Monday, January 20, 2014

तुलसी महात्म्य.

तुळशीच ठरणार कॅन्सरवर रामबाण!

जेनेटिक इंजिनीअरिंगद्वारे तुळशीची होतेय निर्मिती

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

मेडिकल क्षेत्रामध्ये तुळशीचे महत्त्व वादातीत आहे. अनेक औषधांवर उपयुक्त असणाऱ्या तुळशीमधील औषधी गुणधर्म जेनेटिक इंजिनीअरिंगचा वापर करून वाढविण्याच्या प्रयत्नांत शास्त्रज्ञ आहेत. भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञांची टीम या प्रकल्पावर सध्या काम करत आहे.

पश्चिम केंटुकी विद्यापीठातील 'प्लांट मॉलेक्युलर बायोलॉजी'चे सहायक प्राध्यापक चंद्रकांत इमानी आणि त्यांचे विद्यार्थी लॅबमध्ये तुळशीवर जेनेटिक इंजिनीअरिंगचा प्रयोग करत आहेत. तुळशीमधील 'युजेनॉल' नावाचे रसायन वाढवण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ब्रेस्ट कॅन्सरवर 'युजेनॉल' अत्यंत प्रभावशाली असून, त्यामुळे हा कॅन्सर आटोक्यात ठेवता येतो.

इमानी यांनी दावा केला आहे, 'तुळशीच्या पानांचा चुरा केला, तर युजेनॉल रसायन बाहेर येते. जेथे ट्युमरच्या पेशी आहेत, त्यावर युजेनॉल ठेवले, तर पेशींची वाढ थांबते. अनेक वर्षांपूर्वी हा प्रयोग सिद्ध झाला आहे. या 'युजेनॉल'चे प्रमाण वाढवण्यात यश आले, तर तुळशीचे झाड हे कॅन्सरविरोधी औषधाचा एक मोठा साठा असेल.'

कॅन्सरवर यशस्वी उपचार करणे, हा या संशोधन प्रकल्पातील पुढचा टप्पा आहे. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून पूर्वेकडील देशांमध्ये या झाडाचा वापर अनेक उपचारांमध्ये करतात.( दामोदर गुरुजी यांच्या टाईमलाईन वरुन साभार)

No comments:

Post a Comment