गंधाळल्या फुलांना , बिलगून रानवारा ,
सांगतो गुज मनीचे ,लाजुनी हसरा तारा...
तेजाळले नक्षत्र मनीचे ,फडफडली स्मृतींची पाने ,
बेधुंद होऊनी वारा ,गाई अलवार प्रीतीचे गाणे ..
हळुवार स्पर्शिता मनाला ,हृदयी स्पंदने थरथरली ,
घेता कल्पनेतल्या मिठीत ,लज्जेची सोनपाखरे भिरभिरली ..
होते स्वप्नवत सारे ,त्या दूरस्थ तारकासारखे...
बोलणे राहिले दूरच , आता भेटण्यास सुद्धा पारखे .
झाले सारेच शांत आता ,झाला अबोल वारा ,
न सांगताच अबोल झाला ,देखणा हसरा तारा ..
No comments:
Post a Comment