आठवणींच्या सांदीत चिमटलेलं मन,
विरहाच्या दुःखाने ओघळलेली आसवे,
डोळ्यातुन निसटुन गेलेलं स्वप्न..जे
अजुनही शब्दात मांडता येत नाही तरीही..
हिरमुसल्या शब्दांनी व्यक्त करायची माझी तडफड..
तुझं भांबावलेपण, भिरभिरणारी नजर,
थरथरणारे हात, वाट बघण्यातली हुरहुर...
पण त्याच वेळी, मनातलं ओठांवर येवू न देण्याची
तुझी धडपड...
जे व्यक्त करायचं होतं पण केलं नाही,
अशी खंतावलेली मनं घेउन वावरणारे
आपण दोघं.....
आता फक्त , चित्ताला बिलगलेल्या आठवणींनी ,
शब्दलावण्याची वेल बहरते..मोहरते ..पण
रंग गंध नसलेल्या अव्यक्त फुलांसारखी....
विरहाच्या दुःखाने ओघळलेली आसवे,
डोळ्यातुन निसटुन गेलेलं स्वप्न..जे
अजुनही शब्दात मांडता येत नाही तरीही..
हिरमुसल्या शब्दांनी व्यक्त करायची माझी तडफड..
तुझं भांबावलेपण, भिरभिरणारी नजर,
थरथरणारे हात, वाट बघण्यातली हुरहुर...
पण त्याच वेळी, मनातलं ओठांवर येवू न देण्याची
तुझी धडपड...
जे व्यक्त करायचं होतं पण केलं नाही,
अशी खंतावलेली मनं घेउन वावरणारे
आपण दोघं.....
आता फक्त , चित्ताला बिलगलेल्या आठवणींनी ,
शब्दलावण्याची वेल बहरते..मोहरते ..पण
रंग गंध नसलेल्या अव्यक्त फुलांसारखी....
मस्तच खूप छान !!!
ReplyDelete