश्वरनिर्मीत आहे. त्या उलट रस्ता हा तयार करावा लागतो. तो कुणी तयार केला, त्याचे नाव माहीत असते. इतर धर्मांचे धर्मगुरु आहेत. त्यामुळे ते धर्म केव्हा स्थापन झाले, ते कुणी स्थापन केले याची माहिती सहज उपलब्ध आहे. आपला हिंदू धर्म समजण्यासाठी पात्रतेची जरुरी आहे. ज्याची पात्रता नाही तो हिंदू होऊ शकत नाही. हिंदू असणे हे सौभाग्याचे आहे. आपण हिंदू आहोत कारण गेल्या जन्मी आपण फ़ार मोठे पुण्यकर्म केले होते. आणि म्हणूनच आपण ह्या जन्मी हिंदू म्हणून जन्माला आलो. आपल्या धर्मानुसार परमेश्वर अवतरतात ही फ़ार मोठी बाब आहे. इतर देशात देवाचे प्रेषीत/ अनुयायी जन्माला येतात. पण आपल्या हिंदूस्थानात साक्षात भगवंत अवतरतात. केवढे पुण्यवान आहोत आपणइतर धर्मात अनुयायी जन्माला येतात तेही अनानुभवी असतात. म्हणून त्यांच्यात अंधानुकरण जास्त दिसून येते. असे धर्म स्थितिशील राहतात. आहे त्याच स्थितित राहतात. त्यांच्यात हिंसा, असहिष्णूता सहज दिसून येते. उलटपक्षी हिंदूधर्म सहीष्णू आहे.बरेचसे लोक विचारतात की what is a defination of hindu and hinduism? मला त्यांना सांगायचे आहे की hindu means human and hinduism means humanism. हिंदू म्हणजे माणूस (आर्य) आणि हिंदूत्व म्हणजे माणूसकी. माणसाने माणसाशी माणसा सारखे वागणे म्हणजेच हिंदूत्वावादी असणे. आज मला स्वताचा अभिमान वाटतो कारण मी या विशाल आणि भगवंत निर्मित हिंदू संस्कृतीत जन्माला आलो. सर्वांनाच याचे अभिमान वाटले पाहिजे. हिंदूमय होणे म्हणजे भगवंतमय होणे, गीतामय होणे. “बुद्धी स्थिर ठेवून प्राप्त परिस्थितीत स्वतःचे कर्तव्य कोणते ते ओळखणे आणि रागलोभ बाजूला ठेवून अनन्यभावाने त्यानुसार आचरण करणे म्हणजे गीतामय होणे” असे स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात.हिंदू धर्माचे रक्षण करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. आपापसातले रागलोभ बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र यावे आणि त्यानुसार आचरण करावे. या जगाला जर विनाशापासून मुक्त करावयाचे असेल तर “हिंदू” हाच एक पर्याय आहे. जगाच्या प्रत्येक समस्येवर “हिंदू” हेच एक औषध आहे. कारण हिंदू आणि फ़क्त हिंदूच जगण्याचा समृद्ध मार्ग आहे.

Monday, January 20, 2014

तुलसी महात्म्य.

तुळशीच ठरणार कॅन्सरवर रामबाण!

जेनेटिक इंजिनीअरिंगद्वारे तुळशीची होतेय निर्मिती

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

मेडिकल क्षेत्रामध्ये तुळशीचे महत्त्व वादातीत आहे. अनेक औषधांवर उपयुक्त असणाऱ्या तुळशीमधील औषधी गुणधर्म जेनेटिक इंजिनीअरिंगचा वापर करून वाढविण्याच्या प्रयत्नांत शास्त्रज्ञ आहेत. भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञांची टीम या प्रकल्पावर सध्या काम करत आहे.

पश्चिम केंटुकी विद्यापीठातील 'प्लांट मॉलेक्युलर बायोलॉजी'चे सहायक प्राध्यापक चंद्रकांत इमानी आणि त्यांचे विद्यार्थी लॅबमध्ये तुळशीवर जेनेटिक इंजिनीअरिंगचा प्रयोग करत आहेत. तुळशीमधील 'युजेनॉल' नावाचे रसायन वाढवण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ब्रेस्ट कॅन्सरवर 'युजेनॉल' अत्यंत प्रभावशाली असून, त्यामुळे हा कॅन्सर आटोक्यात ठेवता येतो.

इमानी यांनी दावा केला आहे, 'तुळशीच्या पानांचा चुरा केला, तर युजेनॉल रसायन बाहेर येते. जेथे ट्युमरच्या पेशी आहेत, त्यावर युजेनॉल ठेवले, तर पेशींची वाढ थांबते. अनेक वर्षांपूर्वी हा प्रयोग सिद्ध झाला आहे. या 'युजेनॉल'चे प्रमाण वाढवण्यात यश आले, तर तुळशीचे झाड हे कॅन्सरविरोधी औषधाचा एक मोठा साठा असेल.'

कॅन्सरवर यशस्वी उपचार करणे, हा या संशोधन प्रकल्पातील पुढचा टप्पा आहे. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून पूर्वेकडील देशांमध्ये या झाडाचा वापर अनेक उपचारांमध्ये करतात.( दामोदर गुरुजी यांच्या टाईमलाईन वरुन साभार)

Tuesday, January 14, 2014

मनाला भावलेलं...

शेकडो मैलांचा प्रवास जवळ जवळ संपला होता ...
आपल्या गुरूच्या पावलावर पाऊल टाकून त्याची पायपीट चालली होती ... पाय थकले होते ... मन कातावलं होतं .. पण उत्तराची लालसा अजून तशीच होती ... साधा सरळ प्रश्न हो - धर्म म्हणजे काय ? गुरुजींना विचारला ... नि ते म्हणाले ... चल .. स्वानुभवातून शोधून काढू ... आणि मग सुरु झाला हा न संपणारा प्रवास ... वाटेत कित्येक देवळं लागली ... अभिषेक नि पालख्या दिसल्या ... मुर्त्या नि आरत्या दिसल्या ... त्यानं विचारलं ... हाच का हो धर्म ... ? गुरुजी म्हणाले ... छे रे ... हा फक्त आभास ... ! पुढे कुठेतरी मशिदी दिसल्या ... चालती वाट अडवून डोकं टेकवणारी आणि बुडं उचलणारी जमात दिसली .. त्यानं विचारलं ... हाच का हो धर्म ... ? गुरुजी म्हणाले ... छे रे ... हा फक्त अट्टाहास ... ! तो हिरमुसला ... त्यांच्या मागून चालत राहिला ... चर्च .. धम्मगृह .. गुरुद्वारा - सगळं भेटून ही कोरडा राहिला. शेवटी न रहावून म्हणाला ... देवात धर्म नसतो ... ? गुरुजी म्हणाले .. अं हं .. देवात धर्म नसतो - धर्मात देव असतो. आपल्याला झेपेल तितकाच पाहिलेला ... झेपेल त्या रुपात पाहिलेला ... ! त्यानं पुन्हा विचारलं ... पण मग धर्म ... गुरुजी हसले .. म्हणाले .. भेटेल ना ... चालत रहा. आता खरं तर चरफडाट झाला होता त्याचा. काशी .. मक्का .. धम्मगिरीत न सापडलेला धर्म आता रस्त्यात पडलेला थोडी ना सापडणार होता. आणि विचार करता करता त्याच्या पायात काडकन काटा मोडला ... आई गं म्हणत तो खालीच बसला ... गुरुजींनी वळून पाहिलं .. धावत आले नि हलक्या हातानं पायात मोडलेला बोटभर बाभळीचा काटा काढला ... त्याकडे पाहिलं .. स्मित केलं नि तोच काटा त्याच्यासमोर धरत म्हणाले, हा बघ - हा धर्म ... ! तो गोंधळलेला ... गुरुजींनी त्याला काही अंतरावर उभं पुरुषभर उंचीचं हिरवंगार शेत दाखवलं ... त्याच्या चार ही बाजूंनी बाभळीचं कुंपण होतं ... गुरुजी हातातल्या काट्याकडे पहात म्हणाले .. ती ही बाभळ आणि ही सुद्धा बाभळ .. धर्म असाच असतो .. नीट वापरला तर संरक्षण करणारा ... नाहीतर रक्त काढणारा .... असं म्हणून गुरुजी त्यांच्या पांढऱ्या शुभ्र पंचाने त्याचा मळकट रक्ताळलेला पाय हळूवारपणे पुसू लागले आणि तो स्वतःच्याच मनाशी घोकत राहिला .. धर्म म्हणजे शेत नव्हे ... कुंपण ... फक्त कुंपण ...(शिरीष लाटकर)

Saturday, January 4, 2014


पिंपळ पान ……. नवीन वर्ष नवीन संकल्प
आजच्या ह्या जगात देवासाठी वेळ काढणे किती कठिण होत चालले आहे. आपल्या स्वतःसाठीच दिवसाचे चोवीस तास पुरे पडत नाहीत. मग देवासाठी कुठे वेळ मिळणार! पण प्रयत्न करून बघा, चोवीस तासांतले निदान दोन-चार क्षण तरी त्याच्यासाठी काढता येतील का? कदाचित ते एवढे अशक्य नाही.
परमसुखाचा आस्वाद घेत असताना दोन क्षण काढता आले तर … परमेश्वराला धन्यवाद द्या!
आनंदोत्सव साजरा करत असताना काही क्षण वेगळे करता आले तर … त्याची स्तुती करा!
परीक्षेच्या वेळी एक क्षण मिळाला तर … देवावर भरवसा करा !
प्रतीक्षा करताना काही क्षण विचार करता आला तर … त्याच्यावर विश्वास ठेवा !
कठिण परिस्थितीचा सामना करत असताना काही क्षण काढता आले तर … देवाच्या जवळ जा!
दुःखाच्या क्षणी … त्याच्या स्पर्शाचा अनुभव घ्या !
काहीच घडत नसताना थोडे शांत क्षण लाभले तर … त्याचा आवाज ऐका !
 
                                                                                               (संगीता देशमुख यांच्याFB pageवरुन साभार)