दिनांक – २४/१२/२०१३ मंगळवार सकाळी ११.२७
ज्योतिषशास्त्र – भाग १
मित्रांनो अवश्य वाचा हा लेख आणि लाभ करून घ्या ....लेख मोठा आहे, वाचायचा
कंटाळा करू नका.....नक्की आवडेल .... संग्रही ठेवाच ....माझे फोन नंबर्स
आहेत – 9158510598 / 9890369845 .
आज पर्यंत अनेक विद्वान आणि
सामान्य माणसांना ज्योतिष हे खरे की खोटे, ते शास्त्र की अशास्त्र या
विषयाने भंडावून सोडले आहे. तरीही जगात अनेक लोकांनी याचा सकारात्मक उपयोग
करून घेतला आहे. विदेशात यावर प्रचंड काम झाले आहे. मी काही ज्योतिषातील
किंवा विज्ञानातील [ या दोन्ही गोष्टी शिकलो असलो तरीही] कोणी अधिकारी
व्यक्ती नाही. किंवा माझा शब्द म्हणजे यातील अंतिम शब्द नव्हे. पण एका
नव्या दृष्टीने अभ्यास करायला काय हरकत आहे. मी माझा विचार मांडतो आहे.
प्रेम हे सुद्धा शास्त्राच्या कसोटी वर उतरणार नाही कदाचित म्हणून ते
त्याज्य कसे ठरू शकेल? ज्योतिष या विषयाचे असेच आहे. अभ्यास कमी पडत
असेल.....संबंध मानवी मनाशी आणि आपल्या हातात नसलेल्या घटनांशी आहे
....त्यामुळे ज्योतिष खोटे ठरू शकते????...हवामान खाते रोज खोटे ठरतेय
शास्त्र असून, इलेक्ट्रोन अजून कोणी पाहिला नाहीये कारण त्याला पहायला गेले
की तो जागाच सोडतो त्यामुळे त्याचा अभ्यासच करता येत नाही ....एका
क्वार्कने उजवा स्पिन घेतला की त्याचा समसंबंधी दुसरा क्वार्क प्रचंड दूर
असला तरी उलटी फिरकी घेतो हे केवळ गणिता वरून शास्त्रज्ञ म्हणतात....प्रकाश
कण आहे की लहर आहे हे अजून कळले नाहीये....अशा अनंत गोष्टी कळल्या नाहीत
तरी आख्ख्या विज्ञानाला कोणी खोटे ठरवत नाही ना? मुळात हा अभ्यास खूप कठीण,
गहन आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनाचा आहे.....आणि अशा किचकट मानवी
घटनांचा आहे ..आणि आपल्या ज्या ऋषींनी आपल्या या महान धर्माची उभारणी केली,
सण, उत्सव, परंपरा, अतिशय प्रगत असे आहार शास्त्र, आयुर्वेद ज्या
ऋषीमुनींनी दिला त्यांनीच हे शास्त्र सांगितले आहे. आणि हे धर्मशास्त्र आहे
हेच मुळी चूक आहे....फक्त धर्माने सांगितले की माणूस ऐकतो म्हणून केवळ
धर्माशी ते जोडले आहे.
आकाशात जसे ९ ग्रह आहेत – सूर्य, चंद्र,
मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू तशा आपल्या शरीरात थालामास.
हायपोथालामास, पिच्युटरी, पिनिअल, थायरॉइड थायमस, Adrenal , सेक्स गोनाड्स,
यकृत, स्वादुपिंडे अशा ग्रंथी आहेत.....सूर्य म्हणजे थालामास, चंद्र
म्हणजे हायपोथालामास, गुरु म्हणजे पिच्युटरी, बुध म्हणजे पिनिअल ग्रंथी
तसेच थायमस या बालपणातच कार्यरत असणाऱ्या ग्रंथीवर आणि मज्जातंतूंवर देखील
बुधाचा प्रभाव, मंगळ म्हणजे थायरॉइड, Adrenal वर मंगळ आणि शनी दोन्हीचा
प्रभाव, शुक्र ग्रहाचा लैंगिक ग्रंथी अथवा सेक्स गोनाड्स आणि मूत्रपिंडानवर
प्रभाव असतो, स्वादुपिंडानवर सूर्याचा प्रभाव तर यकृतावर गुरुचा आणि शनिचा
प्रभाव, शनिचा प्लीहेवर [स्प्लीन] प्रभाव असतो आणि एकूणच पचनावर नियंत्रण
असते...... राहू आणि केतू हे शरीरातील ग्रंथींच्या कामात विघ्न, वितुष्ट
आणणारे असेंडिंग आणि डीसेन्डींग नोड्स आहेत. उत्तर आणि दक्षिण ध्रुव असावे
तसेच.
आकाशस्थ ग्रहांकडून येणारया किरणांचा यावर नक्की प्रभाव
पडतो. आईच्या पोटातून बाळ जन्माला येण्यापूर्वी ते नाळेने आईशी जोडले
गेलेले असते आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असते. ज्या क्षणी ते पृथ्वीवर पहिले
पाउल ठेवते त्या क्षणाला त्याच्या शरीरातील या सगळ्या ग्रंथी काम करणे
सुरु करतात. आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणारा तक्ता म्हणजे
आपली कुंडली किंवा पत्रिका .... आईच्या पोटातून बाळ जन्माला येण्यापूर्वी
ते नाळेने आईशी जोडले गेलेले असते आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असते. ज्या
क्षणी ते पृथ्वीवर पहिले पाउल ठेवते त्या क्षणाला त्याच्या शरीरातील या
सगळ्या ग्रंथी काम करणे सुरु करतात. आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध
दाखवणारा तक्ता म्हणजे आपली कुंडली किंवा पत्रिका ....या ग्रंथींमधून
पाझरणारे हार्मोन्स किंवा संप्रेरके एकमेकांशी कसे, कुठे, किती, का, केव्हा
व्यक्त होतात किंवा React होतात त्यावर आपले वागणे अवलंबून असते. आपली
मानसिक स्थिती बदलेल तसे हे प्रत्येक निमिषार्धात बदलत असते. [ एक निमिष –
पापणी लावण्याचा काल]. मग याचे प्रेडिक्शन किंवा भाकीत करणे किती अवघड असेल
याचा तुम्हीच विचार करा. तुम्ही पत्रिकेचा तटस्थ राहून [ पत्रिका खरी
नाहीच अशी ठाम समजूत काही काळ बाजूला ठेऊन] अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात
येईल की ....होय बऱ्याच गोष्टी जुळताहेत.....पुढचा त्रास वाचवायला त्याचा
नक्की उपयोग होतोय.....पण काय आहे ना .....आपले एकदा मत झाले की झाले....मग
त्याच दृष्टीने विचार करायचा....हे ठीक नाही .......आजच्या खगोल
विज्ञानाची सगळी मांडणी ऋषींनी जे खगोल शास्त्र मांडले होते ना त्यावरूनच
झाली आहे. प्रकाशाच्या वेगाने गेले तर आपले वस्तुमान नष्ट होते. त्यामुळे
अनेक प्रकाश वर्षे दूर असलेल्या तारयांचा यंत्राने, याने वापरून कोणीही
अभ्यास करू शकत नाही हे ऋषींनी जाणले होते म्हणून त्यांनी हे ध्यान
प्रक्रियेतून हे सारे जाऊन घेतले....आजच्या खगोल विज्ञानाची सगळी मांडणी
ऋषींनी जे खगोल शास्त्र मांडले होते ना त्यावरूनच झाली आहे. प्रकाशाच्या
वेगाने गेले तर आपले वस्तुमान नष्ट होते. त्यामुळे अनेक प्रकाश वर्षे दूर
असलेल्या तारयांचा यंत्राने, याने वापरून कोणीही अभ्यास करू शकत नाही हे
ऋषींनी जाणले होते म्हणून त्यांनी हे ध्यान प्रक्रियेतून खगोल, अंतराळ
जाणून घेतले....पाश्च्यात्यांनी या नक्षत्रे, ग्रहांना ठेवलेली नावेही
बरीचशी आपल्या नावांशी साधर्म्य दाखवणारी आहेत. शनैश्चर म्हणजे शनीचा
अपभ्रंश Satturn ...सूनु हा सूर्यासाठी असलेला संस्कृत शब्द आहे त्यावरून
सन आले आहे. आपल्या ऋषींनी सांगून ठेवलेय की चंद्र हा पृथ्वीचा पुत्र नसून
मंगल म्हणजे भौम [भूमीचा पुत्र, भूमी पासून निघालेला ] हा भूमीचा पुत्र
आहे. आणि प्रशांत महासागर अर्थात Pacific महासागराचे जेव्हढे क्षेत्रफळ आहे
तेव्हढेच मंगळाचे आहे. मंगळावर आता पाणी सापडल्याच्या बातम्या आणि फोटो
आलेत.....चंद्र शुष्क आहे....त्याचे वय पृथ्वी पेक्षा जास्त आहे आणि चंद्र
बाहेरून पृथ्वीच्या वातावरणात नंतर पकडला गेला आहे..... आपले धर्मशास्त्र
हे “ओम ब्रुम फट” आणि भगवे कपडे घालून हरी हरी करा असे काहीतरी नुसते
करायला शिकवते हे आधी डोक्यातून काढून टाका.....आणि त्याला ऋषींनी
"शास्त्र" म्हंटले आहे इतकेच लक्षात घ्या म्हणजे पुरेल .....
ग्रहांच्या जाती म्हणजे ते कुठल्या वेळेस कसे वागतील हे सोपेपणाने कळावे
म्हणून त्यावेळेस, त्या कालानुसार दिलेली उपमा.....आजही झाडांच्या
प्रकारांना जाती आहेतच ... ज्योतिषशास्त्र चातुर्वर्ण्याचा पुरस्कार नाही
करत ....ती त्या कालानुसार त्या त्या ग्रहांची वागण्याची पद्धत सांगण्याची
संकल्पना होती. आणि राहू केतु हे ग्रह नाहीत. सूर्य चंद्र फिरत असताना जे
संपात बिंदू तयार होतात ते म्हणजे राहू केतू आहेत हेही तिथे स्पष्ट
सांगितले आहे. आपण त्याची उकल करायला कमी पडलो म्हणून ते खोटे ठरवणे हा
अहंकार नाही का? एखादी गोष्ट खोटे ठरवायला फार अभ्यास नाही लागत....तुलनेने
ते सोपे असते....खरे ठरवणेच अवघड असते.....आणि नेमके होते हे आहे की
विज्ञान आणि ज्योतिष हे दोन्ही शिकलेले हे सांगायला पुढे येत नाहीयेत
.....कारण खोटे ठरवणारे हे झाले की ते, ते झाले की ते ....असे कुठलेतरी
सिद्ध न झालेले संदर्भच देऊन बोलत रहातात.....मग हा संवाद न होता वाद
होतो.....त्यामुळे अभ्यासु व्यक्ती अशा ठिकाणी फिरकत नाहीत.....सारया जगात
ज्योतिषाचा प्रचार, प्रसार आहे. ते देश त्याचा उपयोग करून घेत आहेत. किरोने
सांगितलेली भविष्ये जागतिक स्तरावर खरी ठरली आहेत.....आपण ६० - ७० वर्षे
आयुष्य असलेले काही वर्षांचे क्षणिक पथिक हा हजारो वर्षांचा ठेवा ४ बुके
शिकलो म्हणून पुसू शकतो काय? आणि त्याही पेक्षा तो पुसावा काय?
आपण थोडक्यात या ग्रंथींचे कार्य कसे चालते हे पाहू. आणि आपले शरीर केवळ या
ग्रंथींवर चालत नसून या ग्रंथी पाठीच्या कण्यात किंवा कण्याजवळ असलेल्या
मज्जातंतूंच्या जुडग्याला Ganglion असे म्हणतात. [Anatomy - a concentrated
mass of interconnected nerve cells. / Pathology - a cystic tumor formed
on the sheath of a tendon. In neurological contexts, ganglia are
composed mainly of somata and dendritic structures which are bundled or
connected. Ganglia often interconnect with other ganglia to form a
complex system of ganglia known as a plexus. Ganglia provide relay
points and intermediary connections between different neurological
structures in the body, such as the peripheral and central nervous
systems. ]. चक्रांविषयी अधिक माहिती मी माझ्या चक्रे या लेखात देईन.
आलं लक्षात? हे गांग्लिया म्हणजेच Plexuses होत. भारतीय ऋषींनी यांना
चक्रे, दले किंवा कमळे म्हंटले आहे. यांची रचना सुद्धा कमळांच्या
दळांसारखीच म्हणजे पाकळ्यांसारखीच असते. या चक्रांमधून म्हणजे Ganglion
च्या जुडग्यांच्या मधून त्या त्या अवयवात मज्जातंतू गेलेले असतात. तर या
चक्रांच्या द्वारा मेंदू मणक्यातून शरीराशी संपर्क ठेवत असतो. आणि यातून जे
संदेश येत जात असतात त्याला प्रतिसाद देत शरीरातील Glands म्हणजे ग्रंथी
काम करत असतात. यांना बाहेर घडणारया गोष्टींचे ज्ञान डोळे, कान,
स्पर्शेंद्रीये, कान हे देत असतात. जिभेला चव कळते. तर मग बघा हे काम किती
गुंतागुंतीचे आहे. एखाद्या मुलीला तिच्या प्रियकराचे नाव घेऊन चिडवले तर
तिचे गाल लाल होतात, सभेत भाषण करायची वेळ आली की पाय थरथरायला लागतात,
सारखी लघवीला लागते. हे सारे व्यापार ग्रंथी आणि चक्रे यांनी घडवून आणलेले
असतात.
Thamamus [ आपल्या भाषेत सूर्य] मेंदूत ही सर्वात वर
असणारी ग्रंथी आहे. हा या सर्व ग्रंथींच्या कामावर दृष्टी ठेऊन असतो. सूर्य
म्हणजे आत्मा.....आत्मविश्वास....तिचा खालचा भाग म्हणजे Hypo-Thalamus [
आपल्या भाषेत चंद्र]. “चंद्रमा मनसो जात:” चंद्र म्हणजे माणसाचे मन होय. या
सारया ग्रंथींचा व्यवस्थापक म्हणजे ही हायपोथालामस ग्रंथी होय. आपले मनच
सुख आणि दु:ख भोगत असते आणि जे आहे त्यापेक्षा ते मोठे करून बघत असते.
उष्णता आणि थंडी याला दिला जाणारा प्रतिसाद, पाणी, इलेक्ट्रोलाईट्स, साखर,
स्निग्ध पदार्थ यांची चयापचय क्रिया, भूक वाढ, पचन, झोप, घाम अशी बरीच
कार्ये अवस्थली म्हणजे हायपोथालामस म्हणजे चंद्र या ग्रंथी कडून पोष ग्रंथी
म्हणजे पिच्युटरी म्हणजे गुरु ग्रंथीला दिल्या गेलेल्या सुचनेनुसार होत
असतात. पिच्युटरी म्हणजे पोष ग्रंथी किंवा गुरु ग्रंथीचे “Antiriar आणि
postiriar म्हणजे पुढचा आणि मागचा असे २ भाग असतात. ही ग्रंथी पोषण देण्यास
मदत करते. इतर ग्रंथींना स्त्रवण्यास उद्युक्त करते. म्हणून पोष ग्रंथी
आणि हिच्या हार्मोन्सना Trophic हार्मोन्स किंवा पौष्टिक संप्रेरके
म्हणतात. बुध म्हणजे पिनिअल ही ग्रंथी प्रकाश संवेदी ग्रंथी आहे. म्हणजे
प्रकाशात ती कार्यरत होते. तिच्यातून Melatonin नावाचे हार्मोन स्त्रवते.
या ग्रंथीतून जे सिराटोनीन नावाचे हार्मोन स्त्रवते त्यामुळे शांत झोप
लागते. मनाची अवस्था चांगली रहाते. शरीरातील केसांच्या वाढीवर या ग्रंथीचे
नियंत्रण असते. जास्त उन्हात हिंडल्यास ही ग्रंथी जास्त कार्यरत होऊन
शरीरावर केस वाढतात. किंवा ते पिकतात. म्हणून स्त्रियांनी डोक्यावर पदर
घेण्याची प्रथा आली असावी. म्हण आहे ना की “आत्याबाईला मिशा असत्या तर?”
स्त्रियांना दाढी, मिशा चांगल्या दिसणार नाहीत. सध्याच्या मानवात त्याच्या
चुकीच्या वागण्याने या ग्रंथीचे कार्य जवळपास लोप पावले आहे. शंकरांचा ३ रा
डोळा दुसरा तिसरा कोणताही नसून ही ग्रंथीच होय. कारण ही फोटो-सेन्सेटिव्ह
म्हणजे प्रकाशाने उत्तेजित, उद्दीपित होऊन कार्य करणारी आहे. पण अजूनही
शास्त्रज्ञांना या ग्रंथीचे कार्य पूर्णपणे समजलेले नाहीये. मन शांत ठेऊन
डोळ्यांद्वारा बाहेरचे ज्ञान करून देणे हे या ग्रंथीचे काम म्हणता
येईल....ज्याला आपण Jet Lag म्हणतो ते झाले म्हणजे विमानाने प्रवास करून
आपण वेगळ्या देशात जिथे दिवस रात्र वेगळ्या वेळेस आहेत तिथे आपला दिवसाचा
दिनक्रम बदलून आपल्याला शारीरिक त्रास जाणवतो, आपले रोजचे चक्र ज्याला
“Circadian Cycle” असे म्हणतात ते बिघडते. याला कारण हा बुध बिघडतो.....
मंगळ जसा शक्ती, उर्जा, धाडस देणारा ग्रह आहे त्याप्रमाणेच Thyroid [ अवटू
आणि परा- अवटू हे तिचे दोन भाग- गणपतीच्या भाषेत या त्याच्या २ कार्यकारी
शक्ती ऋद्धी- सिद्धी होत. मंगळ ग्रहाच्या भाषेत हे त्याचे २ उपग्रह Dymo
आणि Fobos होत.] किंवा ही ग्रंथी शरीराला उर्जा, शक्ती पुरवते. तसेच
पराअवटू ही ग्रंथी शरीरातील Calcium चे संतुलन राखते. स्वादुपिंडातील अल्फा
आणि बीटा या दोन प्रकारच्या पेशी वेगवेगळी कामे करतात. अल्फा Glucagon, तर
बीटा इंश्युलीन निर्माण करून शरीरातील साखरेचे पचन करतात. मूत्रपिंडे
म्हणजे किडनीज किंवा किडन्या या रक्त गाळून लघवीवाटे शरीरातील न पचलेली,
दुषित द्रव्ये बाहेर काढतात. पण या किडन्यांवर असलेल्या अधिवृक्क ग्रंथी
म्हणजे Adrenal Glands या आपण घाबरतो तेव्हा आपल्याला मदत करतात. जे
म्हंटले जाते की आपण संकटात असताना आपण ३ पैकी १ कृती करतो.... Flee,
Fright ओर Fight म्हणजे जर एखाद्या जंगलात आपल्या समोर सिंह आला तर आपण काय
करू? पळून जाऊ, घाबरून तिथेच मटकन खाली बसू किंवा सिंहाशी लढू....हे सारे
या Adrenal ग्रंथीतून जो हार्मोन स्त्रवेल त्यावर अवलंबून असते.... यकृत
हा शरीरातील कामाचा एक कारखाना आहे. तिथे अनंत घडामोडी, अनंत कामे सतत चालू
असतात. हृदय हे केवळ रक्त शुद्ध करून शरीराला पुरवणारा एक पंप नसून त्याचे
वरचे कप्पे Atria मधून Atrial Natriuretic Factor नावाचे एक संप्रेरक
स्त्रवते. हे संप्रेरक इतर स्त्रावांशी हातमिळवणी करून रक्तदाब आणि रक्ताचे
आकारमान यांचे मियंत्रण अचूक होण्यास मदत करते. “हृदय” या शब्दाचा अर्थ
आपण पाहू. “हर” म्हणजे हरणे, काढून घेणे [जसे रावणाने सीतेचे हरण केले.
हरीण नव्हे.]. “द” म्हणजे देणे आणि “य” म्हणजे नियमन करणे. [ बघा यम आणि
नियम यात य आहे.]. याचाच अर्थ हृदय हे रक्त आधी शरीरातून काढून घेते, ते
परत देणे शरीराला आणि त्याचे शरीरात उत्तम नियमन करते. म्हणजे रक्तदाब
योग्य ठेवते.
पुढे ज्या वेळा देतो आहे त्या वारा नुसार त्या त्या
वेळा टाळून शुभ कार्य करावे. या काळाला राहू काल म्हणतात. या काळात अपयश
येण्याची शक्यता असते. विश्वास असेल त्यांनी करावे, नसल्यास सोडून द्यावे.
प्रयोग करून बघण्यास हरकत नाही. घरच्या कॅलेंडरवर या वारांना या वेळा लिहून
ठेवा.
सोमवार- सकाळी साडेसात ते नऊ.
मंगळवार – दुपारी तीन ते साडेचार.
बुधवार – सकाळी बारा ते दीड.
गुरुवार – दुपारी दीड ते तीन.
शुक्रवार – सकाळी साडेदहा ते बारा.
शनिवार – सकाळी नऊ ते साडेदहा.
रविवार – संध्याकाळी साडेचार ते सहा.
No comments:
Post a Comment