Monday, December 2, 2013

बालाजी सुतार अंबाजागाई यांचा मला आवडलेला एक खुसखुशीत लेख.

अघळपघळ संमेलनात लैच प्रतिभावंत बेचाळीस कवी...

December 1, 2013 at 1:41pm
दिव्य मराठीच्या आजच्या 'रसिक' पुरवणीत प्रकाशित झालेल्या माझ्या लेखाची मूळ प्रत.

कलाप्रिय महाराष्ट्राच्या महन्मंगल भूमीत सिनेमा-नाटकांच्याखालोखाल लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे कविसंमेलने. पैकी नाटके आणि सिनेमे हल्ली डायरेक्ट टू होम शैलीत घरपोच होत असल्याने औटडोअर मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी जायचे म्हणजे कविसंमेलनाला जायचे अशीच महाराष्ट्रभर रसिकांची कल्पना झालेली असते. खरंतर औटडोअर मनोरंजनाच्या क्षेत्रात सगळ्यांत पहिला नंबर निवडणुकीतल्या भाषणांचा असतो, मात्र हल्ली एकमेकांची सरकारे ‘पाडणे’ वगैरे दहाबारा वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेले खेळ कॉंग्रेस सरकारच्या - नवी पिढी ज्या चिवटपणाने फेसबुकला अष्टौप्रहर चिकटून बसते तसल्या- सत्तेला घनदाट चिकटपणे चिटकून राहण्याच्या गुणधर्मामुळे फारसे घडताना दिसत नाहीत. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभांच्या गंमतीदार निवडणुका लैच लै तर चार-पाच वर्षांत एखाद-दुस-याच वेळी ‘लागतात’. स्थानिक नगरपालिकांच्या किंवा ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही विनोदी असतातच पण तिथल्या विनोदाला उघडपणे हसायचे म्हणजे हसणा-यावर दणकावून मार खायचीच पाळी असते. सबब सर्वाधिक निरुपद्रवी औटडोअर मनोरंजनासाठी लोकांना कविसंमेलनावरच अवलंबून राहावे लागते.
सांप्रत सर्व प्रकारच्या कलावंतांच्या तुलनेत ‘कवी’ हा इसम संख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रभर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आढळतो, त्यामुळे गावोगावी घाऊक कवींचे संमेलन भरवणे हा खेळ अत्यंत तेजीत चालतो. घरटी किमान एक कवी असे सामान्यपणे महाराष्ट्रात कवींचे होलसेल प्रमाण असल्याचे कुणीतरी प्राध्यापकाने 'पीयेचडी'च्या अतोनात अभ्यासपूर्ण प्रबंधात लिहून सिद्धच केल्याचे आपल्याला माहीतच असेल. त्यामुळे ‘काही घडले की घ्या कविसंमेलन' असाच खाक्या गावोगावी चालत असलेला दिसून येतो. इंग्रजी-मराठी नवं वर्ष लागणं, शिमगा म्हणजे होळी, रंगपंचमी, दिवाळी, पाडवा, कोजागिरी असल्या दिवशी गावोगावी कवींचे जत्थेच्या जत्थे कविसंमेलनासाठी हिंडताना आढळतात. काही पुढा-यांना आपल्या रसिकतेवर मोहर उठवून हवी असते. अशांचे स्वत:चे वाढदिवसही असे पुढारी लोक कविसंमेलने भरवून साजरे करताना दिसतात. कविसंमेलने भरवणे सर्वांनाच सर्व दृष्टीने सोयीचे असते कारण ज्यादा नामचिन कवी सोडले तर बाकी कवी केवळ ‘कविता वाचू दिली जातेय’ एवढ्यावरच खुश होऊन स्वखर्चाने ‘फुकट्यात’ संमेलनाला हजर राहतात.               
काही दिवसांपूर्वी एका आमदारांनी आयोजित केलेल्या साहित्यसंमेलनातल्या कविसंमेलनात मी स्वत:च निमंत्रित होतो. कार्यक्रमपत्रिकेमध्ये एकूण बेचाळीस कवींची नावे छापलेली होती. एवढ्या बेचाळीस कवींचा सहभाग असलेल्या कविसंमेलनासाठी संध्याकाळी साडेचार ते सहा असा ऐसपैस आणि अघळपघळ तब्बल ( ! ) दीड तासांचा वेळ उपलब्ध करून दिलेला होता. सहा ते सात या वेळेत संमेलनाच्या अध्यक्षा आणि एक मंत्रीमहोदय, दोनेक आमदारमहोदय, एक झेडपीअध्यक्षमहोदय आणि इतर अनेक स्थानिक महोदयांच्या महनीय उपस्थितीत समारोपाचे सत्र होणार होते. आणि त्यानंतर गावातल्या शाळेतल्या मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उर्फ सांस्कृतिक कार्यक्रम होता.
तर गंमत अशी झाली की कविसंमेलनापूर्वीचे कथाकथनाचे सत्रच मुळात सहा वाजता संपले. मग घाई करून समस्त कवींचा जथ्था हाक-हाकून स्टेजवर नेण्यात आला. जागा सापडेल तिथे दाटीवाटीने आम्ही लैच प्रतिभावंत बेचाळीस कवी स्टेजवर स्थानापन्न वगैरे झालो. मग आधीच उशीर झाल्यामुळे कावलेल्या सूत्रसंचालकांनी अत्यंत घाई-घाईने "अमुक कवीचे स्वागतआमच्या संस्थेतील प्राध्यापक अमुकसर करतील.." असा दरेक कविसोबत एकेका प्राध्यापकाचे नाव घेऊन स्वागतसमारंभ चालू केला. काही क्षण स्टेजवर एकाचवेळी उठबस करणारे चारचार-पाचपाच कवी आणि त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यासाठी स्टेजवर चढ-उतर करणारे चारचार-पाचपाच प्राध्यापक असे अत्यंत हातघाईवर आलेले दृश्य दिसू लागले. शिवाय दरेक कवी-प्राध्यापकाची जोडी फोटोसाठी पोझ देऊन कॅमे-याला पक्की नजर भिडवून स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यासारखी निश्चल उभी राहून फोटोचा फ्लॅश चमकेपर्यंत अजिबात हलत नव्हती.हा सगळा ‘पानपता’सदृश्य गोंधळपाहून दिवसभर साहित्यिकांसारख्या असंगांशी संग करावा लागल्याने अतोनात कावलेले आयोजक आमदारमहोदय ज्यास्तीच कावून गेले आणि त्यांनी सूत्रसंचालकाला बोलावून 'मार्गदर्शन' केल्यानंतर सूत्रसंचालकमहोदयांनी "झाले तेव्हढ्या कवींचे स्वागत पुरे झाले. उरलेल्या सन्माननीय कवींचे स्वागत कार्यक्रमाच्या मध्यंतरात लैच सन्मानाने करण्यात येईल." असे जाहीर करून "आता कवींनी कविसंमेलन 'च्यालू'करावे." असा संयोजकीय हुकुम देऊन माईक स्टेजवरच्या सूत्रसंचालकाकडे सुपूर्द केला. दुस-या किंवा तिस-याच कवीने "आमचे आमदार"नावाची कविता खड्या आवाजीत सादर करून तिच्यात आमदारसाह्यबांच्या आजवरच्या कार्यकर्तृत्वाचा समग्रपणे आढावा घेतला. सदर कवितेत एक ओळ "अशोकरावाला शिकविला धडा हो.." अशी होती.  एकूण कविसंमेलनाचा रोख त्यानंतर अनेक कवींच्या लक्षात आला असावा कारण नंतरही "आमदार" या विषयावर आणखी दोन कविता सादर केल्या गेल्या. मग काही प्रेमकविता, काही "कापसाला भाव मिळत नसल्याने शेतक-यांनी गांजाची शेती का करू नये?" असा "आजचा सवाल" विचारणा-या कविता, (या कवीचे ऐकून कुणी गांजाची शेती केलीच आणि त्याला पोलिसांनी धरलेच तर त्यात या कवीच्या काकाचे काय जाणार होते?). तासाभरात दहा की बारा कवींच्या कविता
गाऊन किंवा वाचून झाल्यानंतर समारोपाच्या कार्यक्रमासाठी मंत्रीमहोदय स-लवाजमा आल्याची वार्ता आली आणि आयोजक आमदारमहोदयांनी पुन्हा एकदा सूत्रसंचालकांना मार्गदर्शन केल्यानुसार "उर्वरित कविसंमेलन "आफ्टर द ब्रेक" म्हणजे समारोपाचा 'कारेक्रम' झाल्यानंतर पुन्यांदा घेतले जाईल, तस्मात् , समस्त लैच प्रतिभावंत कवींनी स्टेजवरून उतरावे आणि कुठेही लांब न जाता तिथेच डाव्या बाजूस थांबून किंवा बसून राहावे." अशी उद्घोषणा करण्यात आली तेव्हा आम्ही सगळे चाळीस-बेचाळीस कवी जड पावलांनी गडबड करून खाली उतरलो आणि डाव्या बाजूस बसायला काही सापडते काय याचा निष्फळ शोध घेऊन दाटीवाटीने उभे राहिलो. समारोपाच्या कार्यक्रमात खास ‘मंत्री’शैलीत मंत्रीमहोदयांची आणि इतर तीन-चार बिनमंत्रीमहोदयांची सविस्तर भाषणे दीडेक तास चालली तेव्हा नऊ वाजून गेल्यानंतर सदर समारोपाचा कार्यक्रम संपला आणि "उरलेल्या कवींनी अजिब्बात वेळ न लावता तातडीने स्टेजवर दाखल होऊन एकेक बारकीशी कविता म्हणून मोकळे व्हावे आणि रसिक श्रोत्यांनाही मोकळे करावे कारण नंतरच्या शाळेतल्या पोरांच्या सांस्कृतिक कारेक्रमाला आधीच लै उशीर झालेला असून पोरे पेंगुळली आहेत, तर ती झोपी जाण्याआधी तोही कारेक्रम उरकणे आवश्यक आहे." असं सूत्रसंचालकरावांनी जाहीर केले तेव्हा पुनश्च सरसावून पंचवीस-तीस कवी झुंडीने स्टेजवर गेले आणि कविसंमेलन पुन्यापुन्यांदा 'च्यालू' जाहले ! इतका वेळ इथे तिथे थांबून अनेक कवी ओशाळलेले, संतापलेले, शरमिंदे झालेले असले तरी अनेकजण तरीही फॉर्मात होते. या "आफ्टर द ब्रेक"सत्रातल्या पहिल्या कवीच्या कवितेचे बोल होते - "कव्हा व्हईन, यंकटण्णा, आपली सुदारना, न् कव्हा व्हईन, यंकटण्णा, आपली सुदारना ?". कवींच्या किंवा कवितेच्या अधोगतीबद्दल काहीएक वाटून न घेता सदर कविबंधू यंकटण्णाच्या ‘सुदारनेची’ वाट पाहत होते हे एकूणच कवींच्या तळागाळातल्या जनतेप्रती असलेल्या आस्थेचेच निदर्शक मानता आले असते.
कवितेची अब्रू घालवणा-या या सगळ्या प्रकारास एक कविता वाचून आपणही यथाशक्ती हातभार लावला याची लाज वाटून घ्यावी की शरमून जाऊन एखाद्या कोरड्या विहिरीत (यंदा पाऊस बराच बरा झालेला असला तरीही अशा कोरड्या विहिरी आमच्या भागात अतोनात मुबलक संख्येने उपलब्ध आहेत याची इतर भागांतल्या गरजूंनी नोंद घ्यावी.) उडी ठोकून जीव द्यावा या संभ्रमात कानकोंडा होऊन अजूनपर्यंत नवी कविता लिहायला पेन उचलावासे वाटेनासे झालेले आहे. कविसंमेलन हा एकंदरीतच 'च्यामारी गुणिले अतोनात वेळा' असा लैच यंग्राट प्रकार असतो आणि या अस्ल्या चळवळीत आपल्यासारख्या भल्या माणसाने भाग घेऊ नये एवढे आपण शिकलो हे मला कबूल असले तरी, उद्या आणखी कुणी ‘प्रत्यक्षाहुनि होर्डिंगव्यापी प्रतिमा उत्कट’ स्वरूपाच्या दादा, भाई किंवा अण्णांनी त्यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित, कुणाच्या पोराच्या बारशानिमित्त किंवा असल्याच कसल्यातरी एकदम महत्वाच्या प्रसंगी कविसंमेलन आयोजित केले आणि त्यात मला बोलावलेच तर मी जाईनच की काय अशी मलाच स्वत:ला शंका वाटत राहते. कदाचित जाईनसुद्धा. कवींना एवढ्यातरी मानाने दुसरा कोण बोलवतो हो ?

--------------------------------------------------------------------------

-         बालाजी सुतार, अंबाजोगाई.

Friday, November 22, 2013

आज्जीचं घड्याळ..

आजीचे घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

(कवीचं नाव कळविल्यास आभारी राहीन)

Thursday, October 3, 2013



(भय इथले संपत नाही...पुढील भाग..)

मृत्यूचे महानाट्य......(भाग2)

सातत्याने नवोन्मेषशाली असणारी सृष्टी सृजनशील सर्जनशीलतेची मोठी प्रतिभा आहे.परंतू नैसर्गिक प्रलयाचा महासागर जेव्हा तिला आपल्या कवेत घेतो तेव्हा ती बिनबोभाटपणे त्याला सर्वस्वाचं दान देवून टाकते आणि रिती होते पुन्हा नवीन काहीतरी जन्माला घालण्यासाठी....
       उगम आणि विनाश...जन्म आणि मृत्यु...या दोन टोकामध्येच पृथ्वीवरील जीवसृष्टीचा प्रपंच सुरु आहे.मृत्युचा हा सामुहिक उच्छाद पाहाताना ही जाणीन प्रकर्षाने होते..आणि आपण स्तब्ध होउन जातो. त्याने कुणालाच सुटकेची संधी दिली नाही एखाद्या लहरी   ,बेछूट दरोडेखोरासारखा येउन कठोर होउन निरपराधांना मरण देउन गेला..क्षणात होत्याचं नव्हतं करुन गेला..आणि मागे ठेवून गेला हळहळत्या निश्वाःसांसह फाटलेल्या आभाळाखाली गोठून गेलेली माणसं....व्याकुळतेच्या खोल डोहात बुडालेली माणसं...मृत्यूच्या महानाट्याचा जिताजागता प्रपात पाहणारी माणसं...किल्लारीसह बावन्न खेडी उध्वस्त झाली. हजारो संसार बेचिराख झाले. अनेक निष्पाप जीव उमलण्यापूर्वीच खुडले गेले, मागे राहीले फक्त मन हेलावून सोडणारे..आर्त विव्हळणारे स्वर...माझा बाबा गेला sss…..माझं तान्हुलं कुटं हाय...sss…इवल्या इवल्या चिल्यापिल्यांच्या मृतदेहाला कवटाळून,,आयाबायांचा...नातेवाईकांचा अनावर शोक...सगळीकडे हे मन छिन्नविछिन्न करणारे दृष्य काळजाला पीळ पाडत होते..मृत्यूने आपल्या  अक्राळविक्राळ जबड्यात गुलाबाच्या कळ्यांसारख्या...फुलपाखरासारख्या गोजिरवाण्या..निष्पाप..गोंडस जिवांसहीत.....तरण्याताठ्या लेकी-सुनांसहीत...म्हाता-या कोता-या कष्टक-यांना गिळून टाकलं होतं...रात्री झोपेच्या आधीन होण्यापूर्वी आपलं सर्वस्व असलेली आपल्या कुटुंबातली माणसं सकाळी सुर्योदयापूर्वी आपलं आता कुणीच नाही या भावनेने वेडीपिशी झाली होती.......
                                                                      
                                                                       क्रमशः

Wednesday, October 2, 2013



भय इथले संपत नाही..... (भाग1)
दिनांक 30 सप्टेंबर 1993 ची पहाट लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या किल्लारी सास्तुर आणि या सारख्या बावन्न खेड्यासाठी काळपहाट ठरली. गणरायाच्या सहवासातले आनंददायी दहा दिवस काळजाच्या कप्प्यात साठवून शांतपणे झोपी गेलेल्यांना त्याची पाठ फिरताच एका अघटीत संकटाला सामोरे जावे लागेल अशी साधी कुणकुण देखिल लागली नाही. सगळे निर्धास्त झोपलेले असतांनाच पहाटे चार च्या सुमारास हा जीवघेणा धरणीकंप झाला.नेमकं काय घडतय हे कळायच्या आत प्रचंड गडगडाटासह पाळण्यात बसल्यासारखा सारा आसमंत हलु लागला..काहीतरी भयानक घडतय हे जाणवताच हल्लकल्लोळ माजला.लोक जीवानिशी धडपडत घराबाहेर.आले याला भूकंप म्हणतात हे कळायच्या आत ,कुणालाही आवरायला सावरायला सवड न देता पहाटेच्या अंधारात त्रेपन्न गावांना त्या भूकंपाने आपल्या उदरात सामावून घेतले...आज वीस वर्षानंतरही भयावह भूकंपाची आठवण अंगावर शहारे आणते....
अंधाराचं आणि मृत्यूचं अतुट नातं आहे अनेक जीवघेण्या आपत्तींना ,नैसर्गिक संकटांना बहुधा रात्र पहाटेच्या अंधाराची साथ मिळालेली आहे. काळ्याकुट्ट अंधाराच्या साथीने निष्पापांच्या जगण्यावर आघात करणार्या ह्या नैसर्गिक आपत्तीने सकाळी उजाडताना बघणा-यांच्या काळजाचा थरकाप उडवला.निसर्गाच्या रौद्र रुपाने निशःब्द झाले सगळे...अतिशय भेसूर चित्र समोर दिसत होते...मानव आणि निसर्ग यांच्यामध्ये घडलेल्या युद्धाचं...ते युद्धही एकतर्फीच....प्रतिकाराला देखिल उसंत नाही..आक्रंदनाला वेळ नाही..कुणी कुणाला वाचवायला वेळ नाही...उठायची देखिल संधी न देता अंगावर अजस्र चिरांच ओझं टाकुन अवघं भावविश्व मातीत दडपून निसर्गाने हजारोंचा बळी घेतला.... अवघ्या त्रेचाळीस सेकंदाच्या अवधीत हे सारं घडलं...कोसळुन पडलं होतं सारं ..भावनांच  अन् जाणीवांच जग...प्रत्येकजण अनभिज्ञतेच्या बुरख्याआड आपल्याच मस्तीत जगत होता पण नियतीच्या एकाचं फटका-याने होत्याचं नव्हतं करुन टाकलं....
तांत्रिक विश्लेषणानंतर कळलं हा भूकंप अतिशय तीव्र होता.जबरदस्त हाद-याने अंगावर दगड माती पडु लागली...वीजही गेली...काळ्याकुट्ट अंधारात आक्रोश ..किंकाळ्या टाहोंनी आसमंत चिरला गेला.. नुकतच विसर्जना मुळे लातुर नियंत्रण कक्षात थोडीफार जाग होती.भराभर संपर्क झाले.आपत्तीचा अदमास नव्हता पण भयानक संहाराची कल्पना आली होती.थोडसं उजाडलं..शेतात,गोठ्यात झोपायला गेलेले आपल्या गावाकडे..घराकडे कुठल्यातरी अनामिक ओढीने धावत सुटले...गावात पोहोचल्यावर त्यांना दिसले ते दगड-मातीचे ढिगारे...त्या ढिगा-यांखाली अडकलेली मदतीसाठी,मूकआक्रोश  करणारी ..रक्तबंबाळ झालेली माणसं...नशीब बलवत्तर असलेले जे वाचले त्यांच्या डोळयात मुर्तीमंत भीती दाटलेली..हजारोंच्या नशीबात ढिगा-याखाली दबून जीव सोडणे एवढेच होते...भूकंपाची माहिती मिळाल्यावर त्वरीत पोहोचलेले पत्रकार श्री भारतदादा गजेंद्रगडकर यांना एका ढिगा-यात गाडल्या गेलेल्या महिलेचा फक्त एक हात वर दिसत होता..मदतीसाठी आकांत करताना कदाचित जगण्याच्या तीव्र इच्छेने वर आला असेल.पण फक्त बघण्यापलिकडे ते काहीच करु शकले नाहीत..त्यांच्या डोळयात पाणी तरळले..सास्तुरच्या वाटेवर सन्नाटा...सगळीकडे प्रचंड भीती...काय घडले हे न कळल्याने जाणवणारी अस्वस्थता याचे नेमक्या शब्दात वर्णन करणे अशक्य होते..जिवंत माणसांना घराच्या दगडमातीच्या ढिगा-यातुन बाहेर काढण्याच्या प्रयत्नात मृतदेह काढायचे सुचणार तरी कसे आणि कुणाला?..तशात ढिगा-यामधून बाहेर आलेला हा हात...कोणाचा असेल तो.?....आयुष्याची सुखद स्वप्नं पाहाणा-या मुलीचा......विवाहाची चित्र रंगवणा-या तरुणीचा...कि अर्ध्या संसारातुन अचानक सर्वस्व सोडुन जावे लागलेल्या विवाहितेचा कि आपल्या चिल्यापिल्यांना वाचवण्याची संधीसुध्दा न मिळालेल्या असहाय्य मातेचा? सुन्न मनस्थितीत हा फोटो त्यानी काढला खरा. पण तो पाहतांना मन अजुनही अस्वस्थ होतं...त्या अबलेला आपण गाडले गेलो आहोत हे लक्षात तरी आले असेल का? समजा तिने आरडाओरड केली असली तरी ती ऐकू कोणाला येणार आणि त्या अंधारात मदत तरी कोण करणार..कशी करणार ? सारं गावच उध्वस्त झालेल...
                                                            क्रमशः 
                                                           राजेंद्र भंडारी 
                                                            9730248735

Tuesday, September 24, 2013

मनातील अभंग..या फेसबुकपेज वरील एक सुंदर गोष्ट.

एक दिवसाचा पांडुरंग .....

नक्की वाचा !!
"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात
गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे
झाडण्याची सेवा करत होता,
तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि,
"विटेवर उभा राहून रोज
हजारो लोकांना दर्शन देत
असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत
असतील, म्हणून एक दिवस त्याने
पांडुरंगाला विचारले, '" देवा तू
आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे
पाय दुखत असतील तेव्हा तू
आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे
राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे ,
पण तू इथे उभा राहून
कोणालाही काही सांगू नकोस,
काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त
हसत उभा रहा"
पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व
दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :-
"देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे,
माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून
गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले
पाकीट तेथेच विसरला, पण देवाने
काहीच न करता फक्त उभे राहण्याचे
सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट
त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे
तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे
तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक
रुपया मी तुला अर्पण करतो,
माझी हि धनाची सेवा स्वीकार कर.
तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव,
माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून
घे....... देवा माझी बायको व मुले २
दिवसांपासून उपाशी आहेत, घरात
अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार
मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल
ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल
असा मला विश्वास आहे"
( असे म्हणून तो भक्त आपले डोळे
उघडतो तेव्हा त्याला तिथे
पैशांनी भरलेले पाकीट दिसते,
तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट
घेऊन जातो व
आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व
इतर गरीब लोकांना अन्न देतो........
गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच
असतो )
पुढे तिथे एक नावाडी येतो,
देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे
पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप
लांबचा प्रवास करायचा आहे,
तेव्हा सर्व व्यवस्थित
होण्यासाठी आशीर्वाद दे "
(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ
लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त
पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट
नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त
पोलिसांमार्फत पाकीट
चोरल्याच्या संशयावरून
नावाड्याला अटक
करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट
वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने
तो फक्त उभा राहतो )
तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, "
पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस,
मी काहीच नाही केले
तरी मला हि शिक्षा"
(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते,
तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग
जरी इथे असला असता तरी त्याने
काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून
तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट
नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने
चोरले आहे" ..... त्यावर पोलीस
नावाड्याला सोडून देतात,
तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त
देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)
रात्री पांडुरंग मंदिरात येतो व
गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"
गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले
होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम
आहे, पण आज मला कळाले कि हे काम
किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते
कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण
देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे
म्हणून तो सारी हकीकत
देवाला सांगतो.
तेव्हा पांडुरंग निराश होऊन
त्याला म्हणतो, " शेवटी तू
माझ्या आज्ञेचा भंग केलास,
तुला मी सांगितले होते कि तू
कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू
ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर)
विश्वासच नाही........ तुला काय वाटते
कि मी भक्तांच्या ह्रुदयातील
भावना ओळखू शकत नाही " .......
गोकुळ मान खाली घालून
उभा राहतो ..........
पांडुरंग पुढे म्हणतो .........
अरे त्या श्रीमंत माणसाने
दिलेल्या देणगीतील पैसे हे
चुकीच्या मार्गातील
आणि भ्रष्टाचारातील होते,
आणि त्या पैशांच्या बदल्यात
त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून
भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट
हरवण्याचा खेळ
मला करावा लागला जेणेकरून ते पैसे
चांगल्या मार्गाला वापरून
त्याच्या पदरातील
पापाचा साठा कमी होणार होता.
त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच
रुपया राहिला होता, तरी देखील
श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण
केला. म्हणून पैशांचे पाकीट
मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त
गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने
तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले
नव्हते पण तो समुद्रामध्ये
लांबच्या प्रवासाला जाणार होता,
तेथील वातावरण आज खूप खराब आहे,
मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत,
ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू
शकला नसता व त्याचा प्राण
गेला असता, म्हणून मी त्याला अटक
करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात
बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक
दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे
समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस..

Thursday, September 19, 2013

श्री संजयजी सोनवणी यांनी इंग्रजीतुन केलेले पसायदानाचे भाषांतर..

UNIVERSAL ANTHEM BY DNYANESHVAR

And now the Lord
Breathing through His entire creation…
Be pleased
Of my
Sacred hymns
And shall bless me with thus:

Let the evilous thoughts
Be wiped out
Off every heart
To befriend with
The hearts genuine
Be all engaged
In good deeds…forever!

Shroud of dark befallen on
The deprived souls
May get to an permanent end
By the brilliance of
The Sun of the self-righteousness
And all the beings breathing should attain
They desire!

Be it a great gathering
The whole universe
Of devotees
Of the Lord
A scene so sacred
True hearts meeting
The pure hearts!

Be all among the
Dense divine trees
Those Fulfil every desire
And in the country of the
Enlightened souls
Each speaking oceans full
Of the nectar!

As if spotless moon
And the Sun pouring no heat
Such are all the souls as if
Eternal relations!

And so all be so contented
And fulfilled from all the quarters
Eternally devoted to the
Lord Creator!

And so all be happy
Reading this sacred text
Be able to conquer evil with good
With assured permanence!

So this be my blessing
O Lord
With which this humble Dnyandeva
Is delighted!

-Saint Dnyaneshvar
"Dnyaneshvari"

Monday, September 2, 2013

स्वप्नांचे अर्थ....

स्वप्नांचे अर्थ : प्रस्तुतकर्ता -Yogesh Joshi
भारतीय दर्शनशास्त्रानुसार भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य यांचे सुक्ष्म स्वरुपात वायुमंडळा मध्ये उपस्थीत असतात. जेंव्हा एखादी व्यक्ती नीद्रावस्थे मध्ये असते तेव्हा ती सूक्ष्माकार होउन आपल्या भूत आणि भविष्य यांच्याशी संपर्क स्थापीत करते. हेच संपर्क स्वप्नांचे कारण आणि स्वप्नांचे माध्यम बनते.
॥ जे मनी नसे तेही स्वप्नी दीसे ॥
जी व्यक्ती सक्रीय असते ती स्वप्न बघते,आणि जी व्यक्ती स्वप्न बघत नाही ती व्यक्ती जीवंत असू शकत नाही. थोडक्यात प्रत्येक जीवंत व्यक्ती स्वप्न बघतेच. फक्त जन्माने अंध व्यक्ती स्वप्न बघू शकत नाहीत नहीं देख पण त्यांना स्वप्नात ध्वनी एकता येतो. म्हणजेच त्यांना देखिल स्वप्न पडते. आणि स्वप्न काय झोपतानाच पडतात असं नाही ती जागे पणी पण तर पडतात.
स्वप्नांचे पुढील दोन प्रकार पडतात,
१ जागृत अवस्थे मधील स्वप्न
जागृत अवस्थे मधील स्वप्न कवी, लेखक, प्रेमी-प्रेमीका, अविवाहित कीशोर, युवक-युवती यांना अधीक पडतात. हे स्वप्न कलात्मक असतात .

२ निद्रावस्थे मधील स्वप्न
भारतीय दर्शनशास्त्रानुसार भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचा सुक्ष्म स्वरुपात वायुमंडळा मध्ये वावर असतो. जेंव्हा एखादी व्यक्ती नीद्रावस्थे मध्ये असते तेव्हा ती सूक्ष्माकार होउन आपल्या भूत आणि भविष्य यांच्याशी संपर्क स्थापीत करते. हेच संपर्क स्वप्नांचे कारण आणि स्वप्नांचे माध्यम बनते. एखाद्या वक्तीची साधाना खूपच प्रबल असते ती व्यक्ती जागे पणी देखील किंवा ध्यान अवस्थे मध्ये या भूतकाळ वा भविष्यकाळाशी संपर्क साधू शकतो. त्यालाव योगी अथवा द्रष्टा किंवा अंतरयामी बोलले जाते.
आपल्या अचेतन मानाची झेप खूपच मोठी असते. आपले अचेतन मनाचा वावर फक्त आपल्या शरीरा पर्यंतच नसतो, ते विश्वाच्या कोणत्याही कोपर्‍यात जेंव्ह पाहीजे तेंव्हा पोहचू शकते. या मनाच्या शक्तीच्या माध्यमातूनच तीनही लोकांच्या कोणत्याही भागात जेंव्हा पाहीजे तेंव्हा पोहचता येते, आणि उसके कोठे काय चालले आहे हे जाणून घेता येते.
नीरर्थक स्वप्न कोणती ?
स्वप्न जागेपणी बघीतले त्याचे फलीत आपण स्वतः घडवायचे असते, तोकाही संकेत नसतो. तसेच दिवसभर ज्या विषयाशी आपला संबध आलेला आहे ते विषय. किंवा जोविषय आपण गेले काही दिवस मनात त्याचा विचार करतोय त्या विषयाचे स्वप्न पडले तर त्याचा अर्थ शोधण्यात काहीच लाभ नाही. तसेच मध्य रात्री झोप लागल्या बरोबर, दूपारी झोपले असता, पडलेले स्वप्न कोणताही संकेत देत नसते अशीस्वप्न नीरर्थक समजावीत. रात्री जर अनेक स्वप्न पडली तर सुरवातीची स्वप्न नीरर्थक ठरतात शेवटचे स्वप्न फल देणारे ठरते.
स्वप्नांचे फल केंव्हा मिळते ?
स्वप्न रात्री तीन वाजल्या पासून ते पहाटे सुर्योदया पूर्वी पडलेल्या स्वप्नांचे फलीत लवकरच मिळते साधारणतः सात दिवसा मध्ये आपल्याला याची प्रचीती येते. मध्य रात्री पडलेले स्वप्न ( रात्री १२. ते पहाटे ०३ दरम्यान पडलेले स्वप्न ) साधारणतः एक महीन्यात आपले फल देते. व मध्य रात्री पुर्वी पडलेली स्वप्न एक वर्षाभरा मध्ये आपले फल देते.
पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात हा समज सर्वत्र आहे. पण त्यात काही प्रमाणात सत्य असले तरी जसे स्वप्न दीसले तसेच ते घडणार असे नसून विशीष्ट स्वप्न पडले असता त्याचे विशीष्ट अर्थ असतो.
शुभ स्वप्न फल विचार :

1 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला डोक्यावर घर जळताना दीसले, तर त्याला अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो. ( जास्त मोठा अधीकार. )
2 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कानात कुंडल, डोक्या वर मुकुट व गळ्यात मोत्याची माळ गातलेली दीसेल त्याला निश्चितच उच्चाधीकार व त्यातून लाभ प्राप्त होतात.
स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला आपण आपल्या शत्रूंना पराजीत करताना दीसला तर त्याला बढती हमखास मिळते.
3 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला गाय, बैल, पक्षी, हत्ती यांच्यावर चढून स्वतः जर समुद्र पार करताना पाहील्यास त्याला जास्त मोठा अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो.
4 . एखाद्यास जर कमळाच्या पानावर बसून स्वतः खीर खाताना पाहीले तर त्याला राजकीय पद नवडणुक जिंकण्याचा योग वा मंत्री पद प्राप्त होते.
5 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात आपल्या योनिचे क्षेत्र विकसित होतान दीसले तर तीला निश्चीतच कोणत्या तरी पुरुषाची संपत्ती प्राप्त होण्याचा योग असतो.
6 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःचे सगळे केस गळून गेलेले व स्वतःला टक्कल पडलेले दीसेल तर त्याला अमुल्य धनप्राप्ती होते.
7 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कुंभार मडके बनवताना दीसल्यास त्याचे स्वतःचे दूखः लवकरच दूर होणार व धनलाभ होणार असे समजावे.
8 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतः उंच भींतीवर बसलेले पाहील्यास सुख-संपत्ति प्राप्त होते.
9 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःच्या वया पेक्षा मोठे झालेले दीसले तर त्याला मान-सम्मान प्राप्त होतो.
अशुभ स्वप्न फल विचार :
1 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात स्वतःला टक्कल पडलेले दीसले तर गरीबीचा सामना करण्याचे योग संभवतात.
2 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतःस दुर्घटना घडताना दीसली तर लवकरच आजार पण संभवते.
3 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः प्रवासा साठी वाहनद्वारे जाण्याची तयारी करताना दीसल्यास त्याला योजलेला प्रवास रद्द केलेलाच बरा कारण अपघात भय दीसते.
4 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः आरशे फोडत असल्याचे दीसते त्याच्या परीवारात कोणाचा तरी मृत्युसम संकट येते.
5 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर मुंग्याना स्वतः मारताना पाहील्यास व्यापार नाश संभवतो.
6 .एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतःची नाव तूफानी वादळात फंसलेली दीसल्यास येणारा काळ पुर्ण असण्याची ही सूचना समजावी.
7 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः कडू औषध घेताना पाहील्यास जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येण्याचे संकेत आहेत.
8 . स्वप्नात रडणारे बालक दीसणे आजारपण व निराशा यांची सूचना देते.
प्रणय संबंधी स्वप्न फल विचार :
1 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात रत्नजड़ीत आंगठी अथवा नेकलेस बघते तीचे वैवाहीक जीवन सुखी होते.
2 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात स्वतःस कोण्या मित्राने दीलेल्या बांगड्या घालताना पाहील्यास शीघ्र विवाह होतो.
3 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कोणतेही सुंदर वस्त्र दीसल्यास त्याला मधुर स्वभावाची विदुषी पत्नी प्राप्त होते.
4 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला औरत को घूंघट निकालते देखता है तो उसका दांपत्य जीवन सुखमय व्यतीत होता है।
5 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला अपली हरवलेली वस्तु पुन्हा मिळवल्यास त्याला आगामी जीवनात सुख मिळते .
6 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात स्वतःस मेळा , यात्रा, जत्रा, कार्नीवल, मॉल, अथवा फॅशन शोमध्ये स्वतः भाग घेतला असेल,
7 . अथवा त्यामध्ये लोक यांच्या कडे बघत असतील किंवा यांना बघण्यासाठी लोक येत असतील, किवा स्वतःस फीरताना पाहील्यास योग्य नोकरी व योग्य पती प्राप्त होतो.
8 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर इंद्रधनुष दिसल्यास वास्तविक जीवन सुखमय राहील.
9 . एखादी अविवाहित युवती अपल्या प्रेमीला कोण्या दुसर्‍याच युवतीशी विवाह करताना पाहीले तर तीचा विवाह शीघ्र होतो.
10 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कोणत्याही सुंदर व स्वस्थ्य नवजात बालकाला ( शिशु ) बघीतल्यास संतान प्राप्त होणार.
11 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात पुरुष आंगठी भेट देताना दीसेल तर पती हिच्यावर खुपच प्रेम करेल.
मिश्रीत स्वप्न फल विचार :
1. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला जीवंत गीधाड दीसता सौभाग्य वृद्धि ,जर गीधाड आकाशात उंच उडताना दीसल्यास जास्त लाभदायक.
2. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला साफ-सुथरी श्मशान भूमी दीसल्यास व्यापार वृद्धि होईल.
3. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःस पुस्तक वाचताना पाहील्यास समाजात मान-सम्मान वाढतो.
4.स्वप्ना मध्ये जर मशीनने कोणासही गवत कापताना पाहील्यास सौभाग्य वृद्धी होते.
5. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कोण्या युवतीला कानातले ( कर्णफूल ) घालताना पाहील तर लवकरच शुभवार्ता ऐकण्यास मिळेल.
6. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला धान्याची रास दीसेल तर स्वतःच्या परीश्रमाने सफलता प्राप्त होईल.
7. स्वप्ना मध्ये जर एखाद्या स्त्रीला धान्याची रास दीसेल तर सहज मार्गाने धनप्राप्त होईल.
8. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतः कॉफी अथवा चाहा पीताना पाहील्यास त्याला जीवनात हर्ष्-उल्हास व समृद्धी लाभेल.
9. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःच्या हात व पायात दुखत असल्याचे दीसल्यास धन प्राप्ती होते.
10. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कारागीर बनून घर बनवताना पाहील्यास जीवनात अपार सफलता मिळेल. क्रमशः