शेकडो मैलांचा प्रवास जवळ जवळ संपला होता ...
आपल्या गुरूच्या पावलावर पाऊल टाकून त्याची पायपीट चालली होती ... पाय थकले होते ... मन कातावलं होतं .. पण उत्तराची लालसा अजून तशीच होती ... साधा सरळ प्रश्न हो - धर्म म्हणजे काय ? गुरुजींना विचारला ... नि ते म्हणाले ... चल .. स्वानुभवातून शोधून काढू ... आणि मग सुरु झाला हा न संपणारा प्रवास ... वाटेत कित्येक देवळं लागली ... अभिषेक नि पालख्या दिसल्या ... मुर्त्या नि आरत्या दिसल्या ... त्यानं विचारलं ... हाच का हो धर्म ... ? गुरुजी म्हणाले ... छे रे ... हा फक्त आभास ... ! पुढे कुठेतरी मशिदी दिसल्या ... चालती वाट अडवून डोकं टेकवणारी आणि बुडं उचलणारी जमात दिसली .. त्यानं विचारलं ... हाच का हो धर्म ... ? गुरुजी म्हणाले ... छे रे ... हा फक्त अट्टाहास ... ! तो हिरमुसला ... त्यांच्या मागून चालत राहिला ... चर्च .. धम्मगृह .. गुरुद्वारा - सगळं भेटून ही कोरडा राहिला. शेवटी न रहावून म्हणाला ... देवात धर्म नसतो ... ? गुरुजी म्हणाले .. अं हं .. देवात धर्म नसतो - धर्मात देव असतो. आपल्याला झेपेल तितकाच पाहिलेला ... झेपेल त्या रुपात पाहिलेला ... ! त्यानं पुन्हा विचारलं ... पण मग धर्म ... गुरुजी हसले .. म्हणाले .. भेटेल ना ... चालत रहा. आता खरं तर चरफडाट झाला होता त्याचा. काशी .. मक्का .. धम्मगिरीत न सापडलेला धर्म आता रस्त्यात पडलेला थोडी ना सापडणार होता. आणि विचार करता करता त्याच्या पायात काडकन काटा मोडला ... आई गं म्हणत तो खालीच बसला ... गुरुजींनी वळून पाहिलं .. धावत आले नि हलक्या हातानं पायात मोडलेला बोटभर बाभळीचा काटा काढला ... त्याकडे पाहिलं .. स्मित केलं नि तोच काटा त्याच्यासमोर धरत म्हणाले, हा बघ - हा धर्म ... ! तो गोंधळलेला ... गुरुजींनी त्याला काही अंतरावर उभं पुरुषभर उंचीचं हिरवंगार शेत दाखवलं ... त्याच्या चार ही बाजूंनी बाभळीचं कुंपण होतं ... गुरुजी हातातल्या काट्याकडे पहात म्हणाले .. ती ही बाभळ आणि ही सुद्धा बाभळ .. धर्म असाच असतो .. नीट वापरला तर संरक्षण करणारा ... नाहीतर रक्त काढणारा .... असं म्हणून गुरुजी त्यांच्या पांढऱ्या शुभ्र पंचाने त्याचा मळकट रक्ताळलेला पाय हळूवारपणे पुसू लागले आणि तो स्वतःच्याच मनाशी घोकत राहिला .. धर्म म्हणजे शेत नव्हे ... कुंपण ... फक्त कुंपण ...(शिरीष लाटकर)

No comments:
Post a Comment