आवडेल मला तुझ्या ओंजळीतल ,
प्राजक्ताच फुल व्हायला ,
जेव्हा ,
हळुवार पणे घेशील सुगंध त्याचा ..आणि
बघत राहशील त्याच्याकडे अलवार नजरेने.
मनभोरपणे.........
मला जाणवेल तुझ्या श्वासातला मदभरा गंध,
हाताच्या तळ्व्यांचा उबदार स्पर्श आणि
तुझ्या सहवासातल लोभसपण,
तुझ्या डोळ्यातील लक्ष दिव्यांच्या तेजाने उजळेल
माझं जीवन आणि जगणं सार्थकी लागेल
किंचित आयुष्य लाभलेल्या त्या प्राजक्ताच्या
फुलासारखं...
No comments:
Post a Comment