आठवूनी ती आस अनावर
पाझरती डोळ्यांचे झरे ,
मौन सुटेना तुझे निरंतर
का छळसी मज सांग खरे.
टिपून अलगद तळ डोळ्यांचा ,
ठेवून 'सल' तो उरामध्ये ..
फिरती भिंगरी आठवणींची
थरथरत राही मनामध्ये..
थरथरणाऱ्या त्या भिंगरीला ,
कोंदण आता मैत्रीचे
बघता जाशील आत अंतरी
दिसतील व्रण त्या प्रीतीचे ..
No comments:
Post a Comment