नकोस लपवू खरा चेहरा,
खोट्यास म्हणती फक्त मुखवटा
न सांगता तु सर्व काही,
सांगुन जातो तुझा चेहरा..
बोलायाचे असते तुजला,
पण संभ्रम असतो मनामध्ये,
न बोलता तु, बोलुन जातो..
मुक्यापरी तुझा बोलका चेहरा.
टिपता अलगद भाव तयाचे,
मोहरतो तुझा खरा चेहरा,
सांगुन जातो गुज मनीचे..
प्राजक्तासम तुझा, प्रांजळ चेहरा.
खरच खूप मस्त आहे....
ReplyDelete