देव
----------
सुंदर पक्षी ,सुंदर नक्षी
सुंदर मोहक नजराणे ,
पाहून खेळ नभांचे सुंदर ,
तरळते ओठी सुंदर गाणे ...
नजाकतीने बसले सारे ,
सुंदर तारे अन तारका सुंदर
आभाळातील अथांग निळाई ,
मनास भासे विशाल सुंदर ...
इथे खालती हिरवाईने ,
सजले डोंगर अतीव सुंदर ,
पाझरती जणू आनंदाश्रू ,
तृषार्त होऊनी वर्षा सुंदर .
मनीमानसी प्रत्येकाच्या
असेल सुंदर हा देखावा
अनंतात अन अथांगातही,
सुंदर देव मज भेटावा ...
----------
सुंदर पक्षी ,सुंदर नक्षी
सुंदर मोहक नजराणे ,
पाहून खेळ नभांचे सुंदर ,
तरळते ओठी सुंदर गाणे ...
नजाकतीने बसले सारे ,
सुंदर तारे अन तारका सुंदर
आभाळातील अथांग निळाई ,
मनास भासे विशाल सुंदर ...
इथे खालती हिरवाईने ,
सजले डोंगर अतीव सुंदर ,
पाझरती जणू आनंदाश्रू ,
तृषार्त होऊनी वर्षा सुंदर .
मनीमानसी प्रत्येकाच्या
असेल सुंदर हा देखावा
अनंतात अन अथांगातही,
सुंदर देव मज भेटावा ...
Apratim....keep writing :)
ReplyDelete