Thursday, October 16, 2014

दिनांक- १६/१०/२०१४
ही घ्या मित्रांनो अजून एका सुंदर पोस्टची भेट ........... नक्की वाचा, संग्रही ठेवा आणि शेअर करा ....... अतिशय महत्वाची पोस्ट आहे मित्रांनो ............
नमस्कार मित्रांनो...................दुसरे कुठले घड्याळ लक्षात ठेवण्यापेक्षा हे हे तुमच्या शरीराचे घड्याळ लक्षात ठेवा ..............
हा सोबत दिलेला तक्ता [चार्ट] बघा. त्या मधे दिल्या प्रमाणे आपल्या शरीरातील ऑर्गनस म्हणजे इंद्रिये काम करत असतात. या सर्व इंद्रियांच्या, अवयवांच्या जास्तीतजास्त शक्ती ओतून काम करण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. म्हणजे तुम्ही जेवल्यावर एका क्षणात अन्न पोटाच्या तळाशी जात नाही. त्यावर अक्षरश: हजारो क्रिया होतात. प्रचंड उलाढाल होते आपल्या शरीरात आणि आपल्याला पत्ता सुद्धा नसतो. पण आपले शरीर बिघडले की मग आपल्याला कफ होणे, पित्त होणे, वाताचा त्रास होणे ...... [ हा वायू फार डेंजर बाबा ............ बाहेर पडताना दिशा कोणतीही असो वरची अथवा खालची जिथून बाहेर पडतो त्याला आनंद आणि दुसऱ्याला भयंकर त्रास देतो. आणि शिवाय अर्धांगवायू वायू वगैरे ८० प्रकारचे वाताचे रोग आहेत. असो.] मळमळणे, उलट्या, सुलट्या [ जुलाब हो जुलाब], किडनी म्हणजे मूत्रपिंड विकार, हृदय विकार असे एक ना दोन शेकडो-हजारो तक्रारी सुरु होतात. कारण कळत नाही. कफ झाला लाव विकस, पित्त झाले पी दुध किंवा काढ ओकाऱ्या असे सुरु होते. म्हणजे “आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी” असा प्रकार होऊन बसतो. पण मूळ कारणावर कोणीच लक्ष देत नाही.
जर आपण दिवसातील [ आणि रात्रीची सुद्धा] सर्व कामे निहित वेळेत म्हणजे ठरलेल्या योग्य वेळी केली तर शक्यतो आजारपण येणार नाही किंवा येत नाही. भारत, चीन आणि जगभर या शरीरात चालणाऱ्या घडामोडींवर अभ्यास चालू आहे. निसर्गात प्रत्येक गोष्टीचे एक चक्र आहे. त्याला सिर्काडीयन सायकल असे म्हणतात. आपल्या शरीरात जे काही चालू असते ते सुधा खरे तर अतिशय शिस्तबद्ध असते. आपण त्याची वाट लावत असतो. चला तर आपण बघू या शरीराचे घड्याळ काम कसे करते ते ........
रात्री- १ ते ३ वाजेपर्यंत- लिव्हर म्हणजे यकृताची वेळ- यकृत आत्ता दिवसभर आलेल्या अन्नावर जोराने प्रक्रिया सुरु करते. आणि विषांचा निचरा करते. खूप खोल विश्रांतीचा हा काळ आहे. स्वप्ने जास्त पडतात. या वेळेला शरीराला ताण दिल्यास भयंकर राग येतो, वाढतो. लहान आतडे या वेळेत अतिशय कमी कार्यक्षम असल्याने आत्ता काहीही खाल्ले तर अतिशय त्रास होतो.
रात्री ३ ते पहाटे ५ वाजेपर्यंत फुफ्फुसांची वेळ- फुफ्फुसे आणि श्वसनसंबंधित सारे अवयव, नाक्पुड्यान मधल्या पोकळ्या हे आत्ता उत्तम कार्य करते. साफ केले जाते. श्वसन उत्तम चालते. आणि पहाटे झोपेतून उठण्यासाठी शरीराची हळूहळू तयारी केली जाते. जडपणा आणि थोडे दु:खी वाटण्याचा हा कालवधी आहे.
पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठ्या आतड्याची वेळ- मोठे आतडे कार्यक्षम होऊन शरीरातील मल बाहेर टाकण्यासाठी या आतड्याची जोरदार हालचाल सुरु होते. अकार्यक्षम आणि अपराधीपणा वाटण्याचा हा कालावधी आहे.
सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत स्टमक म्हणजे जठराची वेळ- पचनाची सर्वोत्तम वेळ. प्रोटीन्स वगैरे भरपूर असलेला आहार याचे वेळेत घ्यावा. निराश, उद्विग्न वाटण्याचा हा काळ आहे.
सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत स्प्लीन म्हणजे प्लीहेची वेळ- शरीरातील उर्जा प्रवाह कार्यान्वित होतात. अन्न रक्तात आणि उर्जेत वेगाने बदलले जाऊ लागते. या वेळेत Allergy चा त्रास जाणवू शकतो. पण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम प्लीहा करत असते. विचार करायला आणि काम करायला ही वेळ सर्वोत्तम होय. स्वत:चा अभिमान किंवा अहंकार, स्वाभिमान, भीती, असूया वाटण्याचा हाच कालावधी होय.
सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हार्ट म्हणजे हृदयाची वेळ- हृदयाची धडधड या काळात वाढते. आणि असे बघितले गेलेले आहे की हार्ट Attacks या वेळेतच जास्त प्रमाणात येतात. जास्त उन्हात जाऊ नये. किंवा जास्त जोराचा व्यायाम या काळात करू नये. खानपान, भेटणे, बोलणे यासाठी उत्तम काळ आहे हा. या काळात मन आनंदित रहाते तसेच दु:ख सुद्धा वाटू शकते.
दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्याची वेळ- या वेळेत लहान आतड्याचे काम जोरात चालते. याच वेळेत अपचन, पोटात दुखणे, उलटीची भावना हे त्रास जास्त जाणवतात. या काळत विश्लेषण आणि एखाद्या कामाचे नियोजन करणे ही कामे करावीत. या काळात आपल्याला थोडे असुरक्षित वाटू शकते.
दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत Bladder म्हणजे मूत्राशयाची वेळ- ही वेळ आहे मूत्राशयाची. म्हणजे जिथे लाघवी गाळून आल्यावर साठते ती जागा किंवा पिशवी. या वेळेत त्वचा विकार, खाज, खरुज हे जास्त जाणवते. या वेळेत ग्लानी म्हणजे थकव्यामुळे थोडी झोप आल्या सारखे वाटते. एक वामकुक्षी घेतल्याने बरे वाटते. या वेळेत थोडे क्षारयुक्त पदार्थ खाल्ले तर फायदा होतो. संग्रह आणि साठवणुकीची कामे यासाठी उत्तम वेळ. पण भयंकर आळस हा या वेळेचा दोष आहे.
संध्याकाळी ५ ते ७ किडनी म्हणजे मुत्रपिंडांची वेळ- जर Adrenal ग्रंथी नीट काम करत नसल्या तर हा मगाचा जो आळस आहे ना तो या काळात सुद्धा पुढे चालूच रहातो. या ग्रंथी चांगल्या असल्या तर पुन्हा एकदा कामाचा जोश येतो. कामाचे एकत्रीकरण आणि गाडी चालवणे यासाठी ही वेळ छान. याच वेळेत भीती वाटते, वाढते आणि गुन्हे सुद्धा घडतात.
रात्री ७ ते ९ पेरी कार्डीयमची वेळ- लैंगिक ग्रंथी या वेळेत जास्त कार्यक्षम होतात. इच्छा वाढतात. या खराब, दबलेल्या असल्या तर या वेळेत पाठीत दुखणे जाणवते. प्रेम करणे, प्रणय, लोकांमध्ये मिसळणे यासाठी हा समय मस्त. पलीकडून प्रतिसाद येत नाही असे वाटणे किंवा स्वत:कडून दिला न जाणे, आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत असे वाटणे, आपण दुखावले गेलो आहोत असे वाटणे किंवा खूप खूप आनंद वाटते, खूप मज्जा मज्जा येणे हे असे सारे या वेळेत वाटू शकते.
रात्री ९ ते ११ ट्रिपल वॉरमरची वेळ- शरीरातील सर्व आंतरस्त्रावी ग्रंथी या वेळेत उत्तमपणे कार्यान्वित झालेल्या असतात. तसेच रक्त वाहिन्या सुद्धा जोरोशोरोपे असतात. दमल्यासारखे वाटणे [स्वाभाविक आहे म्हणा], अशक्तपणा वाटणे, डोके दुखणे हे त्रास या वेळेत होतात. आराम करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. गोंधळल्यासारखे वाटणे, कशातच काही अर्थ नाही असे वाटणे हे भाव या वेळेस मनात येऊ शकतात.
रात्री ११ ते १ गॉल Bladder म्हणजे पित्ताशयाची वेळ- झालेली झीज भरून काढण्याचा हा काळ आहे. या वेळेत जर त्रास होत असेल, झोप येत नसेल, झोप लागत नसेल, जाग येत असेल तर अशी शक्यता आहे की पित्ताशय आणि यकृतावर ताण येतो आहे. आणि पाचानातून निर्माण होणारी ही विषे नाकाम करायला यकृताला त्रास होतो आहे. त्यामुळे मेंदूच्या कामात अडथळे येत आहेत. एखाद्याच्या बद्दल कडवटपणा या काळात वाढतो, वाटतो.
मला माहित आहे मित्रांनो की आजच्या या धकाधकीच्या जीवनात यातील एकही गोष्ट या सांगितलेल्या वेळेत होणार नाही. पण आपल्याला जे आणि जसे जमेल तसे आपण प्रयत्न करत रहायचे आहेत. पुन्हा भेटू नवीन माहितीसह ...........
आपला मित्र,
Dr. हेमंत उर्फ कलादास ................
LikeLike ·  · 

Sunday, September 21, 2014

ज्योतिषशास्त्र..भाग1

दिनांक – २१/०९/२०१४
ज्योतिषशास्त्र – भाग १
मित्रांनो अवश्य वाचा हा लेख आणि लाभ करून घ्या ....लेख मोठा आहे, वाचायचा कंटाळा करू नका.....नक्की आवडेल .... संग्रही ठेवाच ....माझे फोन नंबर्स आहेत – 9158510598 / 9890369845 .
आज पर्यंत अनेक विद्वान आणि सामान्य माणसांना ज्योतिष हे खरे की खोटे, ते शास्त्र की अशास्त्र या विषयाने भंडावून सोडले आहे. तरीही जगात अनेक लोकांनी याचा सकारात्मक उपयोग करून घेतला आहे. विदेशात यावर प्रचंड काम झाले आहे. मी काही ज्योतिषातील किंवा विज्ञानातील [ या दोन्ही गोष्टी शिकलो असलो तरीही] कोणी अधिकारी व्यक्ती नाही. किंवा माझा शब्द म्हणजे यातील अंतिम शब्द नव्हे. पण एका नव्या दृष्टीने अभ्यास करायला काय हरकत आहे. मी माझा विचार मांडतो आहे.
प्रेम हे सुद्धा शास्त्राच्या कसोटी वर उतरणार नाही कदाचित म्हणून ते त्याज्य कसे ठरू शकेल? ज्योतिष या विषयाचे असेच आहे. अभ्यास कमी पडत असेल.....संबंध मानवी मनाशी आणि आपल्या हातात नसलेल्या घटनांशी आहे ....त्यामुळे ज्योतिष खोटे ठरू शकते????...हवामान खाते रोज खोटे ठरतेय शास्त्र असून, इलेक्ट्रोन अजून कोणी पाहिला नाहीये कारण त्याला पहायला गेले की तो जागाच सोडतो त्यामुळे त्याचा अभ्यासच करता येत नाही ....एका क्वार्कने उजवा स्पिन घेतला की त्याचा समसंबंधी दुसरा क्वार्क प्रचंड दूर असला तरी उलटी फिरकी घेतो हे केवळ गणिता वरून शास्त्रज्ञ म्हणतात....प्रकाश कण आहे की लहर आहे हे अजून कळले नाहीये....अशा अनंत गोष्टी कळल्या नाहीत तरी आख्ख्या विज्ञानाला कोणी खोटे ठरवत नाही ना? मुळात हा अभ्यास खूप कठीण, गहन आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनाचा आहे.....आणि अशा किचकट मानवी घटनांचा आहे ..आणि आपल्या ज्या ऋषींनी आपल्या या महान धर्माची उभारणी केली, सण, उत्सव, परंपरा, अतिशय प्रगत असे आहार शास्त्र, आयुर्वेद ज्या ऋषीमुनींनी दिला त्यांनीच हे शास्त्र सांगितले आहे. आणि हे धर्मशास्त्र आहे हेच मुळी चूक आहे....फक्त धर्माने सांगितले की माणूस ऐकतो म्हणून केवळ धर्माशी ते जोडले आहे.
आकाशात जसे ९ ग्रह आहेत – सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू तशा आपल्या शरीरात थालामास. हायपोथालामास, पिच्युटरी, पिनिअल, थायरॉइड थायमस, Adrenal , सेक्स गोनाड्स, यकृत, स्वादुपिंडे अशा ग्रंथी आहेत.....सूर्य म्हणजे थालामास, चंद्र म्हणजे हायपोथालामास, गुरु म्हणजे पिच्युटरी, बुध म्हणजे पिनिअल ग्रंथी तसेच थायमस या बालपणातच कार्यरत असणाऱ्या ग्रंथीवर आणि मज्जातंतूंवर देखील बुधाचा प्रभाव, मंगळ म्हणजे थायरॉइड, Adrenal वर मंगळ आणि शनी दोन्हीचा प्रभाव, शुक्र ग्रहाचा लैंगिक ग्रंथी अथवा सेक्स गोनाड्स आणि मूत्रपिंडानवर प्रभाव असतो, स्वादुपिंडानवर सूर्याचा प्रभाव तर यकृतावर गुरुचा आणि शनिचा प्रभाव, शनिचा प्लीहेवर [स्प्लीन] प्रभाव असतो आणि एकूणच पचनावर नियंत्रण असते...... राहू आणि केतू हे शरीरातील ग्रंथींच्या कामात विघ्न, वितुष्ट आणणारे असेंडिंग आणि डीसेन्डींग नोड्स आहेत. उत्तर आणि दक्षिण ध्रुव असावे तसेच.
आकाशस्थ ग्रहांकडून येणारया किरणांचा यावर नक्की प्रभाव पडतो. आईच्या पोटातून बाळ जन्माला येण्यापूर्वी ते नाळेने आईशी जोडले गेलेले असते आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असते. ज्या क्षणी ते पृथ्वीवर पहिले पाउल ठेवते त्या क्षणाला त्याच्या शरीरातील या सगळ्या ग्रंथी काम करणे सुरु करतात. आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणारा तक्ता म्हणजे आपली कुंडली किंवा पत्रिका .... आईच्या पोटातून बाळ जन्माला येण्यापूर्वी ते नाळेने आईशी जोडले गेलेले असते आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असते. ज्या क्षणी ते पृथ्वीवर पहिले पाउल ठेवते त्या क्षणाला त्याच्या शरीरातील या सगळ्या ग्रंथी काम करणे सुरु करतात. आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणारा तक्ता म्हणजे आपली कुंडली किंवा पत्रिका ....या ग्रंथींमधून पाझरणारे हार्मोन्स किंवा संप्रेरके एकमेकांशी कसे, कुठे, किती, का, केव्हा व्यक्त होतात किंवा React होतात त्यावर आपले वागणे अवलंबून असते. आपली मानसिक स्थिती बदलेल तसे हे प्रत्येक निमिषार्धात बदलत असते. [ एक निमिष – पापणी लावण्याचा काल]. मग याचे प्रेडिक्शन किंवा भाकीत करणे किती अवघड असेल याचा तुम्हीच विचार करा. तुम्ही पत्रिकेचा तटस्थ राहून [ पत्रिका खरी नाहीच अशी ठाम समजूत काही काळ बाजूला ठेऊन] अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की ....होय बर्याच गोष्टी जुळताहेत.....पुढचा त्रास वाचवायला त्याचा नक्की उपयोग होतोय.....पण काय आहे ना .....आपले एकदा मत झाले की झाले....मग त्याच दृष्टीने विचार करायचा....हे ठीक नाही .......आजच्या खगोल विज्ञानाची सगळी मांडणी ऋषींनी जे खगोल शास्त्र मांडले होते ना त्यावरूनच झाली आहे. प्रकाशाच्या वेगाने गेले तर आपले वस्तुमान नष्ट होते. त्यामुळे अनेक प्रकाश वर्षे दूर असलेल्या तारयांचा यंत्राने, याने वापरून कोणीही अभ्यास करू शकत नाही हे ऋषींनी जाणले होते म्हणून त्यांनी हे ध्यान प्रक्रियेतून हे सारे जाऊन घेतले....आजच्या खगोल विज्ञानाची सगळी मांडणी ऋषींनी जे खगोल शास्त्र मांडले होते ना त्यावरूनच झाली आहे. प्रकाशाच्या वेगाने गेले तर आपले वस्तुमान नष्ट होते. त्यामुळे अनेक प्रकाश वर्षे दूर असलेल्या तारयांचा यंत्राने, याने वापरून कोणीही अभ्यास करू शकत नाही हे ऋषींनी जाणले होते म्हणून त्यांनी हे ध्यान प्रक्रियेतून खगोल, अंतराळ जाणून घेतले....पाश्च्यात्यांनी या नक्षत्रे, ग्रहांना ठेवलेली नावेही बरीचशी आपल्या नावांशी साधर्म्य दाखवणारी आहेत. शनैश्चर म्हणजे शनीचा अपभ्रंश Satturn ...सूनु हा सूर्यासाठी असलेला संस्कृत शब्द आहे त्यावरून सन आले आहे. आपल्या ऋषींनी सांगून ठेवलेय की चंद्र हा पृथ्वीचा पुत्र नसून मंगल म्हणजे भौम [भूमीचा पुत्र, भूमी पासून निघालेला ] हा भूमीचा पुत्र आहे. आणि प्रशांत महासागर अर्थात Pacific महासागराचे जेव्हढे क्षेत्रफळ आहे तेव्हढेच मंगळाचे आहे. मंगळावर आता पाणी सापडल्याच्या बातम्या आणि फोटो आलेत.....चंद्र शुष्क आहे....त्याचे वय पृथ्वी पेक्षा जास्त आहे आणि चंद्र बाहेरून पृथ्वीच्या वातावरणात नंतर पकडला गेला आहे..... आपले धर्मशास्त्र हे “ओम ब्रुम फट” आणि भगवे कपडे घालून हरी हरी करा असे काहीतरी नुसते करायला शिकवते हे आधी डोक्यातून काढून टाका.....आणि त्याला ऋषींनी "शास्त्र" म्हंटले आहे इतकेच लक्षात घ्या म्हणजे पुरेल .....
ग्रहांच्या जाती म्हणजे ते कुठल्या वेळेस कसे वागतील हे सोपेपणाने कळावे म्हणून त्यावेळेस, त्या कालानुसार दिलेली उपमा.....आजही झाडांच्या प्रकारांना जाती आहेतच ... ज्योतिषशास्त्र चातुर्वर्ण्याचा पुरस्कार नाही करत ....ती त्या कालानुसार त्या त्या ग्रहांची वागण्याची पद्धत सांगण्याची संकल्पना होती. आणि राहू केतु हे ग्रह नाहीत. सूर्य चंद्र फिरत असताना जे संपात बिंदू तयार होतात ते म्हणजे राहू केतू आहेत हेही तिथे स्पष्ट सांगितले आहे. आपण त्याची उकल करायला कमी पडलो म्हणून ते खोटे ठरवणे हा अहंकार नाही का? एखादी गोष्ट खोटे ठरवायला फार अभ्यास नाही लागत....तुलनेने ते सोपे असते....खरे ठरवणेच अवघड असते.....आणि नेमके होते हे आहे की विज्ञान आणि ज्योतिष हे दोन्ही शिकलेले हे सांगायला पुढे येत नाहीयेत .....कारण खोटे ठरवणारे हे झाले की ते, ते झाले की ते ....असे कुठलेतरी सिद्ध न झालेले संदर्भच देऊन बोलत रहातात.....मग हा संवाद न होता वाद होतो.....त्यामुळे अभ्यासु व्यक्ती अशा ठिकाणी फिरकत नाहीत.....सारया जगात ज्योतिषाचा प्रचार, प्रसार आहे. ते देश त्याचा उपयोग करून घेत आहेत. किरोने सांगितलेली भविष्ये जागतिक स्तरावर खरी ठरली आहेत.....आपण ६० - ७० वर्षे आयुष्य असलेले काही वर्षांचे क्षणिक पथिक हा हजारो वर्षांचा ठेवा ४ बुके शिकलो म्हणून पुसू शकतो काय? आणि त्याही पेक्षा तो पुसावा काय?
आपण थोडक्यात या ग्रंथींचे कार्य कसे चालते हे पाहू. आणि आपले शरीर केवळ या ग्रंथींवर चालत नसून या ग्रंथी पाठीच्या कण्यात किंवा कण्याजवळ असलेल्या मज्जातंतूंच्या जुडग्याला Ganglion असे म्हणतात. [Anatomy - a concentrated mass of interconnected nerve cells. / Pathology - a cystic tumor formed on the sheath of a tendon. In neurological contexts, ganglia are composed mainly of somata and dendritic structures which are bundled or connected. Ganglia often interconnect with other ganglia to form a complex system of ganglia known as a plexus. Ganglia provide relay points and intermediary connections between different neurological structures in the body, such as the peripheral and central nervous systems. ]. चक्रांविषयी अधिक माहिती मी माझ्या चक्रे या लेखात देईन.
आलं लक्षात? हे गांग्लिया म्हणजेच Plexuses होत. भारतीय ऋषींनी यांना चक्रे, दले किंवा कमळे म्हंटले आहे. यांची रचना सुद्धा कमळांच्या दळांसारखीच म्हणजे पाकळ्यांसारखीच असते. या चक्रांमधून म्हणजे Ganglion च्या जुडग्यांच्या मधून त्या त्या अवयवात मज्जातंतू गेलेले असतात. तर या चक्रांच्या द्वारा मेंदू मणक्यातून शरीराशी संपर्क ठेवत असतो. आणि यातून जे संदेश येत जात असतात त्याला प्रतिसाद देत शरीरातील Glands म्हणजे ग्रंथी काम करत असतात. यांना बाहेर घडणारया गोष्टींचे ज्ञान डोळे, कान, स्पर्शेंद्रीये, कान हे देत असतात. जिभेला चव कळते. तर मग बघा हे काम किती गुंतागुंतीचे आहे. एखाद्या मुलीला तिच्या प्रियकराचे नाव घेऊन चिडवले तर तिचे गाल लाल होतात, सभेत भाषण करायची वेळ आली की पाय थरथरायला लागतात, सारखी लघवीला लागते. हे सारे व्यापार ग्रंथी आणि चक्रे यांनी घडवून आणलेले असतात.
Thamamus [ आपल्या भाषेत सूर्य] मेंदूत ही सर्वात वर असणारी ग्रंथी आहे. हा या सर्व ग्रंथींच्या कामावर दृष्टी ठेऊन असतो. सूर्य म्हणजे आत्मा.....आत्मविश्वास....तिचा खालचा भाग म्हणजे Hypo-Thalamus [ आपल्या भाषेत चंद्र]. “चंद्रमा मनसो जात:” चंद्र म्हणजे माणसाचे मन होय. या सारया ग्रंथींचा व्यवस्थापक म्हणजे ही हायपोथालामस ग्रंथी होय. आपले मनच सुख आणि दु:ख भोगत असते आणि जे आहे त्यापेक्षा ते मोठे करून बघत असते. उष्णता आणि थंडी याला दिला जाणारा प्रतिसाद, पाणी, इलेक्ट्रोलाईट्स, साखर, स्निग्ध पदार्थ यांची चयापचय क्रिया, भूक वाढ, पचन, झोप, घाम अशी बरीच कार्ये अवस्थली म्हणजे हायपोथालामस म्हणजे चंद्र या ग्रंथी कडून पोष ग्रंथी म्हणजे पिच्युटरी म्हणजे गुरु ग्रंथीला दिल्या गेलेल्या सुचनेनुसार होत असतात. पिच्युटरी म्हणजे पोष ग्रंथी किंवा गुरु ग्रंथीचे “Antiriar आणि postiriar म्हणजे पुढचा आणि मागचा असे २ भाग असतात. ही ग्रंथी पोषण देण्यास मदत करते. इतर ग्रंथींना स्त्रवण्यास उद्युक्त करते. म्हणून पोष ग्रंथी आणि हिच्या हार्मोन्सना Trophic हार्मोन्स किंवा पौष्टिक संप्रेरके म्हणतात. बुध म्हणजे पिनिअल ही ग्रंथी प्रकाश संवेदी ग्रंथी आहे. म्हणजे प्रकाशात ती कार्यरत होते. तिच्यातून Melatonin नावाचे हार्मोन स्त्रवते. या ग्रंथीतून जे सिराटोनीन नावाचे हार्मोन स्त्रवते त्यामुळे शांत झोप लागते. मनाची अवस्था चांगली रहाते. शरीरातील केसांच्या वाढीवर या ग्रंथीचे नियंत्रण असते. जास्त उन्हात हिंडल्यास ही ग्रंथी जास्त कार्यरत होऊन शरीरावर केस वाढतात. किंवा ते पिकतात. म्हणून स्त्रियांनी डोक्यावर पदर घेण्याची प्रथा आली असावी. म्हण आहे ना की “आत्याबाईला मिशा असत्या तर?” स्त्रियांना दाढी, मिशा चांगल्या दिसणार नाहीत. सध्याच्या मानवात त्याच्या चुकीच्या वागण्याने या ग्रंथीचे कार्य जवळपास लोप पावले आहे. शंकरांचा ३ रा डोळा दुसरा तिसरा कोणताही नसून ही ग्रंथीच होय. कारण ही फोटो-सेन्सेटिव्ह म्हणजे प्रकाशाने उत्तेजित, उद्दीपित होऊन कार्य करणारी आहे. पण अजूनही शास्त्रज्ञांना या ग्रंथीचे कार्य पूर्णपणे समजलेले नाहीये. मन शांत ठेऊन डोळ्यांद्वारा बाहेरचे ज्ञान करून देणे हे या ग्रंथीचे काम म्हणता येईल....ज्याला आपण Jet Lag म्हणतो ते झाले म्हणजे विमानाने प्रवास करून आपण वेगळ्या देशात जिथे दिवस रात्र वेगळ्या वेळेस आहेत तिथे आपला दिवसाचा दिनक्रम बदलून आपल्याला शारीरिक त्रास जाणवतो, आपले रोजचे चक्र ज्याला “Circadian Cycle” असे म्हणतात ते बिघडते. याला कारण हा बुध बिघडतो..... मंगळ जसा शक्ती, उर्जा, धाडस देणारा ग्रह आहे त्याप्रमाणेच Thyroid [ अवटू आणि परा- अवटू हे तिचे दोन भाग- गणपतीच्या भाषेत या त्याच्या २ कार्यकारी शक्ती ऋद्धी- सिद्धी होत. मंगळ ग्रहाच्या भाषेत हे त्याचे २ उपग्रह Dymo आणि Fobos होत.] किंवा ही ग्रंथी शरीराला उर्जा, शक्ती पुरवते. तसेच पराअवटू ही ग्रंथी शरीरातील Calcium चे संतुलन राखते. स्वादुपिंडातील अल्फा आणि बीटा या दोन प्रकारच्या पेशी वेगवेगळी कामे करतात. अल्फा Glucagon, तर बीटा इंश्युलीन निर्माण करून शरीरातील साखरेचे पचन करतात. मूत्रपिंडे म्हणजे किडनीज किंवा किडन्या या रक्त गाळून लघवीवाटे शरीरातील न पचलेली, दुषित द्रव्ये बाहेर काढतात. पण या किडन्यांवर असलेल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणजे Adrenal Glands या आपण घाबरतो तेव्हा आपल्याला मदत करतात. जे म्हंटले जाते की आपण संकटात असताना आपण ३ पैकी १ कृती करतो.... Flee, Fright ओर Fight म्हणजे जर एखाद्या जंगलात आपल्या समोर सिंह आला तर आपण काय करू? पळून जाऊ, घाबरून तिथेच मटकन खाली बसू किंवा सिंहाशी लढू....हे सारे या Adrenal ग्रंथीतून जो हार्मोन स्त्रवेल त्यावर अवलंबून असते.... यकृत हा शरीरातील कामाचा एक कारखाना आहे. तिथे अनंत घडामोडी, अनंत कामे सतत चालू असतात. हृदय हे केवळ रक्त शुद्ध करून शरीराला पुरवणारा एक पंप नसून त्याचे वरचे कप्पे Atria मधून Atrial Natriuretic Factor नावाचे एक संप्रेरक स्त्रवते. हे संप्रेरक इतर स्त्रावांशी हातमिळवणी करून रक्तदाब आणि रक्ताचे आकारमान यांचे मियंत्रण अचूक होण्यास मदत करते. “हृदय” या शब्दाचा अर्थ आपण पाहू. “हर” म्हणजे हरणे, काढून घेणे [जसे रावणाने सीतेचे हरण केले. हरीण नव्हे.]. “द” म्हणजे देणे आणि “य” म्हणजे नियमन करणे. [ बघा यम आणि नियम यात य आहे.]. याचाच अर्थ हृदय हे रक्त आधी शरीरातून काढून घेते, ते परत देणे शरीराला आणि त्याचे शरीरात उत्तम नियमन करते. म्हणजे रक्तदाब योग्य ठेवते.
पुढे ज्या वेळा देतो आहे त्या वारा नुसार त्या त्या वेळा टाळून शुभ कार्य करावे. या काळाला राहू काल म्हणतात. या काळात अपयश येण्याची शक्यता असते. विश्वास असेल त्यांनी करावे, नसल्यास सोडून द्यावे. प्रयोग करून बघण्यास हरकत नाही. घरच्या कॅलेंडरवर या वारांना या वेळा लिहून ठेवा.
सोमवार- सकाळी साडेसात ते नऊ.
मंगळवार – दुपारी तीन ते साडेचार.
बुधवार – सकाळी बारा ते दीड.
गुरुवार – दुपारी दीड ते तीन.
शुक्रवार – सकाळी साडेदहा ते बारा.
शनिवार – सकाळी नऊ ते साडेदहा.
रविवार – संध्याकाळी साडेचार ते सहा.
आज इथेच थांबतो. पुन्हा अधिक माहिती सहित भेटू या ....
आपला राशिचक्रम मित्र,
Dr. हेमंत उर्फ कलादास “कर्क”मकर.....
आश्लेषा नक्षत्राच्या आतील बाजूस,
आकाशगंगा वसाहत, चंद्रलोक पार्क,

Friday, September 19, 2014

प्राणायाम..

नमस्कार मित्रांनो,
आज थोडेसे प्राणायामाबद्दल....आज श्वास आणि प्राणायामाबद्दल जास्तीत जास्त [परिपूर्ण नव्हे] माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अवश्य अवश्य वाचा...कृपया कंटाळा करू नका...आवडले का ते अवश्य सांगा....केवळ "Like" मारून पुढे जाऊ नका. तुम्ही हा लेख तुमच्या संग्रही ठेवलात तरी चालेल.
मित्रांनो प्राण हाच जीवनाचा आधार आहे. प्राण हेच जीवन आहे. प्राण हेच सर्वस्व आहे...पंचप्राणांनी प्रिय व्यक्तीला ओवाळणारी भारतीय नारी हेच तर सांगत असते. प्राण या नटाबद्दल आपल्याला जेव्हढी माहिती असते त्याच्या एक सहस्रांश सुद्धा माहिती २ नाकपुड्यांतून वाहणारया या "प्राण" म्हणजेच श्वासाबद्दल नसते. प्राण म्हणजे प्र + आन = विशिष्ट गतीने पुढे आणणे/ नेणे. जसे प्रकाश म्हणजे प्र + काश = पुढे + पोकळीला आवरण करीत जाणे,प्रगती म्हणजे पुढे + गती अर्थात पुढे नेणारी गती होय.
प्राण या सृष्टीत "ओतप्रोत" [ओत= ओतान अर्थात इलेक्ट्रोनस तर प्रोत म्हणजे प्रोटोनस होय....याचाच अर्थ हे जग इलेक्ट्रोन आणि प्रोटोन्स यांनी बनलेले आहे हे आपल्या धोतर नेसणारया, जटा वाढवणारया आणि जंगलात राहणारया ऋषींना माहित होते तर.......!!!!!] भरून राहिला आहे. जेव्हा तो मानव प्राणी अथवा प्राणी यांच्या नाकपुडीतून संचार करतो तेव्हा त्याला श्वास असे म्हणतात.
हा श्वास एका वेळी डाव्या किंवा उजव्या नाकपुडीतून वाहत असतो. डाव्या नाकपुडीला चंद्र नाडी अथवा इडा असे म्हणतात. आणि उजव्या नाकपुडीला पिडा अथवा पिंगला असे म्हणतात. डाव्या नाकपुडीतून श्वास वाहात असताना तो कमी उष्ण असतो तर उजव्या नाकपुडीतून वाहताना श्वास तुलनेने थोडा जास्त उष्ण असतो. दिवसातील काही क्षण असे असतात की ज्या वेळेला श्वास दोन्ही नाकपुड्यानमधून वाहात असतो. या प्रकाराला "सुषुम्ना" नाडी असे म्हंटले जाते. सुषुम्ना नाडी अतिशय क्रूर समजली गेलेली असून या नाडीवर म्हणजे सुषुम्ना चालू असताना कोणतेही शुभ कार्य, मंगल कार्य अजिबात करू नये. अपयश येण्याची शक्यता जास्त असते. फक्त देवाची उपासना, ध्यान या वेळेस करावे. घराच्या बाहेर पडू नये. सर्वसाधारणपणे सकाळी ६, दुपारी १२, संध्याकाळी ६ आणि रात्री १२ वाजता सुषुम्ना नाडी विशेष करून चालू असते. म्हणूनच पूर्वी संध्याकाळी मुलांची दृष्ट काढताना "इडा पीडा टळो" असे म्हंटले जात असे. म्हणजे "इडा आणि पिडा" म्हणजे चंद्र आणि सूर्य नाकपुडी एकाच वेळेस चालू असणारी सुषुम्ना नाकपुडी जी या वेळेस चालू असते तिच्यामुळे होणारे त्रास दूर होवोत....शास्त्रीय भाषेत सांगायचे तर चंद्र नाकपुडी चालू असताना उजवा मेंदू आणि सूर्य नाकपुडी चालू असताना डावा मेंदू चालू असतो. आधुनिक विज्ञान सुद्धा हेच सांगते की एका वेळेस मेंदूचा एकच अर्धा भाग काम करत असतो असतो. मूर्ती शास्त्र - डाव्या सोंडेचा गणपती, उजव्या सोंडेचा गणपती यावरच आधारलेले आहे. सुषुम्ना नाडी चालू असताना दोन्ही मेंदू एकाच वेळेस काम करून एकमेकांशी जुळवणूक करून घेत असतात. दुसरया भाषेत सांगायचे तर मेंदूचा प्रत्येक एक भाग दुसर्या भागाच्या कार्यकालात शरीरात काय घडामोडी झाल्या आहेत हे समजून घेण्यात व्यस्त असतो. भारतीय अध्यात्म शास्त्रानुसार मन हे आत्म्यात विलीन झालेले असते. आणि आपले बाहेरच्या घडामोडींकडे थोडे दुर्लक्ष झालेले असते. त्यामुळे एखादी वाईट घटना घडू शकते......आता एखाद्या अडाणी मातेने इडा पिडा टळो असे म्हंटल्यावर "तथाकथित/सो called विज्ञानवादी हसणार नाहीत असा विश्वास आहे. ह्याच नाड्यांचे संयमान करण्यासाठी "रामदास स्वामी" आणि इतर योग्यांकडे "योगदंड किंवा कुबडी" असे. तसेच रामदास स्वामींच्या या कुबडी मध्ये गुप्ती सारखे शस्त्रही होते. ज्याचा उपयोग शत्रूशी वेळप्रसंगी लढण्यासाठी होत असे. जी नाकपुडी वाहणे चालू करायचे असते तिच्या उलट बाजूच्या काखेत हा दंड, आपला हात किंवा इतर एखादी वस्तू दाबून धरल्यास विरुद्ध बाजूची नाकपुडी वाहणे सुरु होते.]
चंद्र स्वरावर आकुंचन होते तर सुर्यस्वरावर प्रसरण होते. चंद्र स्वरावर अर्थात चंद्र/इडा नदीवर म्हणजेच डावी नाकपुडी चालू असताना शुभ कार्ये, पाणी पिणे वगैरे कामे करावी. तर उजवी नाकपुडी चालू असताना क्रूर कामे, जिथे शक्ती जास्त आवश्यक अशी कामे, भोजन वगैरे करावे. उन्हात जाताना उजवी नाकपुडी चालू असताना गेले तर त्रास कमी होतो आणि याच्या उलट डावी नाकपुडी चालू असताना उन्हात हिंडले तर त्रास जास्त होतो. जेवताना आणि जेवल्या नंतर उजवी नाकपुडी चालू असेल तर पचन चांगले होते. म्हणूनच दुपारी जेवल्यावर वामकुक्षी घ्यावी असे जे म्हंटले जाते ते याचसाठी. "वाम" म्हणजे डावी बाजू. कुक्षी म्हणजे कूस. कुशी. डाव्या कुशीवर झोपल्याने उजवी नाकपुडी अर्थात सुर्यस्वर चालू होतो. सूर्य स्वर चालू झाल्याने शरीरातील ग्रंथी, आतडी प्रसारित होतात. पोटात पचनासाठी आवश्यक असलेली उष्णता वाढते. अन्न पुढे ढकलले जाते. याच्या उलट चंद्र स्वरावर होऊन पचन बिघडते. मलबद्धता म्हणजेच बद्धकोष्ठ अथवा पोट साफ न होण्याचा त्रास होऊ लागतो. चंद्र नाकपुडी जास्त काल वाहिल्यास थंडी, सर्दी आणि अपचनाचे विकार, सूर्य नाकपुडी जास्त वाहिल्याने उष्णता, पित्त विकार, ताप, शरीर शिथिल होणे असे त्रास होतात. सुषुम्ना खरे तर दिवसातून अतिशय अल्प वेळ वाहते. पण ती जास्त काल वाहिल्यास अंतर्स्त्रावी ग्रंथींचे विकार, Cancer असे विकार होण्याची शक्यता बळावते.
या प्राणाचे ५ प्रमुख आणि ५ उपप्रकार आहेत.
१] प्राण- हृदयात रहातो. हाच आपला मुख्य प्राण होय.
२] अपान- गुदस्थानी रहातो. अन्न पुढे ढकलून मालाचे उत्सर्जन करणे हे याचे काम.
३] व्यान- सर्व शरीरभर व्यापून रहातो. सर्व शरीराचे संतुलन राखणे हे याचे काम.
४] उदान- कंठामध्ये रहातो. याच्याच योगाने आपण बोलू शकतो.
५] समान- नाभी स्थानी रहातो. हा पचन घडवून आणतो.
प्राणांचे ५ उपप्रकार असे-
१] नाग- ढेकर आणतो.
२] कूर्म- नेत्रोन्मीलनकर्ता अर्थात डोळ्यांची उघडझाप करतो.
३] कृकल- शिंक आणतो.
४] देवदत्त-जांभई आणणारा.
५] धनंजय- सर्व शरीरभर व्यापून रहातो आणि मृत्युनंतर सुद्धा शरीर सोडत नाही.
वर उल्लेख केलेल्या सूर्य नाडी, चंद्र नाडी आणि सुषुम्ना नाडी व्यतिरिक्त अजून ७ नाड्या आहेत. नाडी स्ट्रीम किंवा प्रवाह असा अर्थ घ्या. इडा डावीकडे, पिंगला उजवीकडे, सुषुम्ना मध्यात, गांधारी डाव्या डोळ्या जवळ, हस्तिजिव्हा उजव्या डोळ्याजवळ, पूषा उजव्या कानाजवळ, यशस्विनी डाव्या कानाजवळ, अलम्बुषा मुखात, कुहू लिंगाच्या ठायी [जननेनद्रीया जवळ] आणि शंखिनी मूलस्थानी अर्थात गुदस्थानी रहाते.
श्वासोच्छ्वास करत असताना श्वास आत जाताना "स" कार करत म्हणजे "स्स्स" असा आवाज करत आत जातो तर बाहेर येताना "हम्म्म्म" असा "ह कार " युक्त आवाज करत श्वास बाहेर येतो. "ह" कार हे शिवाचे तर "स" कार हे शक्तीचे रूप रूप होय. हाच तो "सोहम्" जप होय. असा जप आपण दिवसभर २१६०० वेळा करतो. आपल्याला त्याचे अजिबात ज्ञान नसते. त्याकडे लक्ष देऊन साधना केली की मग तो "ईश्वर" प्राप्त होतो. या श्वास गतीवर जे नियंत्रण मिळवतात ते योगी "हंस" आणि "परमहंस" म्हणवले जातात. उदा. बंगालचे श्री. रामकृष्ण परमहंस वगैरे....
आता पुढे जाऊ या...
इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन नाड्यानमधून आळीपाळीने आकाश तत्व [बीज मंत्र हं उच्चार हम्म], वायू तत्व [ बीज मंत्र यं उच्चार यम्म ], अग्नी तत्व [ बीज मंत्र रं उच्चार यम्म ], जल तत्व [ बीज मंत्र वं उच्चार वमम ] आणि भूमी तत्व अथवा पृथ्वी तत्व [ बीज मंत्र लं उच्चार लम्म ] ही तत्वे वाहात असतात. आणि यांच्या मिश्रणाने विविध ग्रह बनतात. म्हणजेच श्वासातून ग्रह वाहतात. उदा. उजव्या/सूर्य नाकपुडीतून अग्नी तत्व वाहिल्यास "मंगल" ग्रह ...वगैरे ....अर्थात ग्रह हे केवळ आकाशात नसून आपल्या नाकपुडीतूनही खेळत असतात ते असे.... म्हणजे तुम्ही सामान्य आहात का? हे वहन लक्षात ठेवण्यासाठी मी एक छोटीशी कविता करण्याचा प्रयत्न खूप वर्षांपूर्वी केला होता....
हीच ती कविता आणि ही उपयोगी आहे कोणते तत्व कोणत्या नाकपुडीतून वाहिल्यावर कोणता ग्रह वाहतो ते लक्षात ठेवायला....आपली पत्रिका किंवा कुंडली हेच दाखवत असते. पण तिचे "वाचन" करणे किती कठीण आहे हे आपल्या आता नक्कीच लक्षात आले असेल खरं की नाही? हाच ग्रहांचा खेळ आपल्या मानसिक स्थितीवर, आपल्या आर्थिक, सामाजिक, भावनिक, लैंगिक, ऐहिक, भौतिक, अध्यात्मिक स्थितीवर परिणाम करत असतो आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतो खुद्द आपणच.....कारण चांगले वाईट कर्म तर सोडाच पण आपण नुसते कुशीवर वळलो, हातात वजन उचलले तरी सुद्धा हा श्वास प्रवाह डावी उजवीकडे बदलत असतो......
दक्षिणेत अग्नी भौम पृथ्वी सूर्य वाहतो, आप होय शनी आणि वायू राहू भासतो - दक्षरंध्र किंवा सूर्यनाडी
उत्तरेत आप चंद्र पृथ्वी सूर्य चालतो, वायू होत गुरु आणि अग्नी शुक्र चमकतो- इडा/चंद्रनाडी
सुषुम्नेत भूमी बुध, आप चंद्र शुक्र तो, अग्नी रवी भौम, वात राहू शनी बनवतो.....
आणि सुषुम्नेत नभी, गुरु ग्रह विलसतो, प्राणशक्तीचा प्रवाह, जीवनास फुलवतो.-सुषुम्ना नाडी.
भौम- मंगल/ नभी- आकाश तत्वात
वायू ८ अंगुळे, अग्नी ४ अंगुळे, पृथ्वी १२ अंगुळे आणि आप तत्व १६ अंगुळे वाहाते. आकाश तत्व तिथल्या तिथेच मोकळे वाहाते. आकाश तत्वात सगळ्या तत्वांचे गुण मिश्रित अवस्थेत असतात. पृथ्वी तत्व रंगाने पिवळे, आकृतीने चतुष्कोनी, चवीने मधुर, नाकपुडीच्या मध्य भागातून वाहणारे आणि सर्व उपभोग प्राप्त करून देणारे असते. जलतत्व हे श्वेत वर्ण, अर्ध्या चंद्राच्या आकाराचे, तूरट, ओले, प्रवाही, नाकपुडीच्या खालच्या बाजूस चिकटून वाहणारे असते. हे अतिशय लाभप्रद असे तत्व आहे. अग्नीतत्व हे आरक्तवर्ण, त्रिकोणी, कडवट, देदीप्यमान आणि नाकाच्या वरच्या भागास स्पर्श करत वाहणारे असे असते. वायुतत्व हे रंगाने निळे, वर्तुळाकृती, आंबट अथवा आम्ल स्वादाचे, चपळ आणि नाकातून वाकडे वाहणारे असे असते. आकाश तत्व, वायू तत्व आणि अग्नी तत्व वाहत असताना कोणतीही शुभ कार्ये करू नयेत. भूमी तत्व आणि जल तत्व वाहत असताना सर्व मंगल कार्ये, सांसारिक कामे, मुलाखत वगैरे यशस्वी होतात. ही तत्वे ओळखणे कठीण नक्कीच आहे. त्यामुळे आपण जर उलट केले म्हणजे त्या त्या तत्वांच्या हस्तमुद्रा आणि बीज मंत्रांचा जप केला तर आपल्याला हवे असलेले तत्व आपण सुरु करू शकतो. वर बीज मंत्र दिले आहेत. मुद्रांबद्दल मी पुन्हा कधीतरी लिहीन.
मित्रांनो आता लक्षात आले का की आपला हा प्राण किंवा श्वासोच्छ्वास किती महत्वाचा आहे ते? आणि या श्वासोच्छ्वास क्रियेवर काही अंशी किंवा संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी प्राणायाम म्हणजे प्राणाचा अर्थात श्वासाचा "आयाम" म्हणजे व्यायाम केला जातो आणि त्या नवा "आयाम" म्हणजे नवे रूप, रंग, दिशा, शक्ती दिली जाते.
आता प्रत्यक्ष प्राणायामाकडे वळू या....
काही शब्दांचे अर्थ आधी पाहू...
पूरक- श्वास घेणे/ श्वास पुरवणे.
रेचक- श्वास सोडणे किंवा बाहेर टाकणे.
कुंभक- श्वास आत किंवा बाहेर रोखून धरणे. श्वास आत रोखून धरल्यास अंतर्कुम्भक आणि बाहेर रोखून धरल्यास त्याला बाह्य कुंभक असे म्हंटले जाते. अंतर्कुम्भक आणि बाह्यकुंभक एकाच प्राणायामात कधीही करू नयेत. मुळातच श्वास रोखून धरण्याचे प्राणायाम गुरुंच्या मार्गदर्शनाखालीच करावेत.
अधो श्वसन- पोटाने/पोट फुगवून श्वास घेणे.
मध्य श्वसन- छातीने/फुफ्फुसांनी श्वास घेणे.
आद्य शवसन - खांदे उचलून श्वास घेणे.
आता प्राणायामाचे काही प्रकार बघू या....
१] अनुलोम विलोम- डाव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन न थांबता पण तरीही अतिशय सावकाशपणे श्वास उजव्या नाकपुडीने बाहेर सोडावा. आणि केवळ क्षणभर थांबून परत याच उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने सोडावा. हे १ आवर्तन झाले. माणसाला आयुष्य हे वर्षात दिलेले नसून श्वासात मोजून दिलेले असते. भोजन, व्यायाम, निद्रा आणि मैथुन या चार प्रसंगी माणसाचे श्वास जास्त खर्ची पडतात म्हणजेच श्वासोच्छ्वास अतिशय जलद होतो. अतिशय आनंदी झाल्यावर [हर्षवायुने माणसे मृत्य पावतात], दु:खी राहिल्याने, क्रोधीत झाल्यानेही श्वास जलद चालतो. हेच ते प्रसंग ज्यामुळे माणसाचे आयुष्य क्षीण होते.... आणि अनुलोम विलोम या प्राणायामामुळे आपण वर पाहिल्याप्रमाणे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांचे संयमन तर होतेच पण पंचतत्वांचे वहन सुद्धा सुधारल्याने माणसाच्या आयुष्यात आमुलाग्र बदल होतो. तसेच अतिशय सावकाश प्राणायाम केल्याने श्वास संथ वाहून आयुष्य वाढण्यास मदत होते. आणि श्वासाच्या गतीवर आणि फुफ्फुसांवर सुद्धा संयम येतो. छाती दृढ होते. मेंदूतील श्वसन केंद्रावर नियंत्रण येऊ लागते. अनुलोम विलोम प्राणायाम ६ महिने सलग केल्यावरच कुम्भकासहीत करायचे प्राणायाम करावेत असा नियम आहे.
२] भस्रिका- भस्रिका म्हणजे लोहाराचा भाता. ज्या प्रमाणे लोहार भाता फुलवून भरपूर प्राणवायू पुरवून आगीतील कोळसे, निखारे फुलवतो त्या प्रमाणे आपण आद्य श्वसन करून म्हणजे खांदे उचलून फुफ्फुसांना पुरेपूर मोकळी जागा करून देऊन भरपूर प्राणवायू आत घेणे आणि रक्तातील हिमोग्लोबिनचे निखारे पेटवून लालेलाल करणे म्हणजे भस्रिका... खांदे खाली नेताना श्वास आपोआप सुटला पाहिजे. श्वास सोडताना जोर लावू नये. या प्राणायामामुळे एकूणच तब्येत सुधारते. छाती दृढ होते. पचन सुधारते. आत्मविश्वास वाढतो. उत्साह वाढतो. आपापल्या शक्ती व कुवतीप्रमाणे २५ ते १०० आवर्तनांचा १ सेट आणि असे ३-४ सेट करावेत.
३] कपालभाती- काहीजण याचा उच्चार कपाल"भारती" असा करतात. जो अतिशय चुकीचा आहे. या प्राणायामामध्ये पोट हिसका देऊन, आत ओढून श्वास जोरात बाहेर सोडला जातो. श्वास आत मात्र आपोआप आला पाहिजे. जोर लावू नये. भस्रिकाच्या बरोबर उलट हा प्राणायाम आहे. याने मेंदूचे कार्य सुधारते. श्वास बाहेर जोरात टाकला गेल्याने शरीरातील वाईट पदार्थांचे निष्कासन झटकन होते. शरीराची उष्णता वाढते. फुफुसांना आराम मिळतो. हृदयाला आराम मिळतो. आपापल्या शक्ती व कुवतीप्रमाणे २५ ते १०० आवर्तनांचा १ सेट आणि असे ३-४ सेट करावेत.
४] उत्जायी- लहान मुले खेळताना जसा आवाज घशाने काढतात तसा आवाज काढत [ऊउम्म्म्म] श्वास आत घ्यावा. ३-४ वेळाच ही क्रिया करावी. कंठाचे काम सुधारते. थायरोइड ग्रंथींचे काम सुधारते.
५] उद्गीथ- भरपूर श्वास भरून घेऊन सावकाश उद्गीथ, प्रणव म्हणजेच ओमकाराचा "म" हा नाद घुमवत श्वास सोडावा.... [हा उच्चार करताना तो आपोआपच सुटतो. संपतो.]. मेंदूचे कार्य सुधारते.
६] भ्रामरी- श्वास सोडताना भुंग्या सारखा hmmmmmmmmmmmm असा नाद घुमवत श्वास सोडावा. मन शांत होते. मनाची लय लागते. जीवनाची लय सापडते. मेंदूचे काम सुधारते.
७] शितली- हा प्राणायाम विशेषत्वाने उन्हाळ्यात उपयुक्त आहे. शरीरातील उष्णता कमी होते. तहान कमी होते. जीभ बाहेर काढून जिभेला मध्ये पन्हाळी प्रमाणे खोलगट आकार देऊन तोंडाने श्वास घ्यावा आणि नाकाने सोडावा. ७-८ वेळा करावे.
८] सित्कारी- हा देखील शितली प्रमाणे उष्णता कमी करणारा प्राणायाम आहे. तोंड हसल्या सारखे करून, उघडून दातांमधून "स्स्स" असा आवाज करत श्वास आत घ्यावा. ७-८ वेळा करावे.
९] बाह्य प्राणायाम- भरपूर श्वास आत घेऊन श्वास सावकाश बाहेर सोडावा आणि श्वास बाहेर सोडलेला असताना आपल्या कुवती प्रमाणे [पण विशिष्ट आकडे मोजून] श्वास बाहेरच रोखून धरावा. जास्त ताण देऊ नये. हानिकारक ठरू शकते. या प्राणायामाने फुफुसांची शक्ती तर वाढतेच पण श्वास जास्त वेळ बाहेर राहिल्याने फुफुसांना एरव्ही जो आराम मिळत नाही तो मिळतो. मेंदूतील श्वास केंद्रावर ताबा येतो.
१०] अंतर्कुम्भक प्राणायाम- हाच खरा प्राणायाम होय. या प्राणायामात श्वास सावकाश आत घेऊन आत काही काल रोखून ठेवायचा असतो. नंतर सावकाश श्वास बाहेर सोडावा. हा जो कालावधी आहे त्याचे १:४:२ असे प्रमाण आहे. म्हणजे सामान्यत: जे जमू शकते ते प्रमाण म्हणजे श्वास आत घेताना १६ आकडे मोजत श्वास आत घेतला तर ६४ आकडे मोजत श्वास आत रोखून, रोधून धरावा. आणि ३२ आकडे मोजत श्वास सावकाश बाहेर सोडावा. योगी लोक किंवा प्राणायामात अग्रेसर होऊ इच्छिणार्यांनी १:४:२ हे प्रमाण १:६:२ नंतर १:८:२ असे १:३६:२ इथपर्यंत वाढवत न्यायचे असते. सर्वसाधारणपणे सामान्य माणसाने ३ वेळा हा प्राणायाम सुरवातीला [ प्रमाण १:४:२ हेच] ३-३ महिन्यांनी २-२ वेळा म्हणजे ३ महिन्यांनी ५ वेळा, ६ महिन्यांनी ७ वेळा असे प्रमाण वाढवत न्यावे. हा प्राणायाम गुरूंच्याच मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे. अन्यथा नुकसान अटळ आहे.
जप [ जप नेहमी मनात करावा, स्तोत्रे मोठ्याने म्हणावीत असा नियम आहे.] , ध्यान, पूजा करताना मन शांत होऊन श्वासोच्छ्वास आपोआप संथ, एका लयीत होऊ लागतो. आणि यात प्रगती झाल्यावर मनाचे चित्तात रुपांतर होऊन हळूहळू सारे संस्कार लोप पावत जातात. मन शांत होते. समाधानी, आनंदी बनते. मन आणि प्राण एकमेकांच्या वर परिणाम करत असतात श्वास जलद तर मनही उत्तेजित आणि मन दु:खी, उत्तेजित, क्रोधीत किंवा अति आनंदित असेल तर श्वासोच्छ्वास सुद्धा जलद होतो. जोराने स्तोत्रे म्हंटल्या मुळे भस्रिका, कपालभाती आपोआप होते.
शंका असल्यास मला ९१५८५१०५९८/९८९०३६९८४५ या क्रमांकावर अवश्य फोन करा....
पुन्हा भेटू मित्रांनो,
नेहमीच आपला मित्र,
Dr. हेमंत उर्फ कलादास .................

Wednesday, August 20, 2014

ताओ तत्वज्ञान..सुंदर लेख.

निसर्गाचे प्रतिरूप म्हणजे ताओ
आपल्या ज्ञानाच्या, सौंदर्याच्या, आनंदाच्या कल्पना किती तकलादू असतात. कारण आपल्या भिरू मनानेच त्या निर्माण केलेल्या असतात. निसर्ग आपल्याला सर्व दिशांनी पुकारत असला तरी आपल्या 'सुरक्षित' आणि सुखी कोषातून आपण बाहेर जाऊ शकत नाही. ज्ञानाच्या, सौंदर्याच्या, खर्‍या आनंदाच्या आपल्या कल्पना या आत्मकोषाशी निगडित आहेत. म्हणून तर जीवनाचे आव्हान आपण स्वीकारू शकत नाहीत. आपण आपल्या घराच्या खिडक्या बंद करू लागतो. दरवाजे आधीच बंद असतात. जीवन सर्व दिशांनी आपल्याला पुकारत असले तरी त्याला प्रतिसाद देण्याचे धाडस आपल्यात नसते. आपण अशा सुखाच्या शोधात असतो की जे आपल्याला वस्तूंच्या रूपात दिसते. आपण त्या बलाढय़ सागराला आलिंगन देऊ शकत नाही. त्याचे पेंटिंग्ज करून दिवाणखान्यात लावून ठेवतो. आपल्याला खरे ज्ञान नको असते, हवा असतो त्याचा आभास. खरे ज्ञान आपल्याला स्वतंत्र करते आणि स्वातंत्र्याचे आपल्याला भय वाटते. आपल्याला तेच ज्ञान हवे जे आपल्याला संपत्ती देईल. ते सौंदर्य, सत्य, शील काय कामाचे जे आपल्याला संपत्ती देत नाही किंवा सत्ता देत नाही. माणसाचे अशातर्‍हेने बाजारीकरण आणि वस्तूकरण होणे हा या आधुनिक जगाच्या यशाचा मूलमंत्र आहे.
माणसाच्या सुखाच्या कल्पना जेव्हा वस्तूंमध्ये परावर्तित होतात तेव्हा त्याच निळंभोर आभाळ दुरावत सागराचा आवाज त्याला ऐकू येत नाही. दारातली पाखरं त्याला परकी झालेली असतात. आपला आनंद निसर्गातून येत असेल तर तो शरीराला, मनाला, आत्म्याला निश्‍चितच पुलकित करणारा असेल. कारण त्याचा संबंध माणसाच्या शोषणाशी, संघर्षाशी, रक्त, घाम, अश्रूंशी नसतो. त्याचा संबंध असतो माणसाच्या हृदयाशी. म्हणूनच तर आपले सर्व धर्म, श्रद्धा, संकल्पना निसर्गातूनच आल्या आहेत. धर्म आणि विज्ञान हे निसर्गाला पाहणारे दोन डोळेच आहेत. विज्ञान बाहेरून पाहते, धर्म निसर्गाला आतून मनातून पाहण्याचा प्रयकरतो. धर्माचा संबंध म्हणून आत्मजाणिवांशी, अंत:प्रेरणाशी आपल्या मनाशी असतो. तो अस्तित्वाला समग्रतेने पाहतो. त्यावर श्रद्धा ठेवतो. खरा धर्म कधीही हिंसक असू शकत नाही. तो स्पर्धाशील, संघर्षशील किंवा विभाजनवादी नसतो. धर्माच्या नावाने संघर्ष करणारे लोक अंध असतात. कारण धर्माचा अर्थच आहे समग्रतेने जाणा. विज्ञानही तेच काम करत असते. अर्थात त्याचा संबंध श्रद्धेशी नसून तर्कशुद्ध विचारांशी, वस्तुनिष्ठतेशी असतो. विज्ञानाच्या पुष्कळ कल्पनादेखील धर्मातूनच आल्या आहेत. या जगात काहीही स्थिर नाही हे भगवान बुद्धाने सांगितले. विज्ञानाने ते नंतर सिद्ध केले. न्यूटनने म्हटले होते की, 'हे जग ईश्‍वराने निर्माण केले आहे. त्यामुळे ईश्‍वरनिर्मित नियमांना जाणणे म्हणजेच विज्ञान.' शेवटी ईश्‍वर म्हणजे निसर्गच आहे. त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे ईश्‍वरावर प्रेम करणेच आहे. भ. बुद्धांनी ईश्‍वराचे अस्तित्व मानले नाही, पण सत्याचे स्वरूप निसर्गातच पाहिले. म्हणूनच निसर्गातील बदल जाणणे म्हणजे बुद्धस्वरूप जाणणे असे म्हटले जाते. आपले ज्ञान, विज्ञान, शहाणपण आपल्याला निसर्ग चिंतनातूनच प्राप्त होते. ताओ तत्त्वज्ञानात ताओचे प्रतिरूप म्हणजे निसर्ग म्हटले आहे. निसर्गाचे प्रतिरूप म्हणजेच ताओ. ताओचा अर्थ आहे विश्‍वव्यवस्था. ती ज्या नियमाने चालते ते नियम जाणणे म्हणजे ताओ जाणणे होय. म्हणून सौंदर्य आहे ते ताओचे. वसुंधरेचे, विश्‍वाचे. निसर्ग आहे आकारांनी बद्ध.आपल्याला डोळ्यांनी दिसते ते आकारांचे सौंदर्य आहे, म्हणून त्याचे सौंदर्यही अनंत आहे. म्हणून खरं सौंदर्य वा सुख जाणायचे असेल तर आपल्याला निसर्गाकडे वळावे लागते. त्यातून अद्भुत असा आनंद आपल्याला मिळतो. म्हणून म्हटले आहे की, ताओचे (निसर्गाचे) सौंदर्य एखाद्या गूढ रमणीसारखे आहे. तिच्या नुसत्या नजरेने ती अनंत आशयांचं महाल उभे करू शकते. ती जेव्हा पश्‍चिमेकडे पाहाते तेव्हा तिला पूर्वेकडे जायचे असते. तिच्या साध्या स्पर्शाने अनंत गोष्टी घडतात. सूर्य उगवतो आणि मावळतो. झाडांना असंख्य फुले येतात. समुद्र खवळतो आणि शांत होतो. विकास आणि विनाश याचे अखंड चक्र फिरते आणि त्याची तिला जाणीवही नसते. परस्परविरोधी शक्ती एकमेकांच्या जागा घेत असतात. विसंवादातून सुसंवादाकडे, विविधतेतून ऐक्याकडे, विनाशातून विकासाकडे, अंधारातून प्रकाशाकडे अशी जीवनाची वाटचाल सुरू होते. निसर्ग आहे आनंददायी शक्तींचा संमेळ. उत्साहाचा महास्रोत, सर्जनशीलतेचा उत्सव, पण आपण किती करंटे आहोत.
आपण वस्तू आणि सुखाची साधनं जमवण्यात मग्न आहोत. त्यालाच आपण सुख म्हणतो. सामान्यांचं आयुष्य रडत रखडत चालणार्‍या बैलगाडीसारखे असते. तिला वेग नसतो. ती कायम बिघडत असते. कधी बैल थकतात, बसतात, कधी गाडीचं चाक निखळत रस्ता नादुरुस्त असतो. कधी नद्या भेटतात अरुंद पायाच्या आणि वेगवान. कधी त्या विशाल पात्राच्या असतात; परंतु त्यांची खोली कळत नाही. म्हणून आपण अडकून पडतो. खरं म्हणजे आपण कशासाठी जगतो हे कळत नसल्यामुळे धावत असतो. जीवनातील गंभीर समस्यांपासून सुटका करून घेण्याचा मार्ग माहिती नसल्यामुळेदेखील धावतो. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, साधने असतात तेही धावतात आणि ज्यांच्याकडे काहीच नसते तेही धावत राहतात. प्रत्येकाला पाहिजे असते सुख, समाधान, शांतता आणि ते सारे कुठेच मिळत नसते. एरिक फ्रॉम नावाच्या एका विचारवंताने आपल्या 'एक्सेप फ्रॉम फ्रीडम' म्हणजेच 'स्वातंत्र्यापासून सुटका' या पुस्तकात माणसाच्या मनोवस्थेचं चांगलं वर्णन केलं आहे. माणूस सुखी नसण्याचं कारण भौतिकवाद किंवा चंगळवाद आहे; परंतु भारतासारख्या गरीब देशात चंगळवाद आहे तो उच्च मध्यमवर्गीयात, नवश्रीमंतात किंवा काळाबाजार करणार्‍या धनदांडग्यात. सिनेमा, क्रिकेट, राजकारण यातही तो खुळखुळत असतो. जे काळा पैसा निर्माण करतात तेच याचे सूत्रधार असतात.
भारतात जणू दोन देश राहतात. जुनाट बैलगाडीत रडत रखडत जाणार्‍या आणि राहणार्‍या ग्रामीण शेतकर्‍यांचा, शेतमजुरांचा, कारागिरांचा देश आणि दुसरा चकचकीत मॉलमध्ये फिरणारा, पॉश वस्तीत राहणारा. इंग्लंड, अमेरिकेकडे डोळे लावून बसलेला देश. एरिक फ्रॉमचे मत आहे की, 'माणसे दु:खी आहेत कारण त्यांचे सुख ते वस्तूमध्ये शोधतात.' आपल्या घरात अधिकाधिक वस्तू असाव्यात, त्या आपल्या मालकीच्या असाव्यात, त्या इतरांना दिसाव्यात यासाठी ते अहोरात्र कष्ट करीत असतात. नवनव्या वस्तूंच्या, संधीच्या मागे ते पळत राहतात आणि जीवनाचा मुख्य हेतूच विसरून जातात. माणूस स्वत:च अमूल्य आहे, पण त्याचे मॉल ठरते बाजारात तेथील स्पर्धेवर. माणसाच्या सुखाच्या संकल्पनाच बदलल्या आहेत. बाह्य दिसणे बाह्य असणे याला जास्त महत्त्व आले आहे. तुमचे ज्ञान, संस्कार, नीतिमत्ता, विद्वत्ता याला काहीही महत्त्व राहिले नाही. महत्त्व आहे ते कोणत्याही मार्गाने संपत्ती मिळवण्याला. त्यासाठी तुम्ही आपला आत्मा विकला तरी चालेल. त्यातून निर्माण होते आंधळी स्पर्धा, एकाकीपणा, सर्व जगाविषयी संशय आणि दुरावा. त्यातून येते खिन्नता, उदासीनता, मानसिक दुभंगलेपण. जिथे स्पर्धा असेल तिथे तुम्ही एकाकीच असता. माणसाचं एकाकीपण घालवण्याचे अनेक प्रकार आहेत. आहे ते जीवन स्वीकारणे, ते उत्कटपणे जगणे, त्यात आनंद मानणे किंवा बधिर होऊन जाणे, जगापासून दूर पळणे, सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन कुठल्या तरी कोषात स्वत:ला अडकवून घेणे. काही लोक दारूच्या एकेक घोटाप्रमाणे स्वत:ला संपवत जातात. माणसे व्यसनाधीन होतात कारण ती आनंदी नसतात. व्यसनाधीनतेवर विजय तेव्हाच मिळेल जेव्हा माणसाला आनंदाचे व्यसन लागेल. 'आनंद हाच सद्गुण आहे. सद्गुणाचे फळ आनंद नव्हे' असे प्रख्यात विचारवंत कांट यांनी म्हटले आहे. माणसाला आनंदी राहण्याचा जन्मजात अधिकार आहे, पण खरा आनंद केव्हा मिळेल? जेव्हा आपण जीवनाचे मूल्य जाणू, आपल्याला छळ, पिळवणूक यांचा प्रतिकार करण्याचे व त्यातून मुक्त होण्याचे जन्मजात स्वातंत्र्य आहे. मग आपण कशामुळे दु:ख भोगतो? कारण आपण कुणाच्या तरी इच्छेचे बळी ठरतो. आपण आपले स्वायत्तमूल्य जाणले पाहिजे. जे निसर्गाने आपल्याला दिले आहे. आपण निसर्गाकडे वळू या. त्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही. निसर्गाकडे वळणं म्हणजे आपण आयुष्य अधिक सुंदर, सरळ सहज करणे. स्पर्धेतून द्वेष, मत्सर, संघर्ष निर्माण होतो. मुख्य म्हणजे हे जाणलं पाहिजे की, जग स्पर्धेवर नाही तर सहकार्यावर चालत.ं स्पर्धा तुम्हाला भौतिक यशाच्या, संपत्ती, सत्तेच्या नावाने एका दलदलीत घेऊन जाते. जिथे यश म्हणजे एक मृगजळच असते. खरे यश येते ते सहकार्यातून, सहसंवेदनेतून, सुसंवादातून. म्हणून लाओत्सेने म्हटले आहे, 'जो जगाशी स्पर्धा करीत नाही त्याच्याशी जगही स्पर्धा करीत नसते.' त्यातूनच माणसाला निर्विवाद यश मिळते. अमेरिकेत संशोधन करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की, तथाकथित यशस्वी आणि श्रीमंत लोक मुळीच सुखी नव्हते. दारूचं व्यसन, उद्ध्वस्त कौटुंबिक जीवन, नैराश्य, एकाकीपण, स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन आदी रोगांनी ते मस्त होते. नैराश्य हा २0२0 साली अत्यंत मोठा मनोविकार असेल आणि लोकसंख्येच्या पंचवीस टक्के लोक त्यांनी बाधित असतील, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. याचे कारण आपले तथाकथित यश आपले मानसिक, शारीरिक, कौटुंबिक आरोग्य उद्ध्वस्त करीत असते. आपल्या यशाचा पाया नैतिक नसतो हेच त्याचे कारण आहे. आपली जीवनव्यवस्था सदोष आहे. ती स्पर्धा, संघर्ष, अशांततेवर उभी आहे. म्हणून समजून घ्यायचं आहे की, 'माणूस म्हणजेच खूप काही आहे, ज्याच्याकडे खूप काही आहे तो नव्हे,' असे एरिक फ्रॉमने आपल्या सेन सोसायटीत म्हटले आहे. म्हणून आपण शहाणं असू तर जीवनाचं महत्त्व ओळखू. आलिशान गाडीतून प्रवास करण्यापेक्षा आपण कधी तरी पायी चालू. निसर्ग आपल्याबरोबर चालू लागेल. हजारो रुपयांचे ड्रेस, साडी, दागदागिने अंगावर मिरवण्यापेक्षा आपण कधी तरी मुक्त होऊ या सार्‍या हव्यासातून. आपल्या गरजा कमी केल्या तर स्वातंत्र्य मिळेल. सर्वांच्या सुखात आपण आपलं सुख शोधलं तर माणूस मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम, निरोगी आणि जास्त वरच्या पातळीवर जातो, असे अँडलर, एरिक्सन, कोहलबर्ग गिलीगन अशा जागतिक दर्जाच्या मानसशास्त्रज्ञांनी लिहून ठेवलं आहे. आपल्याला जीवनात संगीत हवं आहे की महागडी म्युझिक सिस्टीम? संगीत हवं असेल तर ते आपल्या मनातच जन्मतं, आपल्याला ते ऐकता आलं पाहिजे इतकंच.
(लेखक हे ताओ तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत)

Tuesday, August 19, 2014

खरच,आपण असच असलं पाहिजे..

एका पोस्ट वरून
हे परमेश्वरा...
मला माझ्या वाढत्या वयाची जाणिव दे.
बडबडण्याची माझी सवय कमी कर.
आणि प्रत्येक प्रसंगी मी बोललच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य ईच्छा कमी कर.
दुसर्‍यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच व त्यांच्या खाजगी प्रश्नांची दखल घेउन ते मीच सोडवले पाहिजेत अशी प्रामाणिक समजूत माझी होऊन देऊ नकोस.
टाळता येणारा फाफटपसारा व जरुर नसलेल्या तपशिलाचा पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ मुद्यावर येण्याची माझ्यात सवय कर.
इतरांची दुःख व वेदना शांतपणे ऐकण्यास मला मदत करच पण त्यावेळी माझ तोंड शिवल्यासारखे बंद राहुंदे. अशा प्रसंगी माझ्याच निराशा, वैफल्यांचे रडगाणे ऐकवण्याची माझी सवय कमी कर.
केंव्हा तरी माझीही चूक होउ शकते, कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो, गैरसमजुत होऊ शकते ह्याची जाणीव माझ्यात ठेव.
परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात प्रेमाचा ओलावा, गोडवा, लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही हे मला माहीत आहेच, पण एक बिलंदर बेरकी खडूस माणूस म्हणून मी मरू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
विचारवंत होण्यास माझी ना नाही पण मला लहरी करू नकोस. दुसर्‍याला मदत करण्याची इच्छा आणि बुद्धी जरूर मला दे पण गरजवंतांवर हुकूमत गाजवण्याची इच्छा मला देऊ नकोस.
शहाणपणाचा महान ठेवा फक्त माझ्याकडेच आहे अशी माझी पक्की खात्री असूनसुद्धा, परमेश्वरा, ज्यांच्याकडे खरा सल्ला मागता येइल आणि ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येइल असे मोजके का होईना पण
चार मित्र मला दे.
एवढीच माझी प्रार्थना.
पु. ल.

Tuesday, August 12, 2014

वडीलांस पत्र.

" वडीलांस पत्र ..........."
प्रिय " बाबा " यांस ,

आज थोडं एकट एकट वाटलं,
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,
पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,
आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही,
आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,
काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

लहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मजा वाटायची,
फाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,
आज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

एकदा घरात एकटा असताना, सर्व घर रडून डोक्यावर घेतलं होत,
पण तुम्ही धावत पळत येउन ' मी आहे 'असं सांगितलं होत,
आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकट एकट " वाटलं .
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

आठवतय… एकदा मी पडलो होतो,मला खूप लागलं होत ,
त्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होत,
आज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

रात्री झोपताना तर तुमची मांडीच माझी " उशी " असायची ,
तुम्ही नसताना आईच्या कुशीतही झोप नसायची,
आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं वाटलं….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

तुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे वाटायचे,
पण तोच हात पकडून घरी जाताना मात्र कसलेच भान नसायचे,
आता मोठा झालो तरी " तो " हात पकडून शाळेत जावंसं वाटलं…
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

"तुझे बाबा , देव बाप्पा कडे गेले " अस मला कुणीतरी सांगितलं होत,
मात्र देव बाप्पा कुठे राहतो हेच मला कोणी सांगितला नव्हतं,
लहानपणीच्या त्या प्रश्नावर आज थोडं हसावसं वाटलं ….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जीवनातली तुमची कमी आईने कधीच भासू दिली नाही ,
पण तुमची आठवण मनातून कधीच जाऊ शकली नाही,
आज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटलं….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……

बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……

(Advocate jayant Deshmukh यांच्या Timelineवरुन साभार)

Tuesday, June 17, 2014

नातेसंबंध...

नातेसंबंध म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा पाया. नात्याची अंत:प्रेरणा ही माणसाला मिळालेली अद‍्भुत भेट आहे. जगातले सगळे जीव या सूत्रात बांधले गेले आहेत. जे कृष्णमूर्ती म्हणतात, 'टु बी इज टु बी रिलेटेड अँड टु बी रिलेटेड इज टु बी इन कॉन्फ्लीक्ट.' दोन माणसं एकत्र आली की त्यांच्यात विसंवादाचं का होईना, पण एक नातं निर्माण होतंच. मात्र माणसा-माणसामधलं नातं क्वचितच निकोप आणि सहज असतं; कारण ते निरपेक्ष नसतं.
बहुतेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीकडे सोयीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो. नातं जुळलंच तरी ते व्यक्तीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतं. सगळं अनुकूल असेल तरच ते टिकून राहतं. अशा नात्याने व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होऊ शकत नाही. ज्या नात्याने आपण झळाळून उठतो, जे नातं जोडणं किंवा तोडणं आपल्या हातात नसतं ते नातं एकच; माणसाचं आणि ईश्वरी तत्त्वाचं. 'त्वमेव माता च पिता त्वमेव... त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव.'
निरीश्वरवादीदेखील चराचराशी नातं जोडतात. ईश्वर मानणारे त्याची रूपं आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून अनुभवतात. हे नातं निरपेक्ष असतं. कदाचित म्हणूनच या नात्याची असोशी टिकून राहते, मैत्रभाव उधळून दिला जातो. या नात्यात ऋजुता असते, अहंकार नसतो. या नात्याला अनेक पदर असू शकतात. जगाच्या पसाऱ्यात आपण कुठेही हरवलो, तरी ज्या भूमीशी आपली नाळ जुळलेली असते तिची ओढ तशीच राहते, त्याला आपण माझं गाव, माझा देश अशी नावं देतो.
संतांना 'वृक्षवल्ली सोयरी' वाटू लागते. 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी' भासू लागते. कितीतरी माणसं निसर्गाशी नातं जोडतात. एखाद्या रोपाचं रूजणं, फुलणं, तारकांनी खच्चून भरलेलं आकाश, वाऱ्याची झुळूक, खळाळत वाहणारं पाणी, यात कित्येकजण रमतात. कुणी विज्ञानातल्या कुतूहलांची उकल करण्याच्या पाशात स्वेच्छेने अडकतात. 'नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही... साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही' असा तो अनोखा, अनामिक बंध असतो. या नात्यांतलं सौंदर्य कायम राहतं; कारण यामागे अपार श्रद्धा असते. या साऱ्या नात्यांत फक्त देणं असतं, घेणं नसतं.
माणसांचं आपसातलं नातं इतकं सहजसोपं व्हायला हवं असेल, तर एकमेकांचा गुण-दोषासकट स्वीकार करता यायला हवा. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, एकमेकांना दिलेला वेळ, शब्द, एकमेकांवरील विश्वास, श्रद्धा आणि आश्वासक स्पर्श हे कोणत्याही यशस्वी नात्याचे आधारस्तंभ असतात. नातेसंबंधाच्या बाबतीत हे समजून घ्यायला हवं की आपल्याला जे हवं आहे ते आपण कधी दुसऱ्याला दिलं का? हे उमजलं तर तो खरा मैत्रभाव. तो जपला तर आपसूक माणूस निर्वैर होऊ लागतो. वात्सल्य, क्षमाशीलता, करुणा, कळकळ हा त्याचा स्वभावधर्म होतो. मनातला मैत्रभाव बाह्य व्यक्तिमत्त्वात दिसतो. अवघं जगणं सुंदर होतं. आरती प्रभूंच्या शब्दात दडलेला नात्याचा खरा अर्थ गवसतो. 'अशी पांखरून छाया, लावोनिया माया। आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया.'
- मोहिनी मोडक

Monday, May 19, 2014

सुंदर दृष्टांत

संत ज्ञानेश्वरांनी दिलेला एक दृष्टान्त, आपण
नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट
उलगडा करणारा आहे. त्यांनी सांगितले आहे,
की पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे.
एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच
नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक
नळीला पोपटाला आकर्षित करेल असे
काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट
नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल
फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट
स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो.
ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते.
नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत
राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच
पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू
शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व
तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व
पकडणाऱ्याच्या हाती पडतो.
याला भयसापळा असे म्हणता येईल.
जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व
तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही,
तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे.
"हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर
काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली,
तर आपणही उडून जाऊ शकत असतो.
पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते,
तो उडू शकत नाही!
माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे.
(हा दृष्टान्त ओशोंकडून ऐकला; पण मुळात
कोणाचा हे आठवत नाही) एक मडके मातीत पुरून
ठेवतात. मडक्यात एक फळ असते माकड ते फळ
काढण्यासाठी मडक्यात हात घालते. मडक्याचे
तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते; असे
की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू
शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर
हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल.
माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे
हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न
घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व
शरीराने मडक्यापाशी.
या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.
आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत
असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने
सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित
ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा!
थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय?
निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच
मुक्तिदायक नाही काय?
एक जण हौदात कमरेइतका उतरून बराच थयथयाट
करतोय, हातांनी पाणी खळबळवतोय. या हौदानं
माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून
मी संतापलोय, असं त्याचं म्हणणं. "अरे तू शांत
हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ
दिसेल व वस्तूही सापडेल!' कोणीतरी समजावत आहे.
पण हा ऐकूनच घ्यायला तयार नाही. हौदाचा तळ
रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ
होता, हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर
तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल?
"दमलास? चल परत जाऊ. आज इतकं पुरे.
पुन्हा कधीतरी जाता येईलच.
""नाही गुरुजी. मी दमलोय; पण आपण इतके वर
आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच!
कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य
सांगताय, असं झालंय मला.''
""माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत,
जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते
सत्य सांगेन' असं म्हणालो होतो मी.''
""होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं
वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे..''
""कितीही वर आलो असू! तरी मी सांगतो म्हणून, हे
सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस
का नाही?''
""ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड
वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर
परत जाऊ या.''
""शाबास! आता मी तुला ते सत्य सांगतो''.
""पण शिखर न येताच?''
""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून! ते सत्य हे
आहे, की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे
आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं
पोचण्याचं स्थान होतं! तू उत्तीर्ण झालास. चल
आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच; फक्त
"पोहोचलो' असं वाटत नसतं इतकंच!
पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा.
माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं, थयथयाट
करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा.
चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून
पाहावा. हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड
असतं.
भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच
तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे
अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग
सोपा असला तरी पटायला अवघड असतो.(श्री मुकुंदराज महाराज सोनगीर)

Thursday, April 24, 2014

सुंदर विचार.

प्राजक्ताची झाडे भेटताना...
आयुष्याच्या वाटेवर कधी खाचखळग्यांतून जावे लागते. कधी काट्याकुट्यांची वाट तुडवावी लागते. कधी अवघड वळणे पार करावी लागतात. कधी उंच कडे आणि खोल, धडकी भरवणारी दरी यामधल्या अरूंद वाटांमधून प्रवास करावा लागतो. पण माय-पिता-शिक्षक-पती अथवा पत्नी यांनी आपल्या मन-मनगट-मेंदूमध्ये ताकद पेरलेली असते. मानसिक, भावनिक, शारीरिक, आत्मिक बळ वाढवलेले असते. ती ताकद-बळ काटे-कुटे, खाच-खळगे तुडविताना हिंमत देते.
जीवनमार्गावरच्या दुःसहतेचे हे केवळ वाङ्मयीन वर्णन नाही; तर असे अनुभव झोपडपट्टीमध्ये, बंगल्यामध्ये, आलिशान निवासांमध्ये राहणाऱ्यांनाही येतात. प्रवास करताना कोट्यधीशांची विमाने कोसळतात. काश्मीरच्या सहलींमध्ये सहकुटुंब स्वर्गीय सौंदर्यपान करताना हिमकडे कोसळून गतप्राण व्हावे लागते. पण आयुष्याची राख होतानाही जगण्यासाठी उमेद देणारे सगे-सोयरे, परिचित-अपरिचित भेटतात. पाठीवर हात ठेवीत 'लढ' म्हणत कढ आवरण्यास ते ताकद पेरतात. 'अरे नेस्तनाबूत, मातीस मिळालेलेही उभारी धरतात. फिनिक्स पक्ष्यांसारखे राखेतून भरारी घेतात,' सांगत आशेचे किरण दाखवितात. अपयशामुळे मनाचा दाह असह्य झाल्यावर 'फायर ब्रिगेड' बनतात. थंडगार शब्दसरींसारख्या बोलांनी शांतवतात. आपण आपली उंची वाढविण्यास जिवाचे रान करतो, पण काहीजण टिंगल-टवाळी करतात. यश मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करीत नाहीत.
एका सद‍्गृृहस्थांनी बालसंकुलात हयात खर्च केली. आपल्या एकुलत्या मुलासाठी अनाथाश्रमामध्ये वाढलेली कन्या वधू म्हणून घरी आणली. त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निमंत्रणासाठी गेल्यावर शुभेच्छाही दिल्या नाहीत. नवविवाहित जोडप्याला सकारात्मक निमंत्रण दिले नाही. रोटरी, महापौर,सेवाभावी ट्रस्ट, आदींनी सत्कार केले. एका स्नेही महिलेने त्यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली. पण अनाथाश्रमात वाढलेल्या, पदवीपर्यंतचे शिक्षण घेत उपअधीक्षक पदावरून निवृत्त झालेल्या त्या सद्गृहस्थाला पदाधिकाऱ्यांचे वर्तन विंचवाचा डंख वाटते. माणसे अशी निवडुंगाची फांदी का बनतात? का फटकारतात? पण काही माणसे भेटतात तेव्हा म्हणावे वाटते, 'अशी जागा आहात तुम्ही आयुष्यातली, जिथे हातात माझ्या नेहमी फुलेच आली.'
काही वेळा आयुष्याची वाट मागे टाकत जाताना सद्भाग्यामुळे काही माणसे 'माणूस' म्हणून भेटतात. आपल्यामधला 'माणूस'जागवतात. काही माणसे श्रावणातील प्राजक्त रूप घेऊन समोर येतात. ती सहवासामध्ये येणाऱ्यांसाठी पानोपानी बहरलेली, फुलांनी डवरलेली असतात. त्यांच्याखाली फक्त उभे राहायचे असते. फिकट पिवळ्या रंगाच्या पाकळ्यांची, नारंगी-शेंदरी रंगाच्या देठांची, मृदुल, नाजूक फुलं अंगावर पडतात. मंद मंद सुगंधाच्या हळुवार लाटांची बरसात करतात.
कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आयुष्याची वाट कितीही खडतर असली तरी प्राजक्ताची भेट व्हावी. प्राजक्त फुले देहावर टपटपावित. तन-मन-चेतापेशी-अंतर्याम शीतल-रंगीन, गंध-सुगंधाने भारून, भारावून जावे. आजच्या जगातील प्रदूषित वातावरणाचा संसर्ग टळावा. 'सर्वेः सुखिना संतु' ओठी यावे. तुम्हाला भेटला का प्राजक्त कधी? का तुम्हीच कोणासाठी प्राजक्त बनलात कधी? आठवा ना शांतपणे!
प्रा. अनुराधा गुरव

Wednesday, April 9, 2014

संस्कार म्हणजे नेमकं काय?

‘संस्कार’ म्हणजे नेमकं काय?
प्रत्येक व्यक्तीवर चार ठिकाणांहून ‘संस्कार’ होत असतात. एक- त्याच्या घरातून, तिथल्या वातावरणातून! दोन- शाळा-कॉलेजमधून, तीन- आजूबाजूच्या समाजाकडून आणि चौथे त्याच्या ‘आंतरमनातून’. आणि या चौथ्या संस्कारावरच खरं जीवन अवलंबून असतं, असं मला वाटतं.
१९७२ साली आम्ही दोघं परदेश प्रवासाला गेलो होतो आणि त्या वेळचे हे तीन ठिकाणचे अनुभव आहेत. अनुभव नव्हे स्वानुभव! आश्चर्य वाटावे असे! विश्वास बसणार नाही असे! पण ते मनावर ‘संस्कार’ करून गेले आहेत, म्हणून तुम्हाला सांगते.
(१) जपानला टोकियो शहरात चालताना कोपऱ्यावर कधीही न पाहिलेल्या फळांची चवड लावलेली होती. विकत घ्यायला म्हणून जवळ गेलो तर तिथे कुणी विक्रेता नव्हता. १५-२० मिनिटं त्याची वाट पाहण्यात घालवली. एवढय़ात इंग्रजी भाषा बोलता येणारा एक जपानी इसम आमच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘‘तुम्हाला ही फळं हवी असतील तर एक पिशवी उचला. डझनभर आहेत. बाजूला त्याचा भाव लिहिलेला आहे. खाली पैशाची पेटीही ठेवलेली आहे. त्यात पैसे टाका आणि पुढे चला.’’ ..त्याचं हे बोलणं ऐकून मी विचारलं- ‘‘अहो, पण तो विक्रेता कुठे आहे? आणि ही पेटी कुणी उचलून नेली तर?’’ त्यानं जे उत्तर दिलं, ते ऐकून मी अवाक् झाले. तो म्हणाला, ‘‘इथला विक्रेता दिवसभर एका कारखान्यात काम करतो. संध्याकाळी त्याचं काम संपलं की इथे येऊन उरलेली फळं आणि पैशाची पेटी घेऊन तो घरी जाईल. उद्या पुन्हा नवीन फळं आणून लावेल आणि पैशाच्या पेटीबद्दल म्हणाल तर आमच्या देशात आम्ही दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावत नाही.’’ ..त्याचं उत्तर ऐकून मला दिसायला लागलं की ‘दादरला रानडे रोडवर एक शंभरची नोट पडली आहे आणि ती आपली नाही’ म्हणून लोक तिला वळसा घालून पुढे जात आहेत.
(२) जर्मनीमध्ये एका स्टेशनवर एक चाळिशीची बाई आपली दोन मुलं आणि तीन डाग सांभाळत गाडीची वाट पाहत उभी होती. तिची गाडी आली, ती निघून गेली आणि माझ्या लक्षात आलं की, घाईमध्ये चढताना तिची एक बॅग प्लॅटफॉर्मवरच राहून गेली आहे. आमच्या गाडीला अजून वेळ होता. म्हणून मी ती बॅग उचलून शेजारच्या ऑफिसमध्ये नेऊन दिली आणि घडलेला प्रकार सांगितला. त्या माणसानं चिडून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘‘तुम्ही का हात लावलात तिच्या बॅगेला? होती तिथे नेऊन ठेवा. त्या बाईच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात येईल, तेव्हा ती परत येईल आणि आपली बॅग घेऊन जाईल. दोन दिवस तिच्या लक्षात नाही आलं, तरी ती बॅग तिथेच असेल.’’
(३) दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनची सांपत्तिक स्थिती फार वाईट झाली होती. त्या काळात माझे यजमान तिथे शिकत होते. एक दिवस रेडिओवरून एक बातमी प्रसृत करण्यात आली की- ‘‘या वेळी चुकीने तुम्हाला रेशनच्या दुकानातून एक आठवडय़ाऐवजी दोन आठवडय़ांचे रेशन दिले गेले आहे. तरी एक आठवडय़ाचं रेशन परत करावं. नाही तर आपत्ती ओढवेल.’’ ..दुसऱ्या दिवशी सर्व दुकानांच्या बाहेर जास्तीचं रेशन परत करायला लोकांच्या रांगा लागल्या.
आज ४० वर्षांनंतर हे सारं आठवले की, मनात येतं की आज त्या ठिकाणी काय परिस्थिती असेल? असेच असतील का अजून संस्कारी लोक, संस्कारी समाज आणि संस्कारी देश? आज काय आहे माहीत नाही. एखादेवेळेस तिथल्या लोकांनाही या ‘परिकथा’ वाटत असतील.
आज हे अनुभव आठवले आणि पुन्हा एकदा माझं मन ‘संस्कार’ या विषयाकडे वळलं. पाठोपाठ माझी आई उच्चारायची ते एक वाक्य आठवलं- ‘वाण्याचा पसा, सोनाराचा मासा आणि शिंप्याचा खिसा’ एवढे तरी स्वत:कडे राखून ठेवण्याचा प्रत्येकाचा कल असतोच.. कारण प्रत्येकजण दरक्षणी ‘मी’चा विचार आधी करतो. मी- माझा परिवार- माझे विचार- माझे यश- माझा पैसा- समाजातील माझे स्थान- माझा भविष्यकाळ आणि माझा स्वार्थ- एवढे तरी तो प्रथम स्वत:साठी राखून ठेवतोच. कारण या ‘मी’वर त्याचं पहिलं प्रेम असतं आणि तो या ‘मी’ला सोडून आयुष्य जगूच शकत नाही.. ‘संस्कार’ हा तसा तीन अक्षरी लहानसा शब्द! पण त्याच्या अंतरंगात शिरलं की- तो आपल्या संपूर्ण आयुष्याला कसा व्यापून राहिलेला असतो, हे लक्षात यायला लागलं.
मोबाइल, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स यांच्या आगमनानंतर जीवन उधळून गेलंय, पण करणार काय? असं जात जात हे जग कुठे जाणार आहे, याचा विचार करायला वेळ तरी कुणाजवळ आहे आज? आमच्यासारख्या वयस्कर मंडळींच्या मनाला एक प्रकारचं हताशपण आलंय.
प्रत्येक व्यक्तीवर चार ठिकाणांहून ‘संस्कार’ होत असतात. एक- त्याच्या घरातून, तिथल्या वातावरणातून! दोन- शाळा-कॉलेजमधून, तीन- आजूबाजूच्या समाजाकडून आणि चौथे त्याच्या ‘आंतरमनातून’. आणि या चौथ्या संस्कारावरच खरं जीवन अवलंबून असतं, असं मला वाटतं. आपण कसं जीवन जगणार आहोत, हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं. या संस्काराचा थोडा बारकाईनं विचार करू.
विज्ञानाच्या कक्षा रुंदावायला लागल्यापासून गेल्या २५ वर्षांत स्त्री-पुरुष- सारा समाजच आंतरबाह्य़ ढवळून निघाला आहे आणि त्याचे परिणामही दिसायला लागले आहेत. चांगले-वाईट दोन्ही! सगळ्यांचीच वावटळ उठलीय.
(१) शहरी जीवनात आजकाल अनेक ‘घरांतून’ जगण्याच्या अनेक तऱ्हा पाहायला मिळतात.. काही ठिकाणी संध्याकाळ झाली की, वडिलांची मद्याची आचमनं सुरू होतात. त्याचा अमल चढायला लागला की, स्वभावाची अवस्थाही बदलायला लागते. कभी खुशी- कभी गम अशी स्थिती होते. हळूहळू त्याच माळेतले आजूबाजूचे मणी गोळा व्हायला लागतात. गप्पांचा, हसण्याचा, खिदळण्याचा आवाज चढायला लागतो. शनिवार संध्याकाळ असेल तर या साऱ्याला ऊतच येतो; फड रंगायला लागतो.. स्नॅक्सच्या बशा आत-बाहेर करताना बायको वैतागते. मुलंही सैरभैर होतात, पण इलाज नसतो. हळूहळू सारेजण या परिस्थितीला सरावले जातात. आजकाल अनेक विवाहित स्त्रियाही तिच्या नवऱ्याच्या किंवा त्याच्या मित्रांच्या ग्लासला ग्लास भिडवत ‘चीअर्स’ करतात आणि पार्टीत सामील होतात. पी.जे.- पाचकळ विनोद सांगून होतात- हशा पिकतो.. रात्रीचे ११ वाजून गेले तरी कुणालाच जेवणाचं भान नसतं. थोडय़ा वेळाने ठिकाणावर आले की, गरम-गार जसं असेल तसं जेवून घेतात आणि घरोघरी पांगतात.. या साऱ्यांत मुलं केव्हा तरी स्वयंपाकघरात जाऊन असेल ते पोटात ढकलतात किंवा कोपऱ्यावरची पावभाजी खाऊन येतात आणि झोपून जातात.
दुसऱ्या काही घरांतून अगदी वेगळं वातावरण असतं. घरं लहान असतात. दोन-तीन पिढय़ा एकत्र राहत असतात. तिथे मग विचारांतले मतभेद, स्वभावांचे प्रकार, आवडीनिवडी, त्यातच वृद्धांच्या शारीरिक तक्रारी, डॉक्टरांकडच्या फेऱ्या, औषधांच्या याद्या, वाढती महागाई, मुलांचं भवितव्य, मुलीचं लग्न या आणि अशाच अनेक कारणांमुळे जो तो त्रस्त असतो. प्रत्येकालाच एक विचित्र ताण जाणवतो.. हळूहळू मग तो मुखावाटे बाहेर पडतो. वाद होत राहतात. रंगाचा बेरंग होतो. याच वातावरणातून मुलं मोठी होत असतात. त्यांच्या मनावर या साऱ्याचे पडसाद उमटत राहतात. त्यातून काही वाहवत जातात तर काही या साऱ्याकडे सजगतेनं पाहत वाढत राहतात.. तसं पाहिलं तर प्रत्येक ‘घर’ म्हणजे एक कादंबरी असते. या साऱ्यांतून मुलांवर संस्कार होतील ते होतील. आजकाल कुणालाच त्याबाबत विचार करायला वेळ नाही.
‘शाळा-कॉलेजच्या’ म्हणजे शिक्षणाच्या वयात जे संस्कार मनावर होतात, ते बऱ्याचदा गुरुशिष्यांतल्या नात्यांवर आणि त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आदरांवर अवलंबून असतात. निवडलेला अभ्यासक्रम, त्यावर केलेली मनाची एकाग्रता, भविष्याविषयी ठरविलेल्या निश्चित अशा दिशा, उत्तम वाचन, जगात नित्य-नव्यानं घडणाऱ्या घटना- त्यांच्याकडे पाहण्याचा डोळसपणा यातून व्यक्तीची जडणघडण होत जाते.. याउलट निवडलेला मित्रवर्ग जर व्यसनांच्या आहारी गेलेला असेल, त्यांच्या तोंडची भाषा ओंगळ असेल, तर जीवनाला भलतेच वळण लागते. ते भरकटले जाते. चांगले संस्कार होण्याचे बाजूलाच राहते.
‘आजूबाजूच्या समाजाकडून’ होणाऱ्या संस्काराबाबत बोलावं तेवढं थोडंच आहे.. वर्तमानपत्र उघडलं की ८०% बातम्या भ्रष्टाचार, काळाबाजार, गुंडगिरी, बलात्कार, खून, मारामाऱ्या, दरोडे, आंदोलनं, उपोषणं आणि आत्महत्या यांच्याचबद्दल असतात. त्यामुळे ‘कधी एकदा पेपर येतो’ असं आजकाल होत नाही.. दूरदर्शनच्या पडद्यावरून लांबलचक फरपटत जाणाऱ्या मालिका, अवास्तव विषय, स्पर्धा, ओंगळ- पाचकळ विनोद, लहान लहान मुलींकडून डोळा मारत- ओठ दुमडत सादर केल्या जाणाऱ्या लावण्या, तरुण मुलं-मुली कमीत कमी कपडय़ांतून करत असलेली नृत्यं- या सगळ्या गोष्टी घरातले सर्व वयांचे लोक आवर्जून बघत असतात. ‘एकमेकांना मिठय़ा मारणं’ हे तर आजकाल सर्रास झालंय. एकमेकांना स्पर्श केल्याखेरीज कुणाला भावना व्यक्तच करता येत नाहीत. नवररसांचा राजा ‘शृंगार’- जो एकेकाळी शय्यागृहापुरता मर्यादित होता, तिथला अधिपती होता, तो आज रस्त्यावर आलाय, स्वस्त झालाय. मोबाइल, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स यांच्या आगमनानंतर जीवन उधळून गेलंय, पण करणार काय? असं जात जात हे जग कुठे जाणार आहे, याचा विचार करायला वेळ तरी कुणाजवळ आहे आज? आमच्यासारख्या वयस्कर मंडळींच्या मनाला एक प्रकारचं हताशपण आलंय. नव्या युगात सामावून जाता येत नाही आणि लहानपणचं निरागस- निर्मळ- शांत आयुष्य फक्त वाकुल्या दाखवत राहतं, चिडवत राहतं. त्याचा कितीही मोह झाला तरी परत फिरता येत नाही.
मनात उलटसुलट विचारांचा गोंधळ उडतो आणि मग मनात येतं, शेवटी ‘अंतर्मनातले’ संस्कारच आयुष्याला योग्य वळण देतात. या लेखाच्या सुरुवातीला सांगितलेले विविध देशांतले अनुभव आठवले तरी आपण त्या संस्कारांपासून किती अंतरावर आहोत हे लक्षात येईल. तसं यायला पाहिजे. वाण्याचा पसा- शिंप्याचा खिसा आणि सोनाराचा मासा हे सारं आज गरजेचं असलं, तरी त्याचं प्रमाण किती ठेवायचं हे प्रत्येकानं ठरवायला हवं. तरच ‘चारित्र्य’ नावाची चीज टिकून राहील, संस्कारी जीवन वाटय़ाला येईल.
परवा दूरदर्शनवरून एक स्वामीजी प्रवचन करत होते. बोलता बोलता त्यांनी एक छान वाक्य उच्चारलं-
‘‘जो आज ‘बच्चा’ आहे त्याला ‘अच्छा’ व्हायचं असेल तर प्रथम ‘सच्चा’ बनायला पाहिजे.’’
एकदम पटलं. मनाचं हताशपण काही काळ तरी दूर झालं. त्या जागी प्रसन्नता आली. जग संस्कारी वाटायला लागलं.
मोहिनी निमकर