Sunday, April 29, 2012


 आभास
 --------------


 आभास तुझा असण्याचा ,
ती साद मनातून येते ,
जिथे बघतो सुंदर काही ,
तिथे तुझी आठवण येते ....

भास तुझा नसण्याचा ,
काहूर मनात दाटे,
मोहरले आकाश समोर ,
ते बघणेही नकोसे वाटे ...

मोहोळात साठले सारे 
तुझ्या आठवणींचे अंश 
घायाळ करती पुन्हा पुन्हा 
ते जुन्या स्मरणांचे  दंश ..

2 comments: